आंतरमशागतीसाठी वापरण्यात येण्यारया अवजाराविषयी येथे माहिती देण्यात आलेली आहे.
ऊस शेतीसाठी अनेक औजारे आणि यंत्रे उपयोगी आहेत. त्यामध्ये ऊस लागवनी यंत्र (प्लांटर) अतिशय उपयुक्त असते.
या विभागात "उस गाठी खुडे" या ऊसाच्या गाठी खुडन्यासाठीच्या उपकरनासंबधीची माहिती दिली आहे.
शेताच्या प्राथमिक मशागतीनंतरची ऊस लागवडीची सर्व कामे या यंत्राच्या साह्याने एकाच वेळी केली जातात.
कडबाकुट्टी मशिन वापरण्यास सुरू करण्याअगोदर त्याचे सर्व गिअर्स, बेअरिंग्ज यांना वंगण देणे गरजेचे आहे.
धान्य साठवून ठेवताना त्याला कीड लागू नये याची काळजी घेणे गरजेचे असते. या विभागात धान्याच्या कीटक व्यवस्थापनासाठीच्या विविध उपकरणांची / उपायांची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाद्वारे विवध कृषी यंत्रसामग्री व अवजारांची निर्मिती व विक्री केली जाते.
शेतीमध्ये विविध कामांसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे खरेदी करणे छोट्या व मोठ्याही शेतकऱ्यांसाठी अव्यवहार्य बाब आहे.
ट्रॅक्टरचलित "क्रिडा' टोकणयंत्राचा वापर केल्यास उत्पादनखर्चामध्ये बचत होऊन उत्पादनवाढीसाठी मदत होते.
दुधातील स्निग्धांश वेगळे करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योगात क्रीम अथवा मलई सेपरेटर वापरतात.
कीडनाशक सापळ्यांचा मुख्य उपयोग शत्रुकीटकांना आकर्षित करून त्यांचे नियंत्रण करणे हाच आहे.
गहू हे पीक सुरवातीच्या काळात तणांच्या स्पर्धेसाठी संवेदनशील आहे. पिकांची उत्पादकता कमी होऊन 70 ते 80 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. आंतरमशागतीद्वारे तणनियंत्रण केल्यास पिकांनाही फायदा होतो.
हार्ड पॅन व जमिनीखालचा अच्छिद्र भाग फोडून जमिनीत हवा खेळती ठेवणे, तसेच जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी सबसॉयलरचा वापर फायदेशीर ठरतो.
अन्नधान्य साठविण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक गोदाम पद्धतीच्या तुलनेमध्ये सायलो पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे धान्य साठविणे शक्य होते.
ट्रॅक्टरचे व्यवस्थापन हे कामाच्या तासावरून केले जाते. ट्रॅक्टरचा वापर करताना चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी.
ट्रॅक्टरची नियमित देखभाल केल्यास ट्रॅक्टरची काम करण्याची क्षमता व आयुष्य वाढते. त्यासाठी निरीक्षण, ॲडजस्टमेंट व दुरुस्ती या त्रिसूत्री लक्षात ठेवावी.
धन्याचा वापर लावण्यासाठी किंवा धने डाळ करण्याआधी ते फोडावे लागतात. या विभागात धने फोडण्यासाठी जे बाजारात यंत्र उपलब्ध आहे त्यासंबधी माहिती दिली आहे.
या यंत्राच्या लोखंडी सांगाड्यावर बी व खतपेटी बसविलेली आहे. बीजपेटीतील बियाणे प्रमाणित करण्यासाठी खाचा असलेला रोलर दिलेला आहे.
लहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर वीडर, ग्रास कटर, आधुनिक फवारणी यंत्र आणि 10 ते 25 अश्वशक्तीचे ट्रॅक्टर्स उपलब्ध झाले आहेत.
तुरीवर प्रक्रिया करून डाळ बनविण्याकरिता मिनी डाळ मिल विकसित करण्यात आली.
पॉवर टिलरसोबत काम करीत असताना अंगावर सैल कपडे वापरू नयेत, तोंडावर व डोक्यावर चांगल्या कपड्याने गुंडाळून घ्यावे.
कमीत कमी 35 अश्वशक्तीवर चालणाऱ्या या टोकण यंत्राने आठ तासांत तीन ते साडेतीन हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येते.
ज्वारी, मका, भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, हरभरा इत्यादी पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
अलीकडच्या काळात बेदाणे निर्मितीमध्ये बदल झाला आहे. मळणी यंत्र, फोल काढायचे यंत्र, सॉर्टर यंत्रामुळे बेदाणा प्रतवारी आणि गुणवत्तावाढीमध्ये सुलभता आली आहे. मजूर टंचाईमुळे यंत्राचा वापर वाढतो आहे.
ठाणे जिल्ह्यातील विरार परिसरातील नंदाखाल येथील कैतन पास्को लोपिस ऊर्फ एस. के. बाबा यांनी भात झोडणी यंत्र विकसित केले आहे.
हे यंत्र 6.5 एच. पी. पेट्रोल इंजिनवर चालते. याला समोरील बाजूस विविध यंत्रे जोडण्याची व्यवस्था केलेली आहे. यंत्राला दोन टेन्शन क्लच दिले आहेत.
रोटाव्हेटरचे आयुष्यमान वाढविण्यासाठी व इतर अडचणी कमी करण्यासाठी ट्रॅक्टरचा पी.टी.ओ. शाफ्ट सरळ रेषेत कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी
विद्युत मोटार आय.एस.आय. मान्यताप्राप्त असावी. मोटारीची किंमत वाजवीपेक्षा अधिक असू नये.
पेरणी यंत्राबाबत माहिती येथे देण्यात आली आहे.
या पद्धतीचा अवलंब करताना किडींना आपल्याकडे आकर्षित करणारे पीक म्हणजे सापळा पीक.