अनेक ठिकाणी गहू पीक आता फुलोरा ते काढणीच्या स्थितीत आलेले आहे. या काळामध्ये गहू पिकावर खोडकीड, फुलकिडे, मावा तसेच तापमान वाढत असल्याने लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व मध्यम आकाराचे असतात. अळी 2-3 सें.मी. लांब गुलाबी रंगाची असते. अंड्यातून बाहेर आलेली अळी खोडात शिरून आतील भाग खाते. प्रादुर्भित रोपांचा शेंडा सुकतो, त्यामुळे ओंबी लागत नाही. फुलोऱ्यातील पिकात या किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. ओंब्या पांढऱ्या रंगाच्या पोचट अशा होतात.
उपाय : कीडग्रस्त रोपे उपटून जाळून टाकावीत. क्विनॉलफॉस (20 ई.सी.) किंवा ट्रायझोफॉस (20 ई.सी.) 20 मिलि प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ही किडी फिक्कट पिवळसर रंगाची असते. कीड प्रौढ व पिलांच्या अवस्थेत पानाच्या खालच्या बाजूला राहते, पानातील तसेच कोवळ्या शेंड्यातील रस शोषून घेते. पाने निस्तेज व पिवळी पडून सुकू लागतात. कीड पाठीमागील नलिकेतून मधासारखा चिकट द्रव पानावर सोडते. चिकट द्रवामुळे पानावर कालांतराने काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते. परिणामी, पानाची प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होऊन, त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येतो. काही वेळेस ही कीड पिकाच्या ओंबीवरही दिसून येते.
उपाय : किडीचा प्रादुर्भाव दिसताच डायमिथोएट (30 ई.सी.) 10 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. जास्त प्रमाणावर प्रादुर्भाव असल्यास इमिडाक्लोप्रिड (17.8 एस.एल.) 3 मिलि प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ही कीड गडद तपकिरी किंवा पिवळ्या रंगाची असून, प्रौढ किडीची लांबी 1 मिलि असते. पिल्ले व प्रौढ पानांवर ओरखडे पाडून रस शोषतात. त्यामुळे पाने लहान आकाराची व चुरगळल्यासारखी दिसतात.
उपाय : फिप्रोनील (5 ई.सी.) 15 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात किंवा इमिडाक्लोप्रीड 3 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जिरायती गव्हावर लाल कोळी पीक ओंबीवर आल्यावर आढळतात. कोळी रंगाने गडद लाल अगर काळपट दिसतात. आठ पाय असलेली कोळी कीड व तिची पिले सूक्ष्म तंतुमय जाळ्यात राहून पानातील रस शोषतात.
उपाय : कीड आढळून येताच 300 मेश गंधकाची भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळावी किंवा क्लोरपायरिफॉस (20 ई.सी.) 20 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
उंदीर पीक कुरतडून नुकसान करतात. बिळामध्ये गव्हाच्या ओंब्या व धान्य नेऊन ठेवतात. उंदीर मारण्यासाठी झिंक फॉस्फॉईडचे विषारी आमिष तयार करावे. झिंक फॉस्फॉईड एक भाग व 50 भाग कोणतेही भरड धान्य व थोडे गोडतेल यांचे विषारी आमिष तयार करावे.
सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी उन्हात वाळविलेल्या गहू बियाण्यास प्रति किलोस 10 ग्रॅम वेखंड भुकटी लावावी.
डॉ. विलास मुंडे, 9421471693
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, परभणी येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर ...
गौण पिके सकस अन्न देणारी, कणखर आणि हवामान, बदला सं...
दररोज वापरात येणाऱ्या तृणधान्यांमधून आपणाला एकूण उ...
गहू पिकाविषयी अधिक माहिती - गहू हे भारतातील महत्...