অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आच्छादन गृह

आच्छादन गृहाची रचना वैशिष्ट्यपुर्ण अशी असते. बारीक जाळी किंवा विणलेल्या धाग्यांनी बनलेल्या साहित्याने आच्छादन गृहाची निर्मिती केलेली असते ज्यातून सुर्यप्रकाश, हवा आणि आवश्यक अशी आर्द्रता आरपार जाऊ शकते. अशा आच्छादन गृहात पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असे चांगले वातावरण निर्माण होऊ शकते. या रचनेला इंग्रजीत शेडनेट हाऊस किंवा नेट हाऊस असेही म्हणतात

आच्छादन गृहाचे उपयोग

  • फुलशेती, औषधी वनस्पती, शोभीवंत पर्णसंभाराच्या वनस्पती, भाजीपाला आणि मसाल्यांच्या पिकांच्या लागवडीसाठी.
  • फळ आणि भाजीपाल्यांच्या रोपवाटिकांसाठी तसेच जंगली प्रजातीच्या संवर्धनासाठी.
  • अनेक कृषी उत्पादनांचा दर्जा टिकवून त्यांना वाळविण्यासाठी.
  • किडी आणि किटकांच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी
  • नैसर्गिक हवामानातील बदलापासून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी. उदा. वारे, पाऊस, धुके, किंवा गारपीटीचा मारा.
  • कलमी रोपांच्या उत्पादनासाठी आणि त्यांनी उन्हाळ्यातही तग धरून राहावे यासाठी.
  • ऊती-संवर्धित (टिश्यू कल्चर) मधील रोपांच्या वाढीसाठी.

आच्छादन गृहाच्या उभारणीतील टप्पे

कोणत्या प्रकारच्या पिकासाठी आच्छादन गृह उभे करायचे आहे, यासह त्यासाठी स्थानिक पातळीवरच कोणते साहित्य उपलब्ध आहे, त्याशिवाय स्थानिक हवामान कसे आहे, याचा विचार करून, त्याच्या रचनेचा विचार करायला हवा. याशिवाय विस्तारासाठी संधी असेल अशी रचना करायला हवी.

आच्छादन गृहाच्या जागेची निवड

हे आच्छादन गृह त्याला आवश्यक असणाऱ्या घटकांच्या आणि त्याबरोबच त्यामध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांच्या बाजारपेठेच्या दृष्टीने सोयीचे असावे. याशिवाय इमारती, झाडे यांच्यापासून दूर आणि औद्योगिक किंवा वाहनांच्या प्रदूषणापासून दूर, अशा ठिकाणी या गृहाची उभारणी करावी. याशिवाय ही जागा सांडपाण्याच्या पाण्याच्या प्रादुर्भावापासूनही दूर असावी. वीज, मुबलक आणि चांगल्या पाण्याचीही तिथे उपलब्धता असावी. पण वायूरोधक मात्र अशा जागेपासून तीस मीटर्स दूरवर उभे करता येतील.

आच्छादन गृहाचे दिशास्थान

आच्छादन गृहासाठी दिशास्थानाचे दोन निकष ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये सुर्यप्रकाशाची तीव्रता, त्याची उपलब्धता आणि वाऱ्याची दिशा यांचा समावेश आहे. एका पट्ट्याचे (सिंगल स्पॅन) आच्छादन गृह पुर्व-पश्चिम किंवा उत्तर-दक्षिण असे उभे करता येईल. पण अनेक पट्ट्यांचे (मल्टी स्पॅन) हे मात्र उत्तर-दक्षिण असेच असावे. ज्यामुळे या आच्छादन गृहात सातत्याने सुर्यप्रकाश उपलब्ध असेल आणि तोही एक समान पद्धतीने.

आच्छादन गृहाच्या उभारणीसाठीचे साहित्य

आच्छादन गृहाची रचना ही सांगाडा आणि त्यावरचे वेष्टन किंवा आच्छादित करण्याचे साहित्य-सामग्री अशा दोन मुख्य घटकात विभागलेली असते. या सांगाड्याची रचनाही आच्छादन गृहाच्या आच्छादनाच्या सामुग्रीला आधार देणे त्याशिवाय वारा, पाऊस यांच्या माऱ्यला तोंड देईल असे अशी असते. शिवाय या सांगाड्याला पिकांचा भारही सहन करावा लागतो. त्यासाठीही ही रचना मजबूत करावी लागते. या सांगाड्यातील एमएस म्हणजे माईल्ड स्टिल-मृदू पोलादी पट्ट्या या वीस ते पंचवीस वर्षे टिकतात. त्यासाठी काही ठराविक कालावधीनंतर या सांगड्याला गंज प्रतिरोधकाने रंगवावे लागते. बांबुचा सांगाडा मात्रा जास्तीत जास्त तीन वर्षे टिकतो.
कृषि आच्छादनासाठी वापरली जाणारी जाळी-कापड तीन ते पाच वर्षे टिकते. पण त्यासाठी त्याठिकाणचे हवामान कसे आहे, हेही पहावे लागते. आच्छादनाची ही जाळी-कापड वेगवेगळ्या रंगातही उपलब्ध आहे. त्याशिवाय त्यांच्या आच्छादनाची टक्केवारीही पंचवीस पासून अगदी नव्वद टक्क्यांपर्यंत उपलब्ध असते. (उदा. 25%, 30%,35%,50%,60%,75% आणि 90%). याशिवाय आच्छादन गृहाची रचना आणि आकार या गोष्टी गरज आणि त्या-त्याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या तांत्रिक-अभियांत्रिकी कुशलतेवर अवलंबून राहू शकते. आकाराच्या बाबतीतही घुमटाकृती, त्रिकोणी आणि कमानी सारखे आकारही देता येऊ शकतात. पण जिथे पावसाचे मोठे प्रमाण आहे, अशा ओरिसासारख्या राज्यात काही बदल करूनही हे आकार वापरता येतात.

आच्छादन गृहाचे रेखांकन आणि उभारणी-बांधणी

दोन प्रकारच्या आकारांचे रेंखाकन ओरिसा मधल्या भुवनेश्वरच्या ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केले आहे. विद्यापीठाच्या प्रिसिजन फार्मिंग डेव्हलपमेंट सेंटर येथे हे काम झाले आहे. या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे आच्छादनगृहाच्या सांगड्यासाठी कुठेही जोडणीसाठी वेल्डिंगचा आधार घ्यावा लागत नाही. याशिवाय पायामध्ये म्हणजे जमिनीत जाणाऱ्या या आच्छादनगृहाचे स्तंभ हे वाळवीला प्रतिबंध करतील, असे असतील. या आच्छादन गृहाबाबतचे तपशील खालीलप्रमाणे असे आहेत.

आच्छादन गृह प्रकार– 1

या रचनेत (आकृती क्र.1) एमएस अँगल्स (35मिमीx3मिमीx6मिमी) आणि बांबुचाही सांगड्यासाठी वापर करता येतो. यात एमएस अँग्लसचा वापर पायाच्या स्तंभाजवळ चांगल्या पकडीसाठी वापर केला जातो आणि यू क्लिपचा वापर बांबुला पकडून ठेवण्यासाठी केला जातो. बाबुंचा वापर वरून आणि खालून असा आधार आणि छपरासाठीही केला जातो. आच्छादनगृहासाठी एकदा का आरेखन-आराखडा झाला, की तो समतल असा करवून घेतला जातो. पायाच्या स्तंभासाठी खड्डे खोदावे लागतात, या खड्ड्यांचा काही भाग वाळुने भरून, तो मातीनेही घट्ट बुजवून घेतला जातो. पायाचे स्तंभ हे सिमेंट काँक्रिटमध्ये पक्के केले जातात. त्यासाठी समांतर अशा तीन रांगामधले अंतरही एक समान ठेवले जाते. सिमेंट पक्के झाल्यानंतर, बाबुं एक समान लांबीने कापून घेतले जातात. ते एक समान आकाराचेही असावेत हे पाहिले जाते. त्यानंतर ते छतासाठी आणि आतल्या बाजूनेही उलट्या आधारासाठी घट्ट बांधून घेतले जातात. आच्छादनगृहाचे दरवाजे हे तयार करवून घेतले असतात. हे दरवाजे आणि आच्छादनगृहाचे शेवट नट बोल्टसनी घट्ट अशा पद्धतीने बंद केले जातात. यानंतर आच्छादक जाळी 50 ते 75 टक्क्यांपर्यंतची छतासाठी तर 30टक्क्यांची जाळी बाजुने लावली जाते. बाहेरच्या बाजुचा सांगडा आणि दरवाजेही या जाळीने आच्छादले जातात. आच्छादनगृहातील मधल्या जागामधल्या पायवाटा आणि कडेच्या जागा या विटांनी बांधून घ्याव्या लागतात. अशा पद्धतीने बांधल्या जाणाऱ्या आच्छादनगृहासाठी प्रतिचौरस मिटर साधरणतः दोनशे पंचवीस रुपये खर्च येतो.
यासाठी वापरण्यात आलेल्या साधन-सामुग्रीचा तपशील खालील तक्ता क्र.-1 मध्ये दर्शवला आहे.

साधन सामग्रीची यादी (आच्छादन गृह प्रकार-1)

.क्र.

तपशील

सामुग्री

आकार-लांबी xरुंदी

नग-वजन

1.

पाया-फाऊंडेशनचे खांब  "U" आकारासह

एमएस अँगल्स लोखंडी

35मिमी x 35मिमी x 6मिमी

209 किग्रॅ

 

 

एमएस पट्ट्या.

25मिमी x 6मिमी

7 किग्रॅ

2.

दरवाजे आणि बाहेरचा सांगाडा.

एमएस अँगल्स लोखंडी

35मिमी x 35मिमी x6मिमी

71 किग्रॅ

3.

छतासाठीचा सांगडा.

बांबू

75 ते 100मिमी जाडीचे

20 नग

4.

छताचे आणि बाजुसाठीचे आच्छादन.

कृषिसाठीची जाळी

50% - 70% & 30%

328 चौरस मीटर्स

5.

पाया-फाऊंडेशन भरून घेण्यासाठीचे साहित्य.

सिमेंट काँक्रिट

1:2:4 अशा प्रमाणाचे मिश्रण, बारा मिमी जाडीच्या खडीसह

ब्रास1.3m3

6.

गंज प्रतिरोधक प्रकिया

गंज प्रतिरोधक रंग आणि थिनर

-

4 लिटर्स

7.

सांगाड्याची उभारणी.

(i) नट आणि बोल्ट

3/8”x1”

1 किग्रॅ

 

 

(ii)गॅल्वनाईज्ड तार

4मिमी

2 किग्रॅ

8.

मधल्या पायवाटाचे बांधकाम

विट,खडी, वाळू इ.

1:6 या प्रमाणाचे मिश्रण

ब्रास2.4m3

आच्छादन गृह प्रकार– 2

याप्रकारच्या रचनेत (आकृती क्र.2) एमएमस म्हणजे पोलादी अँगल्सचा (35मिमीx3मिमीx6मिमी) चा पाया म्हणजे आधार आणि छतासाठी अशा सगळ्याच गोष्टीत वापर करता येतो. लोखंडी अँगल्सच्या पटट्या या आच्छादनासाठच्या सामुग्रीसाठी आधार म्हणून करता येतो. पायामध्ये पक्क्या केल्या जाणाऱ्या अँगल्समध्येच आधार आणि छपरासाठीच्या नट आणि बोल्टससाठी सोय असते. याशिवाय चपट्या पट्ट्यांनाही अशीच सुविधा असते. या आच्छादनगृहासाठीही नेहमीप्रमाणे समतलपणा करून घेतला जातो. पायाच्या आधारासाठीच्या स्तंभासाठीचे खड्डे सिमेंट काँक्रिटने भरून घेतले जातात. सात दिवसांसाठी हा पाया मजबूत होऊ दिला जातो. आच्छादनासाठीचा आधार, छताचा सांगडा, दरवाजे, बाहेरच्या पट्टया या नट-बोल्टनींच पक्क्या केल्या जातात. त्यानंतर या सांगाड्यावर आच्छादनाची जाळी चढवली जाते. याहिठिकाणी मधल्या पायवाटा, कडेच्या जागा या विटांनी बांधून घेतल्या जातात. अशा पद्धतीच्या आच्छादनगृहासाठी साधारणता प्रतिचौरस मीटर पाचशे रुपये खर्च येतो.
यासाठी वापरण्यात आलेल्या साधन-सामग्रीचा तपशील खालील तक्ता क्र.-2 मध्ये दर्शवला आहे.

साधन सामग्रीची यादी (आच्छादन गृह प्रकार-2)

.क्र.

तपशील

सामुग्री

आकार-लांबी xरुंदी

नग-वजन

1.

फाऊंडेशन पायासाठीचे खांब

एमएमस अँगल्सMS Angle

40मिमी x 40मिमी x 6मिमी

336 किग्रॅ

2.

बंदिस्तीकरणासाठीचे छत आणि आच्छादन

एमएमस अँगल्सMS Angle

40मिमी x 40मिमी x 6मिमी

305किग्रॅ.

3.

दरवाज्यासाठीचा सांगडा

एमएमस  अँगल्सMS Angle

40मिमी x 40मिमी x 6मिमी

41 किग्रॅ.

4.

आकडे-अडकवण्यासाठी

एमएमस पट्टया

30मिमी x 6मिमी

159 किग्रॅ

5.

छताचे आणि बाजुसाठीचे आच्छादन.

कृषी आच्छादन जाळी

50% - 70% & 30%

328 चौरसमीटर्स

6.

पाया भरून घेण्यासाठीचे साहित्य

सिमेंट काँक्रिट

1:2:4 अशा प्रमाणाचे मिश्रण, बारा मिमी जाडीच्या खडीसह

ब्रास1.8 m3 (ब्रास)

7.

पायवाट, कडेच्या जागांचे बांधकाम

वीट, वाळू, खडी इ.

1:6 या प्रमाणातले मिश्रण

ब्रास2.4m3(ब्रास)

8.

सांगाड्याची उभारणी.

(i) नट आणि बोल्टस

3/8”x1”

4 किग्रॅ.

 

 

(ii) गॅल्वनाईज्ड तार

4मिमी.

4 किग्रॅ.

9.

गंज प्रतिरोधक प्रकिया

गंज प्रतिरोधक रंग आणि थिनर

-

8 लिटर्स

स्त्रोत: NCPAH ; India

अंतिम सुधारित : 12/19/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate