অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बहुपीक टोकण यंत्र

यंत्राची वैशिष्ट्ये

  • ज्वारी, मका, भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, हरभरा इत्यादी पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
  • बियाण्यांबरोबरच दाणेदार खतेसुद्धा शिफारशीनुसार देता येतात.
  • आवश्‍यकतेनुसार पिकांच्या ओळींतील अंतर 22.5, 30 किंवा 45 सें.मी. ठेवता येते.
  • आंतरपीक घेण्यासाठी सोईस्कर.
  • दिवसाला एक ते सव्वा हेक्‍टर क्षेत्रावर टोकण करता येते.

रोटोटिल ड्रील

रोटोटिल ड्रील हे यंत्र पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना येथे विकसित करण्यात आले आहे. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यात पुढच्या बाजूला 1.6 मीटर लांबीचा रोटाव्हेटर बसविलेला आह. पाठीमागे बियाणे व खते पेरण्यासाठी यंत्रणा आहे. पहिले पीक काढल्यानंतर ताबडतोब दुसरे पीक पेरले जाते. पुढच्या बाजूस असलेल्या रोटाव्हेटरमुळे शेताची मशागत होते. या यंत्राचे वजन 450 ते 500 कि.ग्रॅ. असून, हे यंत्र चालविण्यासाठी 50 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्‍टर आवश्‍यक आहे. 

02426 - 243219 
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate