অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उन्हाळ्यात ब्रॉयलर नियोजन

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते व हे नियोजन जर आपण व्यवस्थितरीत्या केले, तर आपल्या ब्राॅयलरचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते.

ब्रॉयरल पक्ष्यांना विविध वातावरण, नियोजन, निवास, शारीरिक इत्यादी गोष्टींमुळे ताण निर्माण होतो. त्याचा सरळ उत्पादनावर परिणाम होतो.
वातावरणातील ताण म्हणजे सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते व हे नियोजन जर आपण व्यवस्थितरीत्या आत्मसात केले तर आपल्या ब्राॅयलरचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते.

ब्रॉयलरसाठी ६५.७५ अंश फॅरानाइट हे योग्य तापमान आहे. पण, यापेक्षा कमी किंवा जास्त हवामानातील तापमान ब्रॉयलरच्या शरीरावर परिणाम करते व कोंबड्या या वातावरणात राहू शकत नाही.

उन्हाळ्यात ब्रॉयलरच्या शरीरावर होणारे परिणाम

ब्रॉयलरच्या शरीरावर उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यामध्ये शरीरातून उष्णता मुक्त होण्याचे प्रमाण व शरीरात उष्णता निर्माण करण्याचे प्रमाण या प्रमाणात बदल झाल्यास परिणाम आढळतो.
i) पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढते व खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.
ii) खाल्लेल्या खाद्यांचे शरीरात वजन वाढीसाठी उपयोग न होता ते वाया जाते व वाढीवर परिणाम होतो.
iii) शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. (हृदयाची स्पंदने वाढतात व वाढ खुंटते.)
iv) रोग प्रतिकार क्षमता कमी होते व पक्षी दगावण्याची शक्यता वाढते.

विविध तापमानाचा ब्राॅयलर पक्ष्यांवर होणारा परिणाम

- ---- तापमान ---- होणारा परिणाम
i) ---- ६५ अंश फॅरानाइट -८० अंश फॅरानाइट ---- योग्य तापमान ज्यामध्ये कोंबड्या आनंदी व उत्साही राहतात. वाढ चांगल्याप्रकारे होते.
ii) ---- ८१अंश फॅरानाइट - ८५ अंश फॅरानाइट ---- खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते व शरीरामध्ये खाद्याचे वजनात रूपांतर खूपच कमी प्रमाणात होते.
iii) ---- ८६ अंश फॅरानाइट - ९५ अंश फॅरानाइट ---- तापमान जसजसे ८६ अंश फॅरानाइटच्या वर जाते. तसतसे कोंबड्या खाद्य खाने २-३ टक्के कमी करतात.
iv) ---- ९६ अंश फॅरानाइट - १०० अंश फॅरानाइट ---- या तापमानात कोंबड्या आपले पंख पसरतात. खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर टाकतात व यामुळे उष्माघात होतो व कोंबड्या दगावतात.
v) ---- १०१ अंश फॅरानाइट - त्यापेक्षा जास्त ---- या तापमानाला कोंबड्या दगावतात.

तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ब्रॉयलरचा प्रतिसाद

  • माणसाप्रमाणे घामग्रंथी नसल्यामुळे ब्रॉयलर जवळ खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे हा एकमेव मार्ग असतो.
  • खूप जास्त प्रमाणात वातावरणातील तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ब्रॉयलर कोंबड्या त्यांच्या हालचाली थांबवतात.
  • कोंबड्या भुश्‍यामध्ये विष्टा टाकतात जी त्याच्या शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते.
  • अयोग्य तापमानात (८० अंश फॅरानाइट) ब्रॉयलर त्यांची पंख व चोच उघडतात, याद्वारे ते जास्त प्रमाणात उष्ण व दमट हवा बाहेर टाकतात.

उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना

i) पोल्ट्री फार्मचे नियोजन
ii) पाण्याचे नियोजन
iii) खाद्याचे नियोजन
iv) इतर नियोजन

पोल्ट्री फार्मचे नियोजन

  • पोल्ट्रीची बांधकामाची दिशा उत्तर-दक्षिण असावी. त्यामुळे सूर्यप्रकाश सरळ फार्ममध्ये न पडल्याने तापमान जास्त वाढत नाही.
  • दोन फार्ममधील अंतर कमीत कमी २० मीटर असावे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहते.
  • पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूने उंच व पसरट पाने असलेले वृक्ष लावावेत, यामुळे उन्हाच्या झळा कोंबड्यांना बसत नाहीत.
  • पोल्ट्री फार्मचे छत गव्हाचा किंवा भाताचा कडबा किंवा उसाच्या पाल्याने झाकावे, यामुळे शेडमधील तापमान कमी राहते.
  • शेडच्या छतामध्ये व भिंतीमध्ये २.६ ते ३.३ मी. अंतर ठेवावे. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.
  • पोल्ट्री शेडच्या आजूबाजूने पांढरा कलर मारावा, यामुळे सूर्यप्रकाश परावर्तनास मदत होते.

पाण्याचे व्यवस्थापन

  • एक पक्षी साधारणतः २ लिटर पाणी प्रत्येक किलोमागे पितात. ७० अंश फॅरानाइटला प्रत्येक १ अंश सीच्या तापमानवाढीला पक्षी ४ टक्के जास्त पाणी पितात. - साधारणतः खाद्य व पाणी यांचे १-२ असे प्रमाण असते. जेव्हा तापमान वाढ ९५ अंश फॅरानाइटपेक्षा जास्त असते, हेच प्रमाण उन्हाळ्यात १ः४ असे होते.
  • पक्ष्यांना ४५ अंश फॅरानाइट ते ८० अंश फॅरानाइटमध्ये थंड पाणी पिणे आवडते. हेच लहान पिल्लांच्या बाबतीत थंड पाण्याबरोबर इलेक्ट्रॉलॅटिस द्यावेत जेव्हा ते हॅचरीतून फार्मवर आणले जातात.
  • पाण्याची भांडी २५ टक्के वाढवावीत व दिवसातून ४-५ वेळा पाण्याची भांडी भरावीत व पाण्याचे तापमान शेडमधील वातावरणापेक्षा कमी असावे.
  • स्वच्छ आणि निर्जंतूक पाण्याबरोबरच ०.२५ टक्के मीठ टाकावे, यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढते.

खाद्याचे व्यवस्थापन

  • पक्षी सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेस जास्त प्रमाणात खातात. त्या वेळेत त्यांना जास्त खाद्य द्यावे.
  • १० टक्के खाद्याची भांडी वाढवावीत, यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.
  • ३-३.५ टक्के कॅल्शियमची पातळी वाढवावी.
  • साधारणपणे २०-३० टक्के जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि ताणमुक्त मूलद्रव्ये द्यावीत.
  • जीवनसत्व ए - ८००० आय यू आणि जीवनसत्व ई -२५० मि. ग्रॅ/ कि. यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.

इतर नियोजन

  • स्वच्छ व ताज्या भुश्‍याच्या २ इंच जाडीचा थर बनवून त्यावर दिवसातून २-३ वेळा साधारण पाणी शिंपडावे.
  • पक्ष्यांची गर्दी होऊ न देता १० टक्के जास्त जागा प्रत्येक पक्षाला उन्हाळ्यात देणे गरजेचे आहे.
  • कोंबड्यांची जागा बदलणे, त्यांना लसी टाेचणे अशी कामे रात्रीच्या वेळी करावीत.
  • जास्त उन्हाचा ताण पक्ष्यांवर आल्यावर पक्ष्यांना २-३ मिनिटे पाण्यामध्ये बुडवावे. चोच आणि डोळे पाण्याच्या पातळीच्या बाहेर काढावे.
  • पांढरा रंग, चुना इत्यादीचा वापर केल्यास २ अंश सीने तापमान कमी होते.
  • खिडक्यांना बारदाने बसवावीत व दुपारच्या वेळेस ओली करावी.
  • स्प्रिंगकलर फार्मच्या बाजूला किंवा शेजवर मारावे.
  • एग्झाॅस फॅन एका बाजूला आणि Pal Cooling दुसऱ्या बाजूला (२०० फुट) यामुळे तापमान ८ अंश सेल्सअसने कमी होते.
  • अशारितीने आपण उन्हाळ्यात कोंबड्यांचे नियोजन योग्यरित्या करू शकतो.

शिकलगार नवाज, ८८०५२१७१४३.
(लेखक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी (तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) येथे कार्यरत आहेत.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate