অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कमी खर्चिक संरचित हरितगृह

कमी खर्चिक संरचित हरितगृह

हरितगृह तंत्रज्ञानाबाबत

हरितगृह तंत्रज्ञानाचा मुख्‍य उद्देश उच्‍च प्रतीच्‍या रोपांच्‍या पूर्णवाढीसाठी एक चांगले विकसित पर्यावरण तयार करणे हा आहे. विकसित देशांमध्‍ये, हवामानाची स्थिती मवाळ आहे. सामान्‍यपणे फळांचे, फुलांचे व भाज्‍यांचे उत्‍पादन पॉलिहाउसखाली करतात. प्रतिकूल हवामानाच्‍या काळात सामान्‍यपणे वाढणा-याफळपिकांसाठी ग्रीन हाउसचा वापर करतात. ग्रीनहाउसमध्‍ये फळे, भाज्‍या आणि फुले यांचे उत्‍पादन पूर्ण वर्षभर केले जाते. नियंत्रित पर्यावरण/तंत्रशास्‍त्र जसे प्‍लॅस्टिक ग्रीनहाउसची गरज देशभरातील हवामानाच्‍या विवि‍धतेमध्‍ये देखील चांगले शेती-हवामान  विकसित करण्‍यासाठी करावी लागणार आहे.

हरितगृहांना पारदर्शक किंवा थोडे पारदर्शक पदार्थ जसे, LDPE, FRP किंवा पॉलिकार्बोनेट शीटसारख्‍या झाकणाने झाकतात ज्‍यामधून सूर्यकिरण तर आरपार जातात, पण उष्णता जावू शकत नाही. यामुळे रोपांच्‍या वाढीला अनुकूल वातावरण मिळते. दिवसा सूर्यापासून मिळालेली उर्जा उष्‍णतेत परिवर्तित होते तसेच रोपाच्‍या सामान्‍य वाढीच्‍या दरम्‍यान वापरलेल्‍या पाण्‍याचे बाष्‍पीकरण ग्रीन हाउस करते. या संरचनांमुळे रोपाच्‍या वाढीवर परिणाम करणारे विविध घटक जसे प्रकाश, उष्‍णता, CO2 आणि आर्द्रता यांचे नियंत्रण करता येते.

हाउसिंगसाठी वापरल्‍या जाणा-या वस्‍तूंवर त्‍याचे मूल्‍य आधारित आहे जसे कठीण किवा लवचिक झाकण म्‍हणजेच आवरण, उदा. जी.आय. पाइप, एम.एस.ऍंगल, फायबर ग्‍लास पॉलिएस्‍टर, कांच, एक्रेलिक शीट इ. या व्‍यतिरिक्‍त ग्रीनहाउसची स्‍थापना आवरणावर अवलंबून आहे.

खूप महागाचे सामान वापरून ग्रीनहाउस तयार करणे भारतीय शेतक-यास शक्‍य नाही. या समस्‍येचे निवारण करण्‍यासाठी कमी किंमतीचे ग्रीनहाउस तयार करून त्‍याचे शेत-परीक्षण करण्‍यात आले आहे. या संरचना प्‍लॅस्टिक शीट, शेडेड जाळ्या, यूव्‍ही स्‍टेबिलाइज्‍ड LDPEफिल्‍म शीटपासून तयार करण्‍यात येतात. असे ग्रीनहाउस उभे करण्‍याच्‍या पध्‍दती या पुस्तिकेमध्‍ये याचा वापर करणा-यांसाठी दिलेल्‍या आहेत ज्‍यायोगे, ग्रीनहाउसमधील जागा,
विविध शेती उत्‍पादनांसाठी वापरणे शक्‍य होईल.

अशा ग्रीनहाउसमध्‍ये वाढविलेल्‍या वनस्‍पतींचे परिणाम दर्शवितातकी ही पध्‍दत किरकोळ आणि लहान शेतक-यांसाठी सोयीची ठरेल. याच्‍या मदतीने ते उच्‍च पिके घेवू शकतील आणि भाज्‍या इत्यादीबिगरहंगामात उगवू शकतील.

35'x 20' चे लाकडी ग्रीनहाउस उभे करण्याची पध्दत

आवश्‍यक सामान

लाकडी खांब

लाकडी खांबांची निवड या ग्रीनहाउसच्या मजबूतीसाठी फार महत्वाची आहे. नीलगिरीचे खांब कसोरिनापेक्षा जास्त फायद्याचे ठरतात कारण यामध्ये उधई लागत नाही आणि बुरशी पण सहसा लागत नाही. आणखी, खिळे लावल्यास, यांचे लाकूड फाटत नाही कारण याची फायबर मजबूत आहे.

दोन प्रकारचे पोल वापरतात. एक 7 ते 10 सेंमी.व्यासाचे व दुसरे 5 सेंमी.चे असतात.

मोठ्या आकाराच्या वस्तू मुख्य बांधणीसाठी व लहान आकाराच्या वस्तू आधाराला टेकू देण्यास वापरतात.

आवश्यक असलेल्या पोल्सची संख्या:-

मोठ्या व्यासाचे पोल    :    21

लहान व्यासाचे पोल     :    34

एकूण पोल            :    55

जीआय वायर

4 मिमि व्यासाची जीआय वायर

मुख्य बांधणीच्या बांबूंना बांधण्यासाठी वापरतात. एकूण 2 किलोग्राम वायर हवी.

खिळे

लांब खिळे लाकडी खांबांना ठोकण्यासाठी वापरतात. 7 सेमी; लांबीचे खिळे 3किलो हवेत.

यूव्ही स्टेबिलाइज्ड एलडीई फिल्म

संरचना कोणत्या ही लवचिक ग्रीनहाउस आवरणांसाठी योग्य आहे. LDPE (लो डेंसिटी पॉलिथिन) फिल्म सामान्यपणे ग्रीनहाउस करीता विश्वभरात वापरतात. त्यांना इंस्टाल करणे सोपे असते आणि त्या स्वस्त असतात. भारतात, LDPE फिल्मचे उत्पादक इंडियन पेट्रोकेमिकल लि. (IPCL) आहेत आणि त्यांच्या कडे ग्रीनहाउस साठी लागणारे सर्व साहित्य मिळते. आमच्या प्रायोगिक वापरात असे आढळले कि या कंपनीच्या फिल्म वापरल्याने रोपांच्या वाढीकरीता आवश्यक असलेल्या पुष्कळ बाबतीत फायदा आहे जसे, अल्प प्रकाश, CO2, आणि संबंधित आर्द्रता यांची परिमाणे आणि प्रमाण व्यवस्थितपणे सांभाळले जावू शकते.

एकूण आवश्यक फिल्म

फिल्म (यूव्ही फिल्म लो डेंसिटी पॉलिथिन फिल्म) फ्लोर क्षेत्राच्या 2.48 पट मोठी असावी लागते. उदा. 35' x 20' = 700 स्क्वे.फुटाच्या ग्रीनहाउससाठी 1736 स्क्वे.फुट यूव्ही फिल्मची गरज पडते. या फिल्मचे वजन अंदाजे 30 किग्रा. भरते ज्याची जाडी 200 मायक्रॉन असते.

कोलतार/बिट्यूमेन: 2 लिटर

 1. 1. एलडीपीई फिल्म रोल (10 सेमी. रूंदीचा)

एलडीपीई फिल्मचा रोल/उरलेली यूव्ही स्टेबिलाज्ड एलडीपीई फिल्मचा रोल ज्याची रूंदी 10 सेंमी. असेल पोल बांध्ण्यासाठी वापरतात. जोड, आणि वायरचा सरळ संबंध

यूव्ही स्टेबिलाज्ड फिल्मशी येवू न देणे.

आवश्यक असलेली एकूण फिल्म किलोग्रामध्ये:   3 किलोग्राम

प्लॅस्टिकची दोरी

प्लॅस्टिकची दोरी LDPEशीटला ग्रीनहाउस स्ट्रक्चर आणि दोरी यांच्या मध्ये सैंडविच करण्यासाठी वापरतात. वाÚयामुळे शीट उडून जावू नये म्हणून असे करतात. प्लॅस्टिकची दोरी : 5 किलोग्राम

बांबूच्या काठ्या

बांबूचा वापर परिघाभोवती वरपासून खालपर्यंत जोड सांधण्यासाठी आणि एलडीपीई शीटला आधार देण्यासाठी करतात. एकूण 30 शीटची गरज असते.

जोड खिळे

1. जोड खिळ्यांचा वापर शीटला रबराच्या वॉशरबरोबर जोडण्यासाठी करतात.

2. मुख्य बांधकामाशी शीटला पक्क्या त Úहेने ठोकण्यासाठी जोड खिळ्यांचा वापर करतात.

आवश्यक एकूण जोडखिळे ¼ 1’इंच लांबीचे½ :   250 ग्राम

एलडीपीई फिल्म आवरणाच्या 35'x 20' च्या ग्रीनहाउसच्या लाकडी संरचनेची उभारणी

स्टेप 1.

ग्रीनहाउस जागेची निवड व सुरूवात

 1. चांगली आणि योग्य जागा ग्रीनहउसच्या उत्पादनावर पर्यावरणीय प्रभाव टाकते. पाण्याच्या निचÚयासाठी जागेचा उतार महत्वाची बाब आहे. ग्रीनहाउसच्या पृष्ठभागावरून (जमिनीच्या) पाणी वाहून जावे या साठी पुरेशी व्यवस्था हवी.
 2. कोणत्या ही हवामानात लोकांपर्यंत सहज पोच सोयीची ठरेल. ग्रीनहाउस बाजाराजवळ असेल तर आणखी चांगले ठरेल. ग्रीनहाउसच्या जागेजवळ चांगल्या पाण्याची सोय असणे देखील महत्वाचे आहे.
 3. ग्रीनहाउस इतर इमारतींपासून व झाडांपासून दूर असावे म्हणजे सूर्यप्रकाशास अडथळा येणार नाही.
 4. उत्तर-दक्षिण ग्रीनहाउसपेक्षा पूर्व-पश्चिम असलेल्या ग्रीनहाउसमध्ये हिवाळ्यात चांगला प्रकाश येतो.
 5. ग्रीनहाउस उभारतांना वाÚयाची दिशा, गरज असेल त्यावेळी वारे मिळणे तसेच पुरेसा सूर्यप्रकाश नेहमी आणि गरजेप्रमाणे उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी.

स्टेप: 2

मोठ्या व्यासाचे लाकडी पोल घेवून त्याच्यावर आधी बिटुमन लावा आणि मग त्यांना एलडीपीई फिल्म बरोबर पॉपिप्रॉपलिनच्या सुतळीने बांधा यामुळे या पोलवर उधई लागणार नाही.

 1. ग्रीनहासउची लाकडी संरचना विविध आकाराच्या योग्य कैसोरिना पोलच्या बांधणीने आकृतीत दाखविल्याप्रमाणे करावी.
 2. बांबूच्या केनचा उपयोग एकूण पृष्ठभाग कव्हर करण्यासाठी करावा.
 3. 0.2 बाय 0.2 मी. रूंदीचे खंदक ग्रीनहाउसच्या काठाने खणा. खणून काढलेली माती यूव्ही स्टेबिलाइज्ड एलडीपीई फिल्मला रोवून टाकण्यासाठी कामी येईल. या मातीमध्ये दगडगोट नसल्याची खात्री करून घ्या.
 4. एलडीपीई फिल्म यूव्ही स्टेबिलाइज्ड एलडीपीई फिल्मच्या संपर्कात येणाÚया सर्व पोलभोवती गुंडाळा ज्यायोगे हे माहित होते कि यूव्ही स्टेबिलाइज्ड एलडीपीई फिल्मला नुकसान पोचविणारी कोणती ही टोके पोल वर नाहीत.
 5. खाली आकृतीत दाखविल्याप्रमाणे फिल्म ग्रीनहाउसमध्ये अंथरा. कोणती ही एक बाजू 2 इंच रूंद मोडा आणि खिळा व रबर वॉशर बरोबर 4 इंच अंतराने ठोका. शीट खणलेल्या खड्डयात टाका. ग्रीनहाउसच्या मागची व पुढची बाजू एलडीपीई शीटने झाका आणि शीट बरोबर फिक्स करून कापा पुन्हा रबर वॉशर आणि खिळा वापरून पक्के करा. मग शीटचे कोपरे दुमडून ते आधीप्रमाणेच पिटमध्ये टाका आणि वरून माती पसरा. प्रवेशमार्गाच्या कोणत्या ही बाजूला जेथे HDPE शीट रोल करा आणि दाखविल्याप्रमाणे लोंकळत ठेवा.
 6. धातूचे हुक आकृतीत दाखविल्याप्रमाणे लावू टाका आणि दोन्ही पैकी कोणत्या ही प्रवेशमार्गाच्या एका बाजूला दोन हुक इंस्टॉल करा. दोन्ही प्रवेशमार्गामध्ये गुंडाळलेल्या शीटला यामुळे आधार मिळतो.

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate