डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरियम), कॉलिटोट्रीकम बुरशीग्रस्त ठिपके, सरकोस्कोरा बुरशीचे ठिपके, अल्टरनेरिया रोगाचे ठिपके, ड्रेचलेरा रोगाचे ठिपके, फोमोप्सीस कुज, सनस्कॅल्ड, स्कॅब इत्यादी रोग आढळतात; तसेच फळ पोखरणारी अळी, रस शोषणारा पतंग, खोडकिडा, पाने खाणारी अळी, मावा व फुलकिडे, पिठ्या ढेकूण, खवले कीड, पांढरी माशी, कोळी, वाळवी, सूत्रकृमी इत्यादी किडी आढळतात. या कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी
खालील प्रकारे उपाययोजना करावी.
1. छाटणीनंतर मुख्य खोडांवर जमिनीपासून 30 ते 45 सें.मी.पर्यंत दहा टक्के बोर्डेक्स पेस्ट तयार करून लावावी.
2. छाटणीचा कचरा उचलून झाल्यानंतर 33 टक्के क्लोरिन असलेल्या ब्लिचिंग पावडरची 100 ते 150 ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे धुरळणी करावी किंवा 25 किलो ब्लिचिंग पावडर प्रति 1000 लिटर पाणी याप्रमाणे निवळी तयार करून ती एक हेक्टर क्षेत्रातील झाडांच्या आळ्यांमध्ये, तसेच खोडाजवळील मातीवर फवारून घ्यावी. उर्वरित फवारण्या खालीलप्रमाणे कराव्यात.
1. ब्लिचिंग पावडर धुरळताना किंवा मातीवर फवारताना ती काळजीपूर्वक हाताळावी.
2. बोर्डेक्स मिश्रण नेहमी ताजे बनवून फवारावे, सामू उदासीन करून घ्यावा.
3. सुडोमोनास फ्लुरोसन्स हा जैविक घटक शक्यतो कृषी विद्यापीठातूनच घ्यावा.
4. पावसाआधी पीक संरक्षण वेळापत्रकानुसार फवारणी झाली असली तरीही, पुन्हा पाऊस संपल्यानंतर स्ट्रेप्टोमायसीन / ब्रोनोपॉल 500 पीपीएमची ( मिलि प्रति लिटर ---- ) फवारणी करावी.
5. फवारणीच्या वेळापत्रकात दिलेली कीटकनाशके व जिवाणूनाशके ही हाय व्हॉल्यूम फवारणीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत.
6. रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी कीड व रोगग्रस्त फळे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
शेतीला सुधारित तंत्रज्ञानाची जोड दिली तर फायदा होत...
अभ्यास, ज्ञान मिळवण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि...
कृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत अ...
डाळिंब आणि पेरू या फळांपासून बनविलेले क्रश हे पचना...