वाय-बार ही नागपूर संत्र्यामधील फळामध्ये येणारी शरीरशास्त्रीय विकृती आहे. यामध्ये फळांचा आकार लांब होत जातो.
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरियम), कॉलिटोट्रीकम बुरशीग्रस्त ठिपके, सरकोस्कोरा बुरशीचे ठिपके, अल्टरनेरिया रोगाचे ठिपके, ड्रेचलेरा रोगाचे ठिपके, फोमोप्सीस कुज, सनस्कॅल्ड, स्कॅब इत्यादी रोग आढळतात.
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.
सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही आंबा बागांमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे.
सकाळी पडणारे धुके आणि दंव, तसेच जास्त आर्द्रता आणि कमी तापमानासोबतच ढगाळ वातारण, कांदा पिकात बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांच्या वाढीसाठी पोषक ठरते.
विषारी कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्याने विषबाधा होऊ शकते. तेव्हा त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना संबंधित कीडनाशकांच्या प्रभावांची व लक्षणांची माहिती असणे आवश्यक आहे.
अनेक ठिकाणी गहू पीक आता फुलोरा ते काढणीच्या स्थितीत आलेले आहे. या काळामध्ये गहू पिकावर खोडकीड, फुलकिडे, मावा तसेच तापमान वाढत असल्याने लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
गहू कांडी धरण्याच्या अवस्थेत असताना मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीची पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे; तसेच खोडावर समूहात राहून पेशीरस शोषून घेतात.
कान्सास राज्य विद्यापीठामध्ये शोधले प्रतिकारकता विकसनाचे नवे तंत्र
मागील काही वर्षांच्या निरीक्षणातून, डिसेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात तापमान 14 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यावर ज्वारीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे आढळून आले आहे.
रोपवाटीकेतील रोपांवर हा रोग येतो. या रोगाची लक्षणे म्हणजे रोपे कोमेजतात व कोलमडल्यासारखी दिसतात.
किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर करून किडींच नियंत्रण करणं म्हणजेच जैविक कीड नियंत्रण होय. ट्रायकोग्रामा कीड – नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो
सध्या कुठल्याही द्राक्ष विभागामध्ये पावसाची शक्यता नाही. परंतु शनिवार, रविवारपर्यंत सांगली, सोलापूर आणि पुणे विभागांमध्ये वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण झाल्यानंतर दुपारचे तापमान कमी होते आणि रात्रीचे तापमान वाढते.
सध्या डाळिंब उत्पादक पट्ट्यात बागांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. बागायतदारांनी सामुदायिक पद्धतीने एकात्मिक रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
तणांचे वर्गीकरण जमिनीनुसार, ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार, पानाच्या रुंदीनुसार व बियाच्या दलानुसार
सध्या तूर पिकातील हळवे वाण शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. गरवे वाण काही ठिकाणी शाखावृद्धी अवस्थेत, तर काही ठिकाणी फुलकळी अवस्थेत आहेत.
सध्या तूर पीक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यःपरिस्थितीत तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचे (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीस (हेलिकोवर्पा आर्मिजेरा) पोषक आहे. प्रादुर्भाव दिसून येत आहे.
या अळ्यांना ‘देठ कुरतडणाऱ्या अळ्याʼअसे रूढ नाव असले,तरी त्या देठांबरोबरच जमिनीलगतचा खोडाचा भाग,पाने इ. वनस्पतीचे भागही कुरतडतात.
बागेमध्ये पानावरती किंवा काड्यावरती भुरी दिसली, तरीसुद्धा घडापर्यंत पोचणार नाही किंवा घडावरती पेपर लावण्याआधी घडावर भुरी असल्यास वरील फवारणी केल्यानंतर घडावरील भुरी नियंत्रित होणार नाही.
द्राक्ष पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उत्पादनाचा दर्जा घटण्यासोबतच उत्पादनामध्येही घट होते. भुरीच्या परिणामकारक नियंत्रणासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील.
सध्या बागा शेवटच्या टप्प्यात असून, रासानियक सध्याच्या काळात द्राक्षबागेत काही प्रमाणात डाऊनी, भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे.या तडकलेल्या मण्यांवर फळकुजीस कारणीभूत असणारी बुरशी वाढण्याचा धोका अधिक आहे.
बीजप्रक्रियेसाठी वापरल्या जात असलेल्या नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांमुळे सुरवातीच्या अवस्थेतील किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. मात्र गोगलगायींमध्ये त्याचे अंश राहतात.
ढगाळ वातावरणामुळे रेशीम कीटकांवर उझी माशी या उपद्रवी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.
निसर्गात विषाणु आणि बक्टोरिया जे आहेत ते पिकावरील किडीचं नियंत्रण करण्यासाठी वापरले जातात. हरभरा, तुर, कपाशी, मका, सूर्यफुल, टोमटोचा पिकांवर घाटेआळीचा प्रादुर्भाव वाढलाय.
पोरकिडा : (खापरा भुंगेरे). साठविलेल्या धान्याला या कीटकांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतो. कोलिऑप्टेरा गणाच्या डर्मिस्टिडी कुलातील हे किटक जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतात.
मागील वर्षी (सन 2014) भारतीय आंबा व वेलवर्गीय भाजीपाला पिकांत फळमाशी (फ्रूटफ्लाय) आढळल्याने युरोपने या शेतमालावर बंदी घातली आणि फळमाशी चर्चेत आली.
येणाऱ्या किडींपैकी फळमाशी ही महत्त्वाची कीड आहे. आंबा तयार होण्याआधीपासूनच सापळ्यांचा वापर केल्यास फळमाशी आटोक्यात ठेवता येईल.
बटाटा पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, कोळी, तसेच स्पोडेप्टेरा, हेलीकोव्हर्पा, देठ कुरतडणारी अळी, बटाट्यावरील पाकोळी आणि हुमणी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
देशी वाणापेक्षा बीटी कपाशीवर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव अधिक आढळत असून, उत्पादनामध्ये सर्वसाधारण 10 ते 40 टक्के घट येऊ शकते.