अॅसिटोबॅक्टर डायझोट्रॉफिकस हे जीवाणू नत्र स्थिर करू शकते हे सर्व प्रथम डॉब्रीनर यांनी (१९८८) दाखवून दिले. अॅसिटोबॅक्टर या जीवाणूच्या वापरामुळे एकरी ७-१० टन वाढ होते. तसेच रासायनिक खताच्या मात्रेत ५०% घट होऊन साखरेचा उतारा ०.५-१% वाढतो.
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये प्रवेश करतात. हे जीवाणू असणाऱ्या ऊसातील रस कीटक शोषून घेतात. त्या रसाबरोबर हे जीवाणू किटकच्या पोटात व शरीराला चिकटतात. नंतर हे कीटक नवीन ऊसाच्या रोपावर बसतात तेव्हा हेच जीवाणू नवीन रोपात प्रवेश करतात. तांबडे कीटक, पीठे ढेकूण यांनी ऊसाची पाने व खोडला इजा केल्यामुळे पानातून व खोडातून रस बाहेर येतो, त्यामध्ये साखर असते व तो रस आम्ल असल्यामुळे अॅसिटोबॅक्टर जीवाणू या रसातही मोठ्या प्रमाणात वाढतात व त्याचा प्रसार होतो. ज्याद्वारे जीवाणूंचा प्रसार होतो ती तिसरी पद्धत म्हणजे मायकोरायझा. ही मायकोरायझा बुरशी ऊसाच्या मुळात प्रवेश करते व मुळामध्ये या जीवाणूचे बीज तयार होतात. ऊसामध्ये जर अॅसिटोबॅक्टर असतील तर तयार झालेल्या मायकोरायझाच्या बीजाणूमध्येही हे जीवाणू असतात. नंतर हे बीजाणू दुसऱ्या ऊसाच्या मुळाभोवती येऊन त्यापासून धागे तयार झाल्यावर अॅसिटोबॅक्टर धाग्याबरोबर मुळामध्ये व नंतर ऊसाच्या खोडात जातात. त्याचप्रमाणे ज्या पिकामध्ये हे जीवाणू वापरले त्या पिकाच्य मुळावर, खोडामध्ये अथवा पानामध्ये अॅसिटोबॅक्टर जीवाणू जास्त प्रमाणात असतात. परंतु, ज्या पिकामध्ये हे जीवाणू वापरले नाहीत, त्या पिकाच्या अवयवामध्ये हे जीवाणू लक्षणीय कमी प्रमाणात आढळतात.
माहितीदाता: पृथ्वीराज गायकवाड
स्त्रोत: जीवाणू खते
अंतिम सुधारित : 4/26/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...