किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर करून किडींच नियंत्रण करणं म्हणजेच जैविक कीड नियंत्रण होय.
‘जीवोः जीवस्य जीवनम्’ म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो, या तत्त्वावर जैविक कीड नियंत्रण पद्धत आधारित आहे.
कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती, फवारणी – धुरळणी करताना येणाऱ्या अडचणी किडीत निर्माण होणारी प्रतिकार शक्ती, पर्यावरणाचं संतुलन इ. गोष्टींचा विचार केला तर कीटकनाशकं वापरण्यावर मर्यादा पडतात. यावर पराभवी उपाय म्हणजे जैविक – कीड नियंत्रण. अनेक किडीच्या अंड्यावर उपजीविका करणारा आपला मित्र कीटक म्हणजे ‘ट्रायकोग्रामा चीलोनीस’ २०० प्रकारच्या किडींच्या अंड्यावर हा ट्रायकोग्रामा उपजीविका करतो. पतंगवर्गीय किडींच्या अंड्यामध्ये ट्रायकोग्रामा आपली अंडी घालून त्या किडींचा अंडी अवस्थेतच नाश करतो. त्यामुळे ट्रायकोग्रामा कीड – नियंत्रणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. आपल्याकडं या परोपजीवी कीटकांच्या २६ प्रजाती आढळून येतात. त्यांपैकी ट्रायकोग्रामा चिलोनीस, ट्रायकोग्रामा जापोनिकम, ट्रायकोग्रामा एल्डानी या प्रजाती महत्त्वाच्या आहेत. यांचा पिकांवरील पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी चांगला उपयोग होतो.
ट्रायकोग्रामा हा सूक्ष्म कीटक असून अंडी – अळी – कोष आणि पतंग या ४ अवस्थांमध्ये त्याचं जीवनक्रम पूर्ण होतो. अंडी – अळी आणि कोष यातीनही अवस्था यजमान किडींच्या अंड्यातच पूर्ण होतात. कोशातून बाहेर पडलेला प्रौढ ट्रायकोग्रामा सूक्ष्म म्हणजे टाचणीच्या टोकावर ८ -१० प्रौढ राहू शकतात. प्रौढ ट्रायकोग्रामा २४ – २८ तास जगतो. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चीलोनीस, एल्डानी टॉईडिया या प्रजाती उपयोगी पडतात. ‘वसंत ट्रायकोगार्ड’ सध्या शेतकऱ्यांना पुरविले जातात.
ट्रायकोग्रामा हे मित्र कीटक शेतात सोडले असता ५ मीटर व्यासाच्या क्षेत्रातील किडींनी घातलेल्या अंड्याचा शोध घेतात आणि खातात. हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात आणि त्या अंड्याचा आतला भाग खातात आणि मग कोषावस्थेत जातात. अशा प्रकारे ट्रायकोग्रामा ह आपला मित्र, शत्रू किडींचा नाश करतो त्यामुळे आपलं होणारं नुकसान टळलं जात.
प्रयोगशाळेतनं कार्ड्स दिल्या नंतर फक्त दोन दिवसाच्या आत शेतात वापरणं जरुरीचं आहे. एका कार्डच्या कात्रीने सहा पट्ट्या कराव्यात.
त्या सहा पट्ट्या किलच्या पाठीमागे टाचणीने अगर स्टेपलरने टोचाव्यात. प्रत्येक पट्टे अंतर ८ – १० मीटर ठेवावे.
उसावरची खोडकिड, कांडीकीड, कपाशी वरची बोंडअळी, भाजीपाल्यावरील फळ आणि खोड पोखरणाऱ्या अळ्या, सुर्याफुलांवरील घाटे आळी, भातावरील खोडकिडी ट्रायकोग्रामा चांगल्या प्रकारे फस्त करतो. ट्रायकोग्रामा कार्ड्स स्वतः जावून आणावेत. पोष्टाने कार्ड्स पाठवता येत नाही आणि वेळेत शेतात लावलेत. वेळ केला तर अंड्यातून प्रौढ ट्रायकोग्रामा निघून तो मारण्याची शक्यता असते.
शेतात ट्रायकोग्रामा सोडल्यानंतर हानिकारक औषधांची फवारणी करू नये. सकाळी अगर सायंकाळी ट्रायकोग्रामा शेतात सोडवा. पिकास पाणी दिल्यानंतर ट्रायकोग्राम सोडणे जास्त फायद्याचं ठरतं. काळी अंडी दिसली, कि त्यातल्या ट्रायकोग्रामाची पूर्ण वाढ झाली असं समजावं. असेच कार्ड प्रसारणासाठी वापरावे. हे ट्रायकोकार्ड १० अंश. सें. ग्रें. तापमानात फ्रीज मध्ये १० – १५ दिवस साठवून ठेवता येतात. त्यापेक्षा जास्त दिवस ठेवल्याने हळूहळू त्यांचं अंड्यातून निघण्याचे प्रमाण कमी होते.
ट्रायकोग्रामा हा परोपजीवी कीटक वापरण्याचे फायदे अनेक आहेत.
अशा या मीत्राची मदत शत्रूंना नामशेष करण्यासाठी घेतलीच पाहिजे.
संदर्भ - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 6/16/2020
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...