অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पशु खाद्य आणि जीवनसत्वे

पशु खाद्य आणि जीवनसत्वे

1) शास्त्रीय शिफारशीनुसार मोठ्या संकरित गाईस शरीरवजनाच्या तीन टक्के कोरडा खाद्यांश दररोज आवश्‍यक आहार ठरतो. 
2) पशुखाद्य (90 टक्के), हिरवा चारा (25 टक्के), वाळलेला चारा (75 टक्के), यातील कोरडा खाद्यांश गाईंना पुरवतात. या अर्थाने चार किलो पशुखाद्य, तीस किलो हिरवा चारा व सहा किलो वैरण एवढा आहार 500 किलो शरीरवजनाच्या गाईस लागतो. 
  • हिरवा चारा, कोरडा चारा नेहमी एकत्रित कुट्टी करून पुरवावा.
  • तीन महिने पुरेल एवढ्या चाऱ्याचे नियोजन करावे. याचबरोबरीने मुरघास, ऍझोला, हायड्रोपोनिक्‍स पद्धतीने चारा खाद्यामध्ये वापरावा.
  • दर अडीच लिटर दूध उत्पादनास एक किलो पशुखाद्य लागते. म्हणून प्रत्येक संकरित गाईस अर्धा किलो अधिकचे पशुखाद्य देऊन सव्वा लिटर दूध वाढते का? याकडे लक्ष द्यावे.
  • सर्ण गवत, अझोला यांचा पुरवठा करून पशुखाद्य प्रमाण कमी करता येते.
  • गाभण काळात दररोज अर्धा ते एक किलो पशुखाद्य वाढविल्यास गर्भाच्या वाढीस उपयुक्त ठरते.
  • प्रसूतीपूर्वी 30 दिवसांपासून पशुखाद्य प्रमाण हळूहळू वाढवावे आणि प्रसूतीनंतर 15 दिवसांपर्यंत त्यात अचानक मोठी वाढ होऊ नये, असे नियोजन ठेवावे.
  • क्षार जीवनसत्त्वाची पूर्तता झाल्यास सुलभ शरीरक्रिया आणि अधिक दूध उत्पादनात वाढ घडविता येते.
  • दिवसभरात कधीही पाणी पिण्याची इच्छा निर्माण होताच थंड, स्वच्छ, निर्जंतुक पाणी उपलब्ध करून द्यावे. गाईंना त्यांच्या गरजेनुसार पाण्याची उपलब्धता करून द्यावी.
  • उन्हाळ्यात सकाळी पाच ते दुपारी तीनपर्यंत चाराकुट्टी देण्याचे टाळून उर्वरित काळात पुरेपूर चाराकुट्टी द्यावी.
  • ऋतुमानानुसार आहारात बदल करावेत.
  • दूध देत असणाऱ्या गाईंच्या पशुखाद्यात 20 टक्‍क्‍यांहून अधिक प्रथिनांची वाढ केल्यास दूध प्रमाण वाढते, मात्र रक्तात नत्र युरिया प्रमाण वाढून प्रजननांवर दुष्परिणाम दिसून येतात.
  • चारा पशुखाद्याचे प्रमाण प्रसूतीनंतर 25ः75, मध्य दूध काळात 40ः60 मध्य गर्भधारणेस 50ः50 तर प्रसूतीपूर्वीच्या टप्प्यात 60ः40 असे तिमाही असावे.
  • आतड्यात शोषले जाणारे, पचन होणारे सोयाबीनसारखे घटक "बायपास' तंत्रातून शरीरास प्रथीने व स्निग्ध पदार्थ पुरवितात.
  • प्रसूतीपूर्वी जनावरांची 20 ते 30 टक्के भूक कमी होत असल्याने सतत ताजा बदलणाऱ्या चवीतून सेवन वाढवणारी कुट्टी पुन्हा पुन्हा पुरवावी.
  • चाऱ्यास पशुखाद्याची दर सहामाही नमुना तपासणी करून घ्यावी.


संपर्क ः डॉ. नितीन मार्कंडेय

9422657251
पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate