1) कडबाकुट्टी मशिन वापरण्यास सुरू करण्याअगोदर त्याचे सर्व गिअर्स, बेअरिंग्ज यांना वंगण देणे गरजेचे आहे. वंगणासाठी कोणतेही मिनरल तेल किंवा कॅस्टर तेल वापरावे. मशिनची दोन पाती कानशीच्या साह्याने धारदार करावीत. जर या पात्यांची कापणारी बाजू जास्तच बोथट झाली असल्यास ग्राइंडरवर पात्यांना एका बाजूने योग्य प्रमाणात धार करावी.
2) चाऱ्याला आधार देणारी शिअर पट्टी व चाकाबरोबर फिरणारे धारदार पाते यामधील अंतर (क्लिअरन्स) कमीत कमी असावा म्हणजे चारा चांगल्याप्रमाणे कापला जातो. हा क्लिअरन्स निश्चित करताना धारदार पाते पट्टीला अडकणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घ्यावी.
3) मशिनचे सर्व ढिले नट-बोल्ट्स व स्क्रू घट्ट आवळावेत. दिवसभराच्या कामानंतर गिअर व बेअरिंग्जवर पडलेला कचरा व घाण स्वच्छ करावी.
4) जेव्हा मशिन कामात नसेल तेव्हा त्याचे फिरणारे चाक (फ्लायव्हील) लॉक करून ठेवावे, म्हणजे लहान मुलांपासून होणारे अपघात टाळता येतात.
5) मशिनचे बहुतांश भाग प्रामुख्याने फिरणारे चाक (फ्लायव्हील) यांना हातोड्याचे घाव सहन होत नाहीत, त्यामुळे मशिन दुरुस्ती करत असताना याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
6) दिवसभराच्या कामानंतर गिअर व बेअरिंग्जवर पडलेला कचरा व घाण स्वच्छ करावी, तसेच धारदार पात्यावरील ओल्या कडब्यातील पाणी जमा झाले असल्यास ते स्वच्छ करून पाती कोरडी ठेवावीत.
7) जेव्हा मशिन कामात नसेल तेव्हा त्याचे फिरणारे चाक (फ्लाय व्हील) लॉक करून ठेवावे म्हणजे लहान मुलांपासून होणारे अपघात टाळता येतात.
8) वर्षातून किमान एकदा सर्व मशिन सुटे करावे व केरोसिनने सर्व भाग स्वच्छ धुवावेत. बिघाड झालेल्या भागांची दुरुस्ती करावी आणि पुन्हा वापरासाठी सर्व मशिनची जोडणी करावी.
9) मशिनचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ते आच्छादन वापरावे.
10) मशिनचे बहुतांश भाग प्रामुख्याने फिरणारे चाक (फ्लाय व्हील) यांना हातोड्याचे घाव सहन होत नाहीत. त्यामुळे मशिन दुरुस्त करीत असताना याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
लेखक -जयंत घाटगे,
कृषी यंत्रे व शक्ती विभाग,
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,
तळसंदे, जि. कोल्हापूर
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस आंतरमशागतीसाठी कोणती अवजारे वापरावीत याबाबतची म...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...
ऊस शेतीसाठी अनेक औजारे आणि यंत्रे उपयोगी आहेत. त्य...
आंतरमशागतीसाठी वापरण्यात येण्यारया अवजाराविषयी ये...