गहू कांडी धरण्याच्या अवस्थेत असताना मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीची पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे; तसेच खोडावर समूहात राहून पेशीरस शोषून घेतात. प्रादुर्भावाची लक्षणे तपासून लगेचच उपाययोजना कराव्यात.
गहू पिकाची पेरणी नोव्हेंबर व ऊस असलेल्या क्षेत्रात डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण झाली आहे. सध्या रात्रीचे तापमान 6 ते 8 अंश सेल्सिअस आणि दिवसाचे तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअस आहे. पेरणीपासून काही काळ ढगाळ वातावरण व गारपिटीसह पाऊस झाला आहे. जवळपास एक महिन्यापासून थंडी टिकून आहे. ही थंडी मावा किडीच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. अनेक ठिकाणी मावा किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले आहे. - मावा किडीचा प्रादुर्भाव तीव्रता ही जातीपरत्वे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुरूप वेगवेगळी असते. सुरवातीच्या 30 ते 35 दिवसांचे पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी किंवा नगण्य स्वरूपात दिसून येतो.
जशी पिकाची वाढ होऊन पीक कांडी धरण्याच्या अवस्थेत येतेवेळी मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. वेळीच उपाययोजना न केलेल्या किडीमुळे 80 ते 90 टक्के नुकसान होऊ शकते.
1) मावा कीड साधारपणे 2 ते 3 मिमी लांबीची फिक्कट पिवळसर हिरवट रंगाची असून, या किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नलिकांसारखे अवयव असतात. या किडीची पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहात राहून त्यातील पेशीरस शोषून घेतात. त्यामुळे गहू पिकाची पाने पिवळसर रोगट होतात.
2) ही कीड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्ठेवाटे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते. त्यावर काळी बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्लेषण क्रिया बंद होते. पीक उत्पादनात मोठी घट येते.
साधारणपणे दहा मावा कीड (पिले/प्रौढ) प्रतिझाड किंवा फुटवा दिसल्यानंतर खालील उपाययोजना कराव्यात.
(लेखक कृषी संशोधन केंद्र, निफाड येथे कार्यरत आहेत. )
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत रा...
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या ...