कोथिंबिरीच्या बिया उर्फ धणे लावण्याआधी तसेच त्यांचा मुखवास (माउथ फ्रेशनर) म्हणून वापर करण्यापूर्वी त्यांचे दोन भाग करणे गरजेचे असते. हे काम पारंपारिक पद्धतीने हातांनीच केले जाते मात्र एकतर ते जरा किचकट आणि वेळखाऊ आहे तसेच धणे नीट न फुटल्याचे विपरित परिणाम नंतर एकंदर उत्पादनावरही दिसून येतात. त्यामुळे हे काम यंत्राने करणे आवश्यक बनले. म्हणूनच सायफेट (CIPHET) मध्ये असे यंत्र बनवण्यात आले आहे. हे यंत्र १ अश्वशक्तीच्या मोटरवर चालते आणि दरताशी ६० ते ८० किलो धणे फोडले जातात. ह्यामध्ये ६.५ सेंमी व्यासाचे आणि १० सेंमी लांबीचे दोन रोलर असतात व त्यांच्या फिरण्याच्या वेगात फरक असल्याने धण्याचे दोन भाग होतात. केलेल्या कामाची मोजणी करण्यासाठी गियर्सवर चालणारी यंत्रणा आहे. हे यंत्र १४.२ % पर्यंत आर्द्रता असलेले धणे फोडू शकते.
अंतिम सुधारित : 10/7/2020
सुधारित खत पेरणी अवजाराच्या साह्याने ऊस लागणीपूर्व...
ऊस शेतीसाठी अनेक औजारे आणि यंत्रे उपयोगी आहेत. त्य...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...
ऊस आंतरमशागतीसाठी कोणती अवजारे वापरावीत याबाबतची म...