कीटकनाशके वापरतांना काळजी
शेतकर्यांनी कीटकनाशके खरेदी करतांना आणि वापरतांना घ्यावयाची सुरक्षाविषयक काळजी
खरेदी करतांना
हे करा
|
हे करु नका
|
कायदेशीर परवाना असणार्या नोंदणीकृत कीटकनाशक डीलरकडूनच कीटकनाशके/जैवकीटकनाशके खरेदी करा.
|
पदपथावरील/रस्त्याच्या कडेला बसणार्या किंवा कायदेशीर परवाना नसणार्या व्यक्तीकडून कीटकनाशके खरेदी करु नका.
|
दिलेल्या भागात वापरण्यासाठी एक वेळ पुरेल एवढेच कीटकनाशक खरेदी करा.
|
संपूर्ण हंगामासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक खरेदी करू नका.
|
कीटकनाशकांच्या पॅकवर/डब्यांवर मान्यतेची लेबल्स नीट पाहून घ्या.
|
मान्यतेची लेबल्स नसलेली कीटकनाशके खरेदी करू नका.
|
आवरणावरील बॅच नं., नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख/अंतिम मुदत इत्यादि बाबी तपासा.
|
अंतिम मुदत संपलेली कीटकनाशके कधीही खरेदी करू नका.
|
डब्यांत व्यवस्थित पॅक केलेलीच कीटकनाशके खरेदी करा.
|
ज्या डब्यांतून/पॅकमधून गळती होत असेल, डब्याचे/पॅकचे आवरण सैल झाले असेल किंवा सीलबंद नसेल तर अशी कीटकनाशके खरेदी करू नका.
|
|
|
साठवणीच्या वेळी
हे करा
|
हे करु नका
|
- कीटकनाशके घराच्या आवारापासून दूर साठवा.
- कीटकनाशके त्यांच्या मूळच्या डब्यांतच साठवून ठेवा.
- कीटकनाशके आणि तणनाशके वेगवेगळी साठवून ठेवा.
- जेथे कीटकनाशके साठवली असतील तिथे धोक्याची इशारा निर्देश लावून ठेवा.
- कीटकनाशके लहान मुले आणि इतर पाळीव प्राणी यांच्यापासून दूर साठवून ठेवावीत.
- साठवणीची जागा थेट ऊन आणि पाऊस यांपासून सुरक्षित असावी.
|
- कीटकनाशके घराच्या परिसरांत साठवू नका.
- कीटकनाशके त्यांच्या मूळच्या डब्यांखेरीज इतरत्र साठवून ठेऊ नका.
- कीटकनाशके आणि तणनाशके एकत्र साठवू नका.
- लहान मुलांना साठवणीच्या खोलीत जाऊ देऊ नका.
- कीटकनाशके थेट ऊन किंवा पावसात ठेवू नका.
|
|
|
वापरतांना
हे करा
|
हे करु नका
|
- परिवहनाच्या दरम्यान कीटकनाशके वेगळी ठेवा.
- कीटकनाशके आणि खाद्यपदार्थ कधीही एकत्र ठेवू नका/ने आण करू नका.
|
- मोठ्या प्रमाणात असणारी कीटकनाशके अत्यंत सांभाळून वापरण्याच्या जागी न्यावीत.
- मोठ्या प्रमाणात असणारी कीटकनाशके कधीही डोक्यावरुन, खांद्यावरुन किंवा पाठीवरुन वाहून नेऊ नका.
|
|
|
फवारणीसाठी द्रावण तयार करतांना
हे करा
|
हे करु नका
|
- नेहमी स्वच्छ पाणी वापरा.
- संरक्षक कपडे वापरा. उदा. हातमोजे, चेहर्याचा मास्क, टोपी, ऍप्रन, पूर्ण विजार, इ. जेणेकरुन पूर्ण शरीर झाकले जाईल.
- नाक, डोळे, कान, हात यांना कीटकनाशकाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
- कीटकनाशकाच्या डब्यावर लिहिलेले निर्देश वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा.
- गरजेपुरतेच द्रावण तयार करा.
- पूड स्वरूपात असणारी कीटकनाशके ही अशीच वापरावीत.
- फवारणीची टाकी भरतांना कीटकनाशक आजूबाजूला सांडणार नाही याची दक्षता घ्या.
- दिलेल्या प्रमाणातच कीटकनाशके वापरा.
- तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नका.
|
- गढूळ किंवा घाण पाणी वापरू नका.
- संरक्षक कपडे वापरल्याशिवाय कधीही फवारणी द्रावण तयार करू नका.
- शरीराच्या कोणत्याही भागावर कीटकनाशक पडणार नाही याची काळजी घ्या.
- निर्देश न वाचता कधीही कीटकनाशक वापरू नका.
- तयार केलेले द्रावण 24 तासांनंतर कधीही वापरू नका.
- पूड कधीही पाण्यात मिसळू नका.
- फवारणीच्या टाकीचा कधीही वास घेऊ नका.
- जास्त प्रमाणात कीटकनाशके वापरू नका, त्यामुळे पिकांना आनि पर्यावरणाला धोका निर्माण होतो.
- कीटकनाशकांचे काम पूर्ण होइपर्यंत काही ही खाऊपिऊ नका तसेच धूम्रपान करू नका किंवा काही ही चघळू नका.
|
|
|
उपकरणांची निवड करणे
हे करा
|
हे करु नका
|
- योग्य प्रकारची साधने निवडा.
- योग्य आकाराच्याच नोझल वापरा.
- कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी वेगवेगळी फवारणी यंत्रे वापरा.
|
- गळणारी किंवा दोष असणारी साधने वापरू नका.
- दोष असणार्या/मान्यता नसणार्या नोझल वापरू नका. चोंदलेली नोझल्स तोंडाने साफ करू नका. त्याऐवजी फवारणी यंत्राबरोबर असणारे टूथब्रश वापरा.
- कधी ही कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी एकच फवारणी यंत्र वापरू नका.
|
|
|
फवारणी द्रावण फवारतांना
हे करा
|
हे करु नका
|
- सांगितलेले प्रमाण आणि द्रावण वापरा.
- शांत आणि थंड दिवशी फवारणी करा.
- साधारणतः व्यवस्थित उजेड असलेल्या दिवशी फवारणी करा.
- प्रत्येक फवारणीसाठी आवश्यक ते फवारणी यंत्र वापरा.
- फवारणी वार्याच्या दिशेने करावी.
- फवारणी झाल्यानंतर उपकरणे आणि बादल्या स्वच्छ पाणी आणि साबण वापरुन धुवावीत.
- फवारणी झाल्यानंतर लगेचच कोणाही पाळीव प्राण्याला/व्यक्तीला शेतात जाऊ देऊ नये.
|
- कधी ही सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आणि उच्च तीव्रता असलेले कीटकनाशक वापरू नका.
- उष्ण आणि भरपूर वारा असलेल्या दिवशी फवारणी करु नका.
- पावसाच्या अगदी आधी किंवा लगेचच नंतर फवारणी करू नका.
- इमल्सिफायेबल कॉन्सेन्ट्रेड द्रावणे बॅटरीवर चालणार्या
- ULV फवारणी यंत्रामध्ये वापरू नका.
- वार्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नका.
- कीटकनाशके मिसळण्यासाठी वापरलेले डबे, बादल्या व्यवस्थित धुतल्यानंतर ही कधी ही घरगुती वापरासाठी घेऊ नयेत.
- संरक्षक कपडे घातल्याशिवाय नुकतीच फवारणी केलेल्या शेतात कधीही जाऊ नये.
|
|
|
फवारणीनंतर
हे करा
|
हे करु नका
|
- राहिलेल्या द्रावणाची सुरक्षित ठिकाणी (उदा. पडीक/ निर्मनुष्य क्षेत्र) विल्हेवाट लावा.
- वापरलेले/रिकामे डबे दगड/काठीच्या साह्याने चेपा आणि त्यांना दूर निर्मनुष्य ठिकाणी, आजुबाजूला पाण्याचा स्त्रोत नसलेल्या ठिकाणी खोल मातीमध्ये पुरुन टाका.
- खाण्यापिण्यापूर्वी/धूम्रपान करण्यापूर्वी हातपाय व तोंड पाणी व साबणाने स्वच्छ धुवा.
- विषबाधा झाल्याची लक्षणे दिसू लागल्यास प्रथमोपचार करा आणि रुग्णाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरांना रिकामा डबादेखील दाखवा.
|
- राहिलेले द्रावण पाण्याच्या स्त्रोतांमध्ये किंवा त्यांच्या जवळ फेकून देऊ नका.
- वापरलेले/रिकामे डबे इतर वस्तू साठवण्यासाठी वापरात आणू नका.
- आंघोळ न करता किंवा कपडे न धुता काही ही खाऊपिऊ/धूम्रपान करू नका.
- विषबाधा झाल्याची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाणे टाळू नका कारण त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
|
|
|
स्त्रोत: www.ppqs.gov.in
अंतिम सुधारित : 12/20/2019
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.