অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निंबोण्यांचा अर्क

निंबोण्यांचा अर्क (एनएसकेई) तयार करणे

निंबोण्या Extract (NSKE) preparation

( % द्रावण )

आवश्यक सामुग्री

५% शक्तीचे १०० लिटर निंबोणीचा अर्क तयार करण्यासाठी

  • कडुनिंबाच्या निंबोण्या (पूर्णपणे सुकलेल्या) – ५ किग्रॅ
  • पाणी (चांगले व स्वच्छ) – १०० लिटर
  • साबण (२०० ग्रॅम)
  • गाळण्यासाठी कापड

बनवण्याची पद्धत

  • गरजेप्रमाणे निंबोण्या ( ५ किग्रॅ ) घ्या
  • त्या दळून त्यांची पावडर बनवा
  • १० लिटर पाण्यात ही पावडर रात्रभर भिजवा.
  • दुसर्याू दिवशी सकाळी लाकडी काठीने हे पाणी दुधासारखे पांढरे दिसेपर्यंत ढवळा
  • दुहेरी कापडातून गाळून एकंदर १०० लिटर बनवा
  • ह्यामध्ये १% साबण घाला (प्रथम साबणाची पेस्ट बनवा व नंतर ती सर्व पाण्यात मिसळा)
  • चांगले ढवळून वापरा

 

टीप

  • निंबोण्या धरतेवेळीच झाडावरून गोळा करा आणि सावलीत वाळवा
  • आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोण्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही
  • नेहमी निंबोण्यांचा ताजा अर्क (NSKE) वापरा.
  • योग्य परिणाम मिळण्यासाठी दुपारी ३.३० नंतर तो फवारा.

 

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate