অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गहू पिकातील तणनियंत्रणासाठी मोगी कोळपे फायदेशीर

गहू पिकातील तणनियंत्रणासाठी मोगी कोळपे फायदेशीर

गहू पिकातील तणे

  • तणे पिकांशी पाणी, अन्नांश, सूर्यप्रकाश, हवा व जागा या बाबत पिकांशी स्पर्धा करतात. तणांचे बी धान्यामध्ये मिसळले जाते. पर्यायाने निवडण्याचा खर्च वाढतो. कीड व रोग पसरविणाऱ्या जीवजंतूंना तणे आश्रय देतात.
  • गव्हामध्ये प्रामुख्याने वसंतवेल, चांदवेल, रानपैजी, सेंजी, कृष्णनील, गाजर, दीपमाळ, केना, पिवळा धोतरा, हरळी, चिमणचारा, पोहली इत्यादी ही तणे आढळतात.

आंतरमशागतीद्वारे तण नियंत्रणाचे फायदे

गव्हामध्ये तण नियंत्रणाच्या विविध पद्धती असल्या तरी आंतरमशागतीद्वारे तणनियंत्रण केल्यास अनेक फायदे होतात.

  • आंतरमशागतीमुळे जमिनीतील हवेच्या पोकळ्या मोकळ्या होऊन गव्हाच्या मुळांना हवेचा चांगला पुरवठा होतो. पिकाच्या मुळांची पर्यायाने चांगली वाढ होते. तसेच फुटव्याच्या संख्येत वाढ होते.
  • गहू पिकाच्या पेरणीनंतर 23 ते 30 दिवसांनी पहिली खुरपणी तर 45 ते 50 दिवसांनी दुसरी खुरपणी /आंतरमशागत करावी. आंतरमशागत करताना मुळांना इजा पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी.

गहू पिकामध्ये मोगी एकचारी कोळप्याची उपयुक्तता

  • गहू पिकाच्या दोन ओळीतील अंतर 22.5 सें.मी. असते. अशा कमी अंतरावरील पिकांमध्ये बैलचलित अवजारांचा वापर शक्‍य होत नाही.
  • मजुरांकडून तणनियंत्रण करणे खर्चिक ठरते. अशा परिस्थितीत मोगी- एकचाकी सुधारित कोळपे उपयुक्त ठरते.
  • हे कोळपे कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी विकसित केले आहे.
  • मोगी कोळप्याला 6.8, 10 इंच रुंदीचे तीन पाते येतात. त्यापैकी गहू पिकामध्ये 6 इंच रुंदीचे पाते वापरण्यास सोयीचे आहे.

मोगी कोळप्याची वैशिष्ट्ये

  • पिकांच्या मुळांना इजा होत नाही.
  • खुरपणीची खोली 3 सें.मी. असते.
  • एका मनुष्याद्वारे चालवता येते.
  • एका दिवसात एक एकर क्षेत्रावर कोळपणी करता येते.
  • 15,20 आणि 25 सें.मी. असे तीन पाते असल्याने मध्यम ते हलक्‍या जमिनीत कोणत्याही पिकात वापरता येते.
  • कोळप्याचे वजन 7 किलो आहे. कोळपे सहज उचलून नेता येते.
  • निंदणी, खुरपणी, कोळपणी, मातीची भर देणे, पाणी देण्यासाठी सऱ्या ओढणे अशी कामे या मोगी कोळप्याने करता येतात.

 

    स्त्रोत -अग्रोवन



    © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate