वय- १ ते १० दिवस
आजार/उपचार - जीवनसत्त्व ““अ*" पाण्यातून
औषध १ मिली/१०० पिल्ले ““अ** जीवनसत्त्व अधिक ७ ग्रॅम अँटीबॉयोटिक पावडर
मुदत- १० दिवस
वय- तिसरा आठवडा
आजार/उपचार- हगवण .
औषध अर्धा ग्रॅम सल्फाडूग किंवा नायट्रोफ्युरॉन
एक लिटर पाण्यात.
मुदत -रोग थांबेपर्यंत
वय- ४ ते ५ आठवडे
आजार/उपचार लंगडेपणा असल्यास
औषध २० मिली बी- कॉम्प्लेक्स १०० पक्षांना पाण्यातून
मुदत -७ दिवस
आजार/उपचार फरक न आढळल्यास
औषध जीवनसत्त्व - अ, ब, अ-ड-३ १५७ मिली. पाण्यातून
मुदत -४.ते ५ दिवस
वय- दुसऱ्या व सहाव्या आठवड्यात
आजार / उपचार- पिल्लांची वाढ बरोबर होत नसल्यास
औषध जीवनसत्व अ -- ब, -- ड, २५ ग्रॅम १०० किलो खाद्यामधून
मुदत - सतत ५/६ दिवस द्यावे.
वय- ७/८ वा आठवडा
आजार/उपचार - पोटातील जंतासाठी जंतनाशक औषध पायपराझीन जंतनाशक
मुदत - एक वेळेला, त्यानंतर महिन्यातून एक
वय- कोणत्याही वयात
आजार-ताण पडल्यास
उपचार- लहान पक्ष्यांना जीवनसत्त्व-अ १ मिली. मोठे पक्षी २ ते ७ मिली. (१०० पक्ष्यांना) 9 दिवस
वय- २० ते २४ आठवडे
आजार- अंड्यावर आल्यावर सुरूवातीला येणाऱ्या ताणासाठी
उपचार- कॅल्शियम व जीवनसत्त्वे एकत्र असलेली
औषधे पाण्यातून द्यावीत.
मुदत - अंडी व्यवस्थित देण्याचे सुरू होईपर्यंत आणि खाद्य व पाणी व्यवस्थित घेईपर्यंत.
वय- कोणत्याही वयात
आजार- रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
उपचार- नायट्रोफ्युरॉन औषधे
मुदत- दर महिन्यात एक आठवडा.
वरील प्रमाणे सर्वसाधारण औषधोपचाराची रूपरेषा
आहे. परंतु औषधोपचार करतांना तज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे.
तसेच पक्षी मेल्यास शवविच्छेदन करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा.
उपचारापेक्ष्या प्रतिबंधात्मक उपचार-
● पक्षी खरेदी अधिकृत व नामांकीत अंडी उबवणी केन्द्राकडूनच करावी.
● पक्षांचे घरातील तापमान व वायुविजन हे योग्य राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.
● घरे स्वच्छ ठेवावीत वेळोवेळी निर्जतुक करून घ्यावीत. थोड्या जागेत प्रमाणपेक्षा जास्त पक्षी ठेवू नये. पक्षांना योग्य प्रमाणात जागा द्यावी.
● पक्षांना पुरेसे व समतोल खाद्य द्यावे.
● रोग प्रतिबंधक लसी योग्य वेळी टोचून घ्याव्यात.
● आवारामध्ये उडते पक्षी, कुत्री, मांजरे, उंदीर, घुशी येवू नयेत असा प्रतिबंध करावा.
● मेलेल्या पक्षांना खड्डयात खोल पुरून टाकावे अगर जाळावे.
● कळपातील आजारी पक्षी त्वरीत बाहेर काढून त्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन करावे.
● नवीन पक्षी जुन्या पक्षात मिसळू नये.
शेडच्या बाहेर चुन्याची भुकटी अथवा फिनाईलचे पाणी भरून ठेवावे म्हणजे घरात प्रवेश करतांना त्यामध्ये पाय बुडवून प्रवेश करता येईल.
● औषधोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत.
● आजारी किंवा मेलेल्या पक्षांची शवविच्छेदन तज्ञांकडून करून घ्यावी. त्यामुळे रोग निदान करता येते व औषधोपचार करता येतात
स्रोत- महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग
लिंक-http://ahd.maharashtra.gov.in/sites/default/files/Leaflet_disease_of_bird.pdf
अंतिम सुधारित : 8/16/2020