* कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नये. तुषार तोटीतील वॉशर झिजले असल्यास बदलून टाकावेत.
* तुषार तोटीच्या स्प्रिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटीच्या फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा स्प्रिंग थोडी ताणून तिचा ताण वाढवावा किंवा स्प्रिंगच बदलावी. सर्व फिटिंग्जचे नट व बोल्ट घट्ट करावेत.
* तुषार पाइप, टी, बेंड, आर.क्यू.आर.सी. इत्यादींमधील रबरी रिंग काढून साफ करावी. ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलून टाकावी; अन्यथा तेथून पाण्याची गळती होते.
* तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबरी रिंग कपलरमधून काढून थंड व अंधाऱ्या जागेत ठेवाव्यात, तसेच तुषार तोट्या मोठ्या कोरड्या जागेत उभ्या करून ठेवाव्यात.
* संच वापरात असताना तो नेहमी जोडलेल्या अवस्थेत ठेवावा, जेणेकरून उंदीर व इतर किडे पाइपात जाऊन तुषार तोटीत अडकणार नाहीत.
* स्प्रिंकलर जर व्यवस्थित फिरत नसेल तर पाण्याचा दाब चेक करावा. दाबनिर्मिती योग्य प्रमाणात नसेल, तर स्प्रिंकलर पाहिजे त्या वेगाने फिरू शकणार नाही. स्प्रिंकलर बेअरिंग चेक करावे, त्यामध्ये काही अडकले असल्यास लाकडी काडीने साफ करावेत.
* स्प्रिंकलर बेअरिंग चेक करून व्यवस्थित बसवाव्यात. बेअरिंगचे वॉशर खराब असतील तर बदलावेत. स्प्रिंकलर नोझल्सचा स्प्रिंग आर्म व्यवस्थित फिरत नसल्यास अथवा वाकडा झाला असल्यास तो व्यवस्थित करून बसवावा. आर्म स्प्रिंगचे टेन्शन चेक करावे.
* कपलर आणि फिटिंग्जच्या सीलिंग रिंग्ज (वॉशर) चेक करून व्यवस्थित बसल्या आहेत याबद्दल खात्री करावी. कपलरच्या थ्रेड्समध्ये घाण अडकली असल्यास साफ करावी आणि पुन्हा सीलिंग रिंग बसवावी.
* कपलरला जोडलेले पाइपचे शेवटचे तोंड चेक करावे. वाकडे झाले असल्यास व्यवस्थित करून घ्यावे. बेंड्स, टीज, रेड्युसर, फिटिंग्ज व्यवस्थित कराव्यात.
* शक्यतो उन्हाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी संच चालवावा. या वेळी साधारणपणे वाऱ्याचा वेग कमी असतो.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...