অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इमूपालन

इमूपालन

इमू हा पक्षी शहामृगासारखा दिसणारा ३० ते ४० किलो वजनाचा असून, साडेपाच ते सहा फुट उंचीचा असतो.  इमूचे वय ३० ते ४० वर्षं इतक असतं.  इमू हा पक्षी साधारणपणे १८ ते २४ महिने वयाचा असताना प्रजननक्षम होतो.  मात्र इमू हा पक्षी सप्टेंबर ते फेन्रुवारी अगर ऑक्टोबर ते मार्च या हंगामातच अंडी देतो.  मादी पक्षी ३ ते ५ दिवसांनी एक अंडे देते.  सुरवातीच्या म्हणजे पहिल्या वर्षी ८ – १० अंडी देतात.  पुढे दरवर्षी हे प्रमाण वाढत जावून २० – ३० अंडी प्रत्येक पक्षी दर वर्षाला देतो.  एका अंड्याचे वजन ४०० -७०० ग्रॅम पर्यंत भरते.

नैसर्गिक पैदासिमध्ये इमू – नर पक्ष्याची भूमिका महत्त्वाची असते.  इमू - नर पक्षी अंडी उबवतो.  यासाठी त्याला किमान ६० दिवस लागतात, तर कृत्रिम पद्धतीनं अंडी उबवणूक केंद्रात किमान ५० – ५२ दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर पडते.  उबवणी समयी पिल्लाचे वजन अंदाजे ४०० ते ४५० ग्रॅम असते.

३ महिन्यांनी ८ किलो, ६ महिन्यांनी १२ किलो आणि पूर्ण वाढ १५ ते १६ महिन्यात होवून त्याचे वजन ३५ ते ४० किलो होते.  या वेळी मांसासाठी तो उपयुक्त होतो.  सांडी – घालण्यासाठी सुद्धा सक्षम होतो.

इमू हा पक्षी फारच काटक आहे.  सहजासहजी कोणत्याही रोगालाही बळी पडत नाही.  म्हणजे उत्तम प्रकारे रोगप्रतिकार शक्ती असणारा हा पक्षी आहे.  कधी कधी  फंगल – इन्फेक्शन, जनताच प्रादुर्भाव अगर जीवनसत्त्व खनिज मिळालं नाही तरच हे पक्षी आजारी पडतात.

अंदाजे दोन किलो वजनाच्या पक्षाला रोज १२० ते १४० ग्रॅम खाद्य लागतं.  पूर्ण वाढीच्या पक्षाला दिवसाला ४०० ते ६०० ग्रॅम खाद्य लागतं.  खाद्याबरोबरच हिरव्या पालेभाज्या, मेथी, लसून, कोबी, फ्लॉवर, इतर भाज्या आणि धान्यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, गहू यांचा भरडा आणि कंपन्यांनी तयार केलेलं इमू – खाद्यही लागतं.  खाद्यासोबत पूर्ण वाढलेला पक्ष्याला रोज स्वच्छ आणि शुद्ध असं ५ ते ६ लिटर पाणी पिण्यासाठी लागतं.

इमू पक्ष्याकरता माळरान, नापीक, मुरमाड पाण्याचा निचरा होणारी मोकळ्या हवेची निकुडी जागा निवडावी.  शेड आणि चेनलिंक फेन्सिंग म्हणजे कंपाउंड असणारी त्याच्या पुढं मोकळी जागा अशा पद्धतीची त्यांची जोपासण्याची सोय करावी.  हे पक्षी नेहमी कायमस्वरुपाच्या जोडीनं राहतात.  एक जोडप्यासाठी १०० × ५० फुट म्हणजे ५०० चौ. फूट जागा लागते.  नव्यानं व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान १० जोड्या असाव्या लागतात आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्याअगोदर पूर्ण माहिती असणं, तसेच दुसऱ्यांनी सुरु केलेला अनुभव जमेला धरून हा व्यवसाय सुरु करावा.

एकंदरीत शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय भांडवलावर व्यक्तींनी सुरु करावा.  कारण पिल्ल विकत घेऊन हा व्यवसाय सुरु करावा लागतो.  पिल्लांना खूप पैसे मोजावे लागतात.  भांडवलदार तरुण या व्यवसायाकडे थोड्याफार प्रमाणात वाळू लागले आहेत.

सध्यातरी आर्थिक अपेक्षा जास्त असतात, पण त्या पुऱ्या होत नसल्याचेच चित्र दिसून येतेय.  कारण अंडी विक्री अगर मांस विक्रीला म्हणावं तसं मार्केट अजून उपलब्ध नाही.  या व्यवसायाच्या व्यवस्थापनात विशेषतः विक्री व्यवस्थेत सुधारणा झाल्यास या व्यवसायाची वाढ निश्चितच होईल.

 

स्‍त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्‍हाद यादव

 

अंतिम सुधारित : 1/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate