অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोटाव्हेटर

 

रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यासाठी जादा शक्तीची गरज असते. ही शक्ती रोटाव्हेटरचा रोटर फिरविण्यासाठी, ट्रॅक्‍टरला योग्य गती देण्यासाठी; तसेच खोलवर मशागत होऊन माती मिसळण्यासाठी आवश्‍यक असते. तेव्हा पुरेशा अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर निवडणे गरजेचे असते. रोटाव्हेटरचे आयुष्यमान वाढविण्यासाठी व इतर अडचणी कमी करण्यासाठी ट्रॅक्‍टरचा पी.टी.ओ. शाफ्ट सरळ रेषेत कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी. ट्रॅक्‍टर व रोटाव्हेटरला जोडणाऱ्या प्रोपेलर शाफ्टची लांबी योग्य प्रमाणामध्ये ठेवावी. जेव्हा रोटाव्हेटर उचललेला असेल, तेव्हा युनिव्हर्सल जॉइंटचा कोन 40 अंशांपेक्षा जास्त नसावा. पी.टी.ओ. शाफ्टला योग्य प्रकारे वंगण द्यावे. वंगणाअभावी ट्रॅक्‍टरच्या पी.टी.ओ. शाफ्टमधील आणि रोटाव्हेटरच्या गिअर बॉक्‍समधील बेअरिंग्ज आणि सील खराब होणार नाहीत.

दररोजची देखभाल

संपूर्ण मशिनला वंगण द्यावे व सर्व ग्रीसिंग पॉइंट्‌सना ग्रीस लावावे. रोटाव्हेटरच्या गिअरबॉक्‍समधील वंगण तेलाची पातळी तपासावी व गरज असल्यास योग्य पातळीपर्यंत वंगण तेल भरावे. रोटाव्हेटरच्या रोटावरची नांग्यांची पाती ढिली झालेली नाहीत, तसेच वाकलेली किंवा मोडलेली नाहीत याची खात्री करून घ्यावी; तसेच नांग्यांच्या पुढच्या कडांची झीज तपासावी. मशिनचे सर्व नट-बोल्ट्‌स घट्ट आवळून बसवावेत. रोटरच्या बेअरिंगमध्ये काडी-कचरा किंवा तार किंवा इतर काही रोटरसोबत गुंडाळलेले नाही याची खात्री करून घ्यावी.

कालांतराने करावयाची देखभाल


रोटाव्हेटरच्या रोटरवरील नांग्यांची तपासणी करावी. नांग्यांची पाती वाकलेली असल्यास हूक - पाना वापरून सरळ करावीत. नांग्या खराब झाल्या असल्यास बदलाव्यात. रोटाव्हेटरच्या गिअरबॉक्‍समधील वंगण तेलाची पातळी तपासावी, तसेच सर्व वंगण तेल बाहेर काढून गिअरबॉक्‍स स्वच्छ करावा व नवीन वंगण तेलाने भरावा. रोटाव्हेटरचे चेनकव्हर काढून चेन व स्प्रॉकेट चाकाची झीज तपासावी, तसेच चेनचा ताणही तपासावा व चेनला वंगण द्यावे. सर्व बेअरिंग्ज तपासावेत व त्यांना वंगण द्यावे. रोटाव्हेटरचा रोटर व रोटरवरील नांग्यांच्या पात्यांची मांडणी तपासावी. 
संपर्क - सुहास पाटील - 9823381191

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate