অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हरीतगृह तंत्रज्ञान

हरीतगृह तंत्रज्ञान

सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासुन युरोपात काचेच्या हरितगृहात विविध प्रकारच्या वनस्पतीची लागवड सुरु झाली. प्रो इमरी केर्यस या केन्टुकी विवीठाच्या शास्त्राज्ञाने १९४८ साली पहिल्यांदा हरीतगृहासाठी काचेच्या लोखंडी /अल्युमिनियम/लाकुड/बांबुच्या सांगाडयावर एखाद्या पारदर्शी आच्छादनाचा वापर त्यामध्ये करुन वनस्पतीची लागवड करता येते. हरितगृहामध्ये वनस्पतीनां वातावरणातील हानीकारक बदलापासुन वाचविता येते. हरितगृहातील वनस्पतींना अति पाऊस अति ऊन, धुके, यापासुन संरक्षण मिळते.

जगात काचेच्या हरितगृहातील क्षेत्र ३०,००० हेक्टर आहे तर प्लॅस्टिकच्या हरितगृहातील २ लाख हे क्षेत्र आहे. १०५० सालापासुन जपानमध्ये हरितगृहामध्ये वनस्पतीची लागवड केली, जाते. जपान हा सर्वात आघाडीचा देश मानला जातो. त्यांच्याकडील क्षेत्र ५०,००० हे. पर्यन्त आहे. त्या खालोखाल चीनचा क्रमांक लागतो.

हरितगृहाचे उपयोग

  1. कट-प्लॉवर व भाजीपाला उत्पादन
  2. कुंडयामधील लागवड

हरितगृहाचे प्रकार

  • लिन टू
  • ए फेम
  • इबन स्पॅन
  • कोनसेट
  • गोथिक आर्च
  • जीयोडेसिक होम
  • मल्टीस्पॅन रिज अँड फरो
  • कोनसेट विथ गटर सिस्टिम

आच्छादनासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे साहित्य

ग्लास / काच

प्लॅस्टिक

  1. शीट प्लॅस्टिक : पॉलिइथिलीन, पॉली व्हाईनील, पॉलीइस्टर, पॉली व्हाईनील प्लोराईड
  2. रिजिड प्लॅस्टिक : पॉली व्हाईनील क्लोराईड, फायबर ग्लास रिफोरसड प्लॅस्टिक, ऍक्रलिक, पॉली कार्बोनेट

उष्ण कटिबंध प्रदेशात हरिगृहात उष्णता कमीत कमी व आर्द्रता जास्तीत जास्त टिकविणे हे वनस्पतीच्या वाढीच्या दृष्टीने महत्वाचे असते. उष्णता दोन महत्वाच्या गोष्टीमुळे कमी होते. एक तर उष्ण हलकी असल्यामुळे हरितगृहाच्या वरच्या बाजुने निधुन जाते. व खालच्या बाजुने गार हवा जड असल्यामुळे हरितगृहात येते. व दुसरे म्हणजे कुलिंग पॅड त्यामुळे आतील उष्ण कमी करता येते. त्यामुळे हरितगृहाची उंची ही ४ मी पर्यन्त असावी. परंतु त्याचबरोबर ती हवेच्या वेगालाही टिकली पाहिजे हरितगृहातील हवा खेळती राहण्यासाठी त्याची रचना लांबी व रुदी प्रमाणात असावी. त्यासाठी हरितगृहाची रुंदी कमीत कमी ३५ मी. इतकी असावी.

मान्सुन पाऊस हा जास्त असल्यास तिथे साधारण १ सेमी पाऊस प्रति हेक्टरी हा १०० टन पाणी एवढा असतो. हे वजन पेलण्यासाठी हरितगृहाचे पाणी वाहुन नेण्यासाठी गटराचे अंतर हे आठ मिटरचे हवेच तसेच बाहेरील बाजुसही पाणी वाहुन नेण्यासाठी व्यवस्थित हवे.

परदेशातील हरितगृहे हे पुर्णतः संगणीकृत झालेली आहेत. ही आधुनिक हरितगृहे जणु काही वनस्पती तयार करावयाचे कारखानेच आहेत. अशी कोटयावधी झाडे तयार करताना संगणकाच्या मदतीने हवामान,पाणी,अन्नद्रव्य व इतर रोजची कामे केली जातात. त्याप्रमाणे परदेशात काही कामासाठी रोबोटसचा सुध्दा वापर केला जातो. त्यांच्याकडुन अगदी जलद गतीने व योग्य पध्दतीने काडया लावणे, इ, कामे केली जातात.

आधुनिक फुलशेतीसाठी खालील हरितगृहे वापरले जातात

१.  आरचर्ड हरितगृहे

२. व्हेनलो हरितगृहे

३. सॉ टुथ हरितगृहे

हरितगृहात खालील महत्वाचे घटक वनस्पतींच्या वाढीसाठी मदत करतात.

  • सुर्यप्रकाश
  • हवा
  • हवा खेळती ठेवण्यासाठी केलेली जागा
  • उष्णता
  • आर्द्रता

सुर्यप्रकाश

वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण कियेसाठी ३०,००० ते ६०,००० लक्स इतका सुर्यप्रकाश भारतामध्ये उन्हाळयात प्रकाश तीव्रता ही ३,००,००० लक्सपर्यन्त जाते. एवढया तीव्रतेमध्ये वनस्पतीची वाढ मंदावते. त्यामुळे हरितगृहाने सावली निर्माण करुन वनस्पतीचीं कार्ये उन्हाळयातही व्यवस्थित चालु राहते.

हवा

कार्बन-डाय ऑक्साईड हा बाहेरच्या हवेत३०० प्रती दशलंक्षाश किंवा ००३ टकके एवढा असतो. पण हरितबृहात रात्री वनस्पतीने सोडलेला कार्बन-डायऑक्साईड हा १५००-२००ञ प्रतिदशलक्षांश एवढा जास्त असतो. तोच कार्बन-डाय-ऑक्साईड हरितगृहात साठुन दुस-या दिवशी सकाळी सुर्य उगवल्यानंतर प्रकाशसंश्लेषण

वायुविजन

हरितगृहातील हवा खेळती ठेवण्यासाठी योग्य प्रकारच्या वायुविजनाचा उपयोग होतो. त्याच्यामुळे हवेतील आर्द्रताही वाढते. नैसर्गिक वायुविजन पध्दतीत हवा खेळती राहण्यासाठी हरितगृहाच्या दोन्ही बाजु उघडल्या जातात. तसेच दिवसा एक्झॉट फॅनचाही उपयोग केला जातो.

उष्णता

हरितगृहातील तापमान खालीलप्रमाणे नियिंत्रत करता येते.

अ. फॅन पॅड पध्दत वापरुन

आ. गरत हवा बाहेर फेकुन

इ.  स्क्रिनचा वापर करुन

ई.  तुषार सिंचन पध्दतीचा वापर करुन

आर्द्रता

हरितगृहातील हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असत. त्यामुळे वनस्पतीची चांगली वाढ होते. हरितगृहात आर्द्रता ५०-८० टक्के असावी. यापेक्षा जास्त प्रमाण झाल्यास किड व रोगांचे प्रमाण वाढते. आर्द्रता कमी करण्यासाठी डीहयमीडीफायर्सचा वापर करावा.

हरितगृहातील वातावरण खालील पध्दतीने नियंत्रित करता येते.

  • हवा खेळती ठेवुन व गारवा निर्माण करुन
  • आर्द्रतेचे नियंत्रण करुन
  • सिंचन ठिबक ससुक्ष्म तुषार सिंचन पध्दत वापरुन
  • सुर्यप्रकाश नियंत्रित करुन

हरितगृहातील पिकांवरील रोग व त्यांचे नियंत्रण

प्रस्तावना

हरितगृहात तपमान, आर्द्रता, सुर्यप्रकाश, नियंत्रित केला जातो. त्यामुळे हरितगृहातील वातावरण तसे पिकांच्या वाढीस पोषक असते, तसेच ते रोगांच्यावाढीसही पोषक ठरते. त्यामुळे हरितगृहातील पिकांवर मोठया प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव होतो.व प्रभावी नियत्रंण न केल्यास पाहिजे त्या प्रतिची फुले मिळत नाही. व मोठया ‌प्रमाणावर नुकसान होते.

गुलाब

  • काळे ठिपके

हा रोग पावसळयात मोठया प्रमाणावर येतो. थंड हवामान असेल तर मोठया प्रमाणावर प्रसार होतो.या रोगामुळे पानांच्या दोन्ही बाजुस ५ ते ६ मि.मि. व्यासाचे काळपट ठिपके पडतात त्यामुळे पांनाची गाळ होवुन झाड पुष्कळदा पानविरहित होते.

नियंत्रणाचे उपाय

१.  झाडाखाली पडलेली रोगट पाने गोळा करुन जाळुन टाकावीत

२.  कॅप्टन ०.२ टक्के ची ७-१२ दिवासांच्या अंतराने फवारणी करावी तर बाविस्टीन ०.१ टक्के बेनलेट ०.१ टक्के किंवा बेलेटॉन ०.१ टक्के ची पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

  • भुरी

हा गुलाबावरील सर्वात महत्वाचा व त्रासदायक रोग आहे. उष्ण व कोरडी हवा या रोगास मानवते. एकदा का प्रादुर्भाव झाला की, मग संपुर्ण नियंत्रण अशक्य ठरते म्हणुन रोग होऊच नये म्हणुन खबरदारी घ्यावी. या रोगाची सुरुवातीपासुन लक्षणे म्हणजे कोवळया पानांवर, कळयावर, बुरशीचा पांढरट थर पसरतो. त्यामुळे कळया नीट उमलत नाहीत. उमल्या तरी त्यांचा आकार बदलतो व त्या आकुंचन पावतात.

नियंत्रणाचे उपाय

१. बाविस्टीन (०.१ टक्के) आणि बेलेटॉन (०.१ टक्के) सारखी आंतरप्रवाही बुरशीनाशके ३० दिवसाचा अंतराने फवारावीत.

२. सल्फर (०.२ टक्के) किंवा केराथेन (०.०५ टक्के) ७ ते १० दिवसांच्या अंतराने फवारल्यासही रोगाचे प्रभावी नियंत्रण होते.

  • मर

या रोगाचा प्रादुर्भाव छाटणी केलेल्या फाद्यातून होतो आणि झाड वरुन खालपर्यत वाळत जाते.

नियंत्रणचे उपाय

१. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.

२. छाटणीकरिता धारदार कात्री वापरावी.

३. कात्री ७० टक्के अल्कोहोल किंवा फॉरमॅलीनने प्रत्येक छाटणीपूर्वी निर्जंतुक करावी.

  • तांबेरा

या रोगाची सुरुवात पावसाळयाच्या सुरुवातीस पानाच्या खाली लहान लहान फुगवटे येऊन होते. सुरुवातीस हे फुगवटे तांबूस नारंगी असतात व नंतर ते काळे पडतात. झाडांना हा रोग झाला तर झाडे पहिल्याच वर्षी मरतात.

नियंत्रणाचे उपाय

१. डायथेन-एम-४५ (०.२ टक्के), व्हिटाव्हॅक्स (०.१ टक्के) किंवा झयनेब (०.२ टक्के) ची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

  • फांद्या मर

तांबूस पांढरट पटटे पाकळया व कळयावर दिसतात. नंतर हे पटटे संपूर्ण फुलावर उमटतात.व फुलांची कुज सुरु होते.हा रोग वाहतुकीत फांद्यांना लागलेल्या मारामुळे सुध्दा होतो व फांद्या मरतात.

नियंत्रणाचे उपाय

१. बाविस्टीन ०.२ टक्के फवारणी करावी.

जरबेरा

  • स्केलेरोशियम रॉट : ताबुंस रंगाचे पटटे जमिनीलगतच्या खोडावर येतात. त्यानंतर झाड पिवळे पडते. मोहरीच्या आकाराच स्कलरोशिया कुजलेल्या खोडावर आढळतात.पाण्याचा योग्य निचरा होत नसलेल्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

नियंत्राणाचे उपाय : वॅपामचा वापर करुन जमिनीचे निर्जतुकीकरण करावे.

  • फुट रॉट : या रोगाचा प्रादुर्भावामुळे खोड काळे पडते व कुजते. पाने व फुले मरतात.

नियंत्रणाचे उपाय : वॅपामचा वापर करुन जमिनीचे निर्जतुकीकरण करावे

  • मर : फुलांच्या पाकळयावर काळे ठिपके आढळतात. खोलवर लागवड,पाण्यात निचरा न होणारी जमीन व कोदंट वातावरण यामुळे रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होतो.

नियंत्राणाचे उपाय : कॅप्टन (०.७ टक्के) किंवा बेनलेट (०.१ टक्के) किंवा थायरम (०.१ टक्के) या द्रावणाची फवारणी करावी.

  • भुरी : या रोगामुळे धुरकट पांढ-या रंगाचे ठिपके झाडाच्या शेंडयावर व फुलदांडयावर येतात.

नियंत्रणाचे उपाय : पाण्यात मिसळणारे गंधक अथवा बेनलेट किंवा बाविस्टनची फवारणी करावी

  • पानांवरील ठिपके :वेगवेगळया आकाराचे व रंगाचे ठिपके पानांवर दिसतात.त्यांच्या प्रभावी नियत्रंणासाठी बोर्डो मिश्रण (०.१ टक्के) किंवा झायनेब (०.५ टक्के) किंवा झायरस (०.५ टक्के) या द्रावणाची फवारणी करावी.

कार्नेशन

  • फयुज्यॅरीयम बिल्ट : या रोगामध्ये फांद्याची मर होते. फांद्या व शेंडयाकडील भाग तांबुस पिवळसर पडतात. प्रादुर्भाव झालेल्या झांडाच्या फांद्या खोडपासुन अलगद उपटुन येतात.

नियंत्रणाचे उपाय

१. हरितगृहात स्वच्छता राखवी. रोपे रोगांपासुन मुक्त असावीत. लागवडीपुर्वी जमिनीचे निर्जतुकीकरण करुन घ्यावे.

२. कॅप्टन या बुरशीनाशकाची ठराविक दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. तर बेनलेटचे द्रावण जमिनीत ओतण्यासाठी वापरावे.

फिलोफोरा बिल्ट : या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षण म्हणजे हिरवट तपकिरी पटटे शेडयांवरील भागावर दिसतात तर खोड रंगविहित होते. नंतर झाड मरुन जाते.

नियंत्रणाचे उपाय

१. हरितगृहात स्वच्छता राखावी लागवडीसाठी निरोगी रोपे वापरावीत झाडांना पाणी देताना विशेष काळजी घ्यावी.

२. प्रभावी नियंत्रणासाठी बेनोमिलचे द्रावण ठराविक दिवसांच्या अंतराने जमिनीत ओतावे.

  • खोडकुज

या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फांद्या व मुळे कुजतात.त्यामुळे प्रादुर्भाव झालेले झाड एका आठवडयत मरते.

नियंत्रणाचे उपाय : फयुजॅरीयम बिल्ट रोगाप्रमाणे नियंत्रण करावे.

  • पानावरील ठिपके फांदीकुज - झाडयाच्या शेंडयावरील भागावर जांभळट रंगाचे ठिपके आढळतात. मग पानाच्या देठाजवळुन कुजणे सुरु होते तर छाट कलमांच्या जमिनीत असलेला भाग कुजतो.

नियंत्रणाचे उपाय : निरोगी झाडापासुन छाट कलम घ्यावीत. सात दिवसांच्या अंतराने (डायथेन-एम ४५ ०.१ टक्का) अथवा कॅप्टन(०.२ टक्का) ची फवारणी करावी.

  • तांबेरा : तांबुस रंगाचे पानांवर ,खोडावर तसेच फुलांच्या देठावरीलही दिसुन येतात प्रादुर्भाव झालेल्या झाडांची वाढ खुटंते व पाने चुरगळयासारखी होतात.

नियंत्रणाचे उपाय

१. हरितगृहातील वातावरण हवेशीर ठेवावे.

२. झायनेब या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

 

स्त्रोत : कृषी विभाग , महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate