सध्या बागा शेवटच्या टप्प्यात असून, रासानियक कीडनाशकांचा वापर करण्यामध्ये रेसिड्यू राहण्याची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीमध्ये संभाव्य रेसिड्यू व्यवस्थापनासाठी जैविक घटकांचा आधार घेणे फायद्याचे ठरेल.
या वर्षी हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे सुरवातीच्या काळात डाऊनी मिल्ड्यू, नंतरच्या काळात कुज, गळ यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवल्या. त्याच अलीकडेच झालेल्या पाऊस-गारपिटीमुळे अंतिम टप्प्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले. या परिस्थितीमध्ये नियोजन करताना निर्यातक्षम बागायतदारांची मोठी कसरत झाली.
80 ते 90 दिवसांच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात घडावर डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे; तसेच यासोबत काही भागांत भुरीचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. निर्यातक्षम बागांमध्ये सध्या पेपर लावण्याचे काम वेगात सुरू आहे. येत्या आठवड्यातील हवामानाचा अंदाजानुसार थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रतिकूल हवामान व अंतिम टप्प्यातील बुरशीनाशकांचे रेसिड्यू व्यवस्थापन यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने जैविक घटकांचा आधार घेणे फायद्याचे ठरेल.
सध्याच्या काळात द्राक्षबागेत काही प्रमाणात डाऊनी, भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्यासोबतच सध्या रंगीत जातींमध्ये क्रॅकिंगची समस्याही दिसून येते आहे. या तडकलेल्या मण्यांवर फळकुजीस कारणीभूत असणारी बुरशी वाढण्याचा धोका अधिक आहे. हिच बुरशी येत्या काळात होणाऱ्या काढणीदरम्यान नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे या बुरशीचे वेळीच नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. अंतिम टप्प्यात रासायनिक बुरशीनाशकांचा वापर मर्यादित अतल्याने द्राक्षबागेत ट्रायकोडर्माचा वापर फवारणीसाठी केल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. सोनाकासह रंगीत जातींमध्ये याचा वापर काढणीपूर्वी केल्यास फायदा होईल.
छाटणीनंतर 90 ते 100 दिवसांदरम्यानच्या बागेमध्ये मण्यांवर व देठावर भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. अतिभुरीग्रस्त मण्यास लवकर तडे जातात. अशा परिस्थित ट्रायकोडर्मा, बॅसिलस, सुडोमोनास यांसारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर फवारणीसाठी केल्यास भुरीचे नियंत्रण लवकर मिळते. द्राक्षघडास पेपर लावण्यापूर्वी या जैविक घटकांची फवारणी केल्यास पेपरमध्ये वाढणारी भुरीदेखील नियंत्रणात राहते. अशा जैविक घटकांच्या वापरामुळे रासायनिक कीडनाशकांचे अंशदेखील नियंत्रणात राहतात. याचा अनुभव बऱ्याचशा प्रयोगशील बागायतदारांना आलेला आहे.
वातावरणातील थंडीचे प्रमाण कमी झाल्यास बागेत मिलीबगचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. जानेवारीच्या सुरवातीस लालकोळीचाही प्रादुर्भाव जाणवू शकतो. अशा संभाव्य परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व्हर्टिसिलीयम लेकॅनी, बिव्हेरीया बॅसियाना, मेटारायझीयम ऍनिसोप्ली या कीटकपरोपजीवी बुरशीजन्य कीटकनाशकांचा वापर फवारणीतून केल्यास फायदा होईल. अगदी खोडावरील, ओलांड्यावरील मिलीबगचे नियंत्रण या फवारणीद्वारे चांगले होईल; तसेच पेपर लावण्यापूर्वी या जैविक कीटकनाशकांच्या फवारणीने चांगले परिणाम मिळतात. याचबरोबर मिलीबगच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या कीडनाशकांचे अंश राहण्याचा धोकादेखील कमी होतो. याच कालावधीमध्ये मिलीबगच्या नियंत्रणासाठी परोपजीवी कीटक जसे ऍनागायरस किंवा क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरीसारखे परभक्षी कीटक वापरता यतील. फक्त या मित्रकीटकांची उपलब्धतता वेळेवर होणे अतिशय महत्त्वाचे असते.
घडाच्या वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरही विपरीत परिणाम जाणवतो. फॉस्फरसच्या उपलब्धतेसाठी फॉस्फरस विरघळवणाऱ्या जिवाणूंचा; तसेच पोटॅशच्या योग्य उपलब्धतेसाठी पोटॅश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर शेवटच्या टप्प्यात ड्रिपमधून करता येईल. या जिवाणूंचा वापर शेणाच्या स्लरीतूनही करता येऊ शकतो. येणाऱ्या थंडीच्या कालावधीत मुळांच्या सान्निध्यात असणारी सूक्ष्मजीवांच्या संख्येत वाढ केल्यास निश्चित फायदा होईल.
जैविक घटकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी ः
प्रा. तुषार उगले, 8275273668
(जैव कीड नियंत्रण प्रयोगशाळा, कीटकशास्त्र विभाग, कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात गांडूळ खत कसे तयार करतात. या खतामुळे जम...
खोडवा उसाला रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अव...
ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग-किडी...
औद्योगीकरणामुळे क्रूड ऑइल आणि अन्य पेट्रोलियम घटका...