पाण्याच्या बेहिशेबी, अवाजवी आणि अनुत्पादक वापराने शेतीपुढे पाण्याचे संकट उभे राहिले. पाण्यामुळे संकटात सापडलेल्या शेतीला आणि मानव जातीला वाचवले ते पाण्याच्या एका थेंबाने! पाण्याचा एक एक थेंब तारणहार बनला. पुन्हा एकदा हिरवीगार शेतं डोलू लागली आणि हे शक्य झाले ते केवळ सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञानामुळे. महाराष्ट्रातील जवळ जवळ 80 ते 85 टक्के शेती मोसमी पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे. एकूण लागवडीच्या क्षेत्रापैकी केवळ 16.4 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात सिंचनासाठी प्रामुख्याने कालवे, तळी, सरोवर, पाझर तलाव, विहीर, उपसा सिंचन इ. चा वापर केला जातो.
सिंचनासाठी योग्य आणि शाश्वत पर्याय म्हणजे ठिबक सिंचन हा होय. ठिबक सिंचन पद्धतीत झाडांना (पिकांना) पाणी देताना मुख्य लाइन किंवा पार्श्व लाइनच्या तंत्राने त्याच्या लांबीनुसार उत्सर्जन बिंदूचा उपयोग करून पाणी उत्सर्जित करतात. ठिबक सिंचन पीक उत्पादनातील असे एक साधन आहे की ज्यामध्ये पाणी, खते आणि पीक संरक्षक रसायने मोजून मापून विधीपूर्वक नियंत्रित एकसमान निर्धारित मात्रेत पाणी वाया जाऊ न देता सरळ झाडाच्या मुळांशी पोचविली जातात म्हणजे ठिबक सिंचन उत्पादकास पिकाचे उच्च प्रतीचे व जास्त उत्पन्न घेण्यास मदत करते.
ठिबक सिंचन पद्धतीचा कार्यक्षम पद्धतीने वापर करावयाचा असल्यास त्याची योग्य निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण बहुतेक पिकांच्या कार्यक्षम मुळांची कक्षा ही 30 ते 50 सेंमी खोलीपर्यंत असते. पिकासाठी अन्न व पाण्याचे शोषण हे याच थरातून मुळांद्वारा केले जाते म्हणून ओलिताची खोली नियंत्रित करणाऱ्या ठिबक सिंचनाची निवड करणे गरजेचे आहे. म्हणजेच कमी अंतरावर, कमी विसर्ग असणारे ठिबक निवडल्यास ओलिताची खोली नियंत्रित करणे सहज शक्य होते, त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी व खत यांचा कार्यक्षम वापर केला जातो. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
बहुतेक सर्व पिकांसाठी ठिबक निवडताना नळीच्या आतून ड्रीपर असणारी तसेच कमी अंतर, कमी विसर्ग असणारी ठिबक सिंचन यंत्रणा (लो स्पेसिंग लो डिस्चार्ज) निवडणे फायद्याचे असते. पिकांच्या वाढीची अवस्था तसेच जमिनीचा प्रकार व हवामान इत्यादी गोष्टींचा विचार करून आपणास पिकाला लागणारे पाणी व खते मोजून मापून देता येत असल्याने ठिबक सिंचन ही श्रेष्ठ सिंचन प्रणाली आहे.
स्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर...
आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठ...
१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प...