या विभागात पशुपालना विषयी इतर माहिती देण्यात आली आहे.
इमू पालन मोठ्या प्रमाणावर दोन हेतूंसाठी केले जाते. पहिले म्हणजे पुनरुत्पादान करून सक्षम व पूर्ण वाढ झालेले इमू नर-माद्या बाजारात विकणे. आणि दुसरा महत्वाचा हेतू म्हणजे इमूच्या शरीरापासून निर्माण होणारी इतर उत्पादने. इमुंचे तेल त्याच्या वैद्यकीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे, तसेच इमुची नखे, कातडी, हाडे, पिसे यांना देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या किमतीला मागणी आहे.
कुकूट पालन व्यवसाय विषयी सर्व माहिती ! आणि प्रोत्साहन
कोंबडी पालन / कुक्कुटपालन / पोल्ट्री. संपूर्ण भारतात कोंबडी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून तसेच खाजगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे
या विभागात पाळीव जनावरांच्या जाती, त्यांची निवड, निवारा, वासरांचे संगोपन, जनावरामधील वंध्यत्व, होणारे तोंडाचे तसेच पायांचे रोग आणि खाद्य यासंबधी माहिती दिली आहे.
टर्की हा कोंबडी सारखा मोठा पक्षी आहे. टर्की पालन हा व्यवसाय आता आपल्या देशातील ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगाराचा एक उत्तम पर्याय होऊ पाहत आहे
ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही तेथे बदक पालन हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात. बदकांची अडी सकस, बदक पालन हा व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादनाकरीता केला जातो.
मेंढी पालन हा कोरड्या जमिनीवर शेती करणाऱ्यांसाठी फार महत्वाचा भाग असून कमीतकमी गुंतवणूक करून किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग बनू शकतो. तसेच मेंढी पालन हे छोट्याशा जागेवर किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते.
लाव पक्षी तुलनात्मक रीत्या बळकट असतात. कमीतकमी जागेची गरज, कमी भांडवलाची गरज, पांच आठवड्यांसारख्या लहानशा वयात विक्रीसाठी तयार, जलद लैंगिक परिपक्वसता – वयाच्या सहा किंवा सातव्या आठवड्यात अंडी देण्यास सुरूवात करतात.
डुक्कर हे अखाद्य, काही घाण्यानच्या मिल मधून मिळणारे उत्पाेद, मांस, क्षतिग्रस्त खाद्य आणि कचरा यासारख्या गोष्टींचे रुपांतर मूल्यवान पोषक पदार्थात करतात. ह्यातील बहुतेक पदार्थ हे मानवाच्या उपयोगाचे आणि खाण्यायोग्य नसतात किंवा मानवासाठी नुकसानकारक असतात. डुक्कर भराभर वाढते आणि विपुल प्रजनन दाखविते, एका वेळी १० ते १२ पिले देते.
भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी शेळीपालन हा जोड व्यवसाय करतात. हा एक अत्यंत फायदेशीर व पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे