1) कमीत कमी 35 अश्वशक्तीवर चालणाऱ्या या टोकण यंत्राने आठ तासांत तीन ते साडेतीन हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येते. या यंत्रात 22.5 सें.मी. अंतरावरील पिकासाठी नऊ ओळी, 30 सें.मी. अंतरावरील पिकांसाठी सात ओळी व 45 सें.मी. अंतरावरील पिकांसाठी पाच ओळी एकाच वेळेस पेरता येतात.
2) हे पेरणी अवजार ट्रॅक्टरचलित असून, या अवजाराने ज्वारी, सूर्यफूल, करडई, मका, हरभरा, सोयाबीन इ. पिकांची पेरणी करता येते. यामध्ये बियाणे नियंत्रित करण्यासाठी प्लॅस्टिक रोटर वापरले आहेत. तसेच खतनियंत्रणासाठी फल्युटेड रोलरची व्यवस्था आहे. फणांतील अंतर कमी-जास्त करता येते. स्प्रिंग-क्लचच्या साह्याने बियाणे व खते पाडणे थांबविता येते किंवा चालू करता येते.
3) या यंत्राने सात ते नऊ ओळी एका वेळेस पेरता येतात. रासणीसाठी यंत्राच्या मागील बाजूस फास बसविलेला आहे. त्यामुळे बी झाकले जाऊन थोड्या प्रमाणात तणही निघते. 35 हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरने हे अवजार चालविता येते.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन