অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विविध प्रकारची पेरणी यंत्रे

 

बैलचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र


या यंत्राद्वारा भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, गहू, ज्वारी, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. 
  • दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर आणि बियाण्याच्या बाजूला देता येते.
  • बियाण्याच्या पेट्या स्वतंत्र असल्यामुळे आंतरपिकांची टोकणसुद्धा करता येते.
  • या यंत्राद्वारा दोन ओळींतील अंतर 22.5 सें. मी., 30 सें. मी. आणि 45 सें. मी. राखता येते.
  • एका दिवसात जवळजवळ 1 ते 1.5 हेक्‍टर क्षेत्रावर टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

ट्रॅक्‍टरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र


या यंत्राद्वारा भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते. 
  • या यंत्रात 22.5 सें. मी. अंतरावरील पिकासाठी 9 ओळी, 30 सें. मी. अंतरावरील पिकासाठी 7 ओळी आणि 45 सें. मी. अंतरावरील पिकासाठी 5 ओळी एकाच वेळेस पेरता येतात.
  • शिफारशीप्रमाणे ओळींतील आणि दोन रोपांतील योग्य अंतर राखता येते.
  • प्रत्येक फणाच्या बियाण्याच्या पेट्या वेगळ्या असल्याने तुरीसारख्या आंतरपिकांचे टोकण करता येते.
  • हे यंत्र 35 अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्‍टरवर चालते.
  • एका दिवसात 3 हे. क्षेत्रावर पेरणी करता येते.

कमी अश्‍वशक्ती ट्रॅक्‍टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र


या यंत्राद्वारा विविध पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते, तसेच शिफारशीनुसार दाणेदार खतांची मात्रा देता येते. दोन ओळींतील, तसेच दोन रोपांतील अंतर सारखे राखता येते. 
  • या यंत्राची कार्यक्षमता 1.5 हे. प्रति दिवस इतकी आहे.

पॉवरटिलरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र

या यंत्राद्वारा मका, भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. दोन ओळींतील अंतर 22.5, 30 अथवा 45 सें. मी. राखता येते. हे यंत्र 12 अश्‍वशक्तीच्या पॉवरटिलर चालविले जाते.

ट्रॅक्‍टरचलित फुले सरी- वरंबा बहुपीक टोकण यंत्र


  • या यंत्राद्वारा विविध पिकांची सरी- वरंबा टोकण पद्धतीने पेरणी करता येते, तसेच सरीच्या दोन्ही बाजूंना टोकण पद्धतीने बियाण्यांची पेरणी करता येते. सरीच्या अंतरानुसार लागवडीचे अंतर बदलता येते.
  • हे यंत्र 55 अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्‍टरवर चालते.
  • या यंत्राची कार्यक्षमता 0.45 हेक्‍टर प्रति तास असून, जिरायती शेती क्षेत्रासाठी या यंत्राची विशेष शिफारस करण्यात आली आहे.

संपर्क - 02426- 243219 
कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate