अंडी आणि मांस उत्पादनासाठी कुक्कुटपालन बरेच शेतकरी करतात. ब्रॉयलर कोंबड्यांचे कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त वजन वाढणे अपेक्षित असते. बऱ्याच वेळा त्यांची वाढ अपेक्षित कालावधीमध्ये होत नाही, त्यामुळे अर्थकारण बिघडते. कोंबड्यांचे वजन वाढण्याकरिता बऱ्याच औषधी आज बाजारपेठेत उपलब्ध आहेत. ब्रॉयलर कोंबड्यांचे वजन वाढविण्यासाठी लिव्हर टॉनिकचा वापर प्रामुख्याने होतो.
आज बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या या प्रकारातील औषधी या वनस्पतीजन्य आहेत; परंतु या औषधींच्या किमतींचा विचार केल्यास औषधी वनस्पतींचा कुक्कुटपालकानेच वापर केला तर तो फायदेशीर ठरतो.
1) शरपुंखा
शरपुंखा किंवा उन्हाळी ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीच्या मुळ्या औषधीत वापरल्या जातात. याशिवाय याचे खोडदेखील उपयुक्त आहे.
मात्रा ः
ब्रॉयलर कोंबड्यांसाठी 5 ग्रॅम प्रति 100 कोंबड्या प्रतिदिन अशी मात्रा खाद्यातून द्यावी.
2) कटुकी
नावाप्रमाणेच अत्यंत कडू अशी ही वनस्पती आहे. ही वनस्पती यकृत विकारांवर यकृत उत्तेजक म्हणून अत्यंत उपयुक्त आहे.
मात्रा
ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये 3 ग्रॅम प्रति 100 पक्षी प्रतिदिन या मात्रेत ही वनस्पती खाद्यातून द्यावी.
3) किरिआत
किरिआत, किरियात, चिरायता, कडू किरियत अशा विविध नावाने ही वनस्पती ओळखली जाते. ही वनस्पती चवीस अत्यंत कडू आहे. ही वनस्पती कोंबड्यांचे वजन वाढण्याकरिता अत्यंत उपयुक्त आहे. संपूर्ण वनस्पतीचा वापर औषधीत होतो.
मात्रा
ब्रॉयलर कोंबड्यांना 5 ग्रॅम प्रति 100 पक्षी प्रतिदिन या मात्रेत ही वनस्पती खाद्यातून द्यावी.
4) आवळा
आवळ्याचे फळ औषधीत वापरतात.
मात्रा
ब्रॉयलर कोंबड्यांना 3 ग्रॅम प्रति 100 पक्षी प्रतिदिन या मात्रेत खाद्यातून द्यावी.
5) माका
माका किंवा भृंगराज या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. ही वनस्पती यकृत उत्तेजक म्हणून अत्यंत उपयुक्त आहे.
मात्रा
ब्रॉयलर कोंबड्यांना 5 ग्रॅम प्रति 100 पक्षी प्रतिदिन या मात्रेत खाद्यातून द्यावी.
6) हिरडा
हिरडा वनस्पतीचे फळ औषधीत वापरतात. ही वनस्पती पाचक, यकृत उत्तजेक, भूक वाढवणारी आहे.
मात्रा
ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये 5 ग्रॅम प्रति 100 पक्षी प्रतिदिन अशी खाद्यातून द्यावी.
औषधी वनस्पतींचा एकत्रित वापर ः
वनस्पतींचा एकत्रित वापर केल्यास याचा गुण अधिक चांगला येतो.
मात्रा
1) शरपुंखा - 5 ग्रॅम
2) कटुकी - 2 ग्रॅम
3) किरियात - 5 ग्रॅम
4) आवळा -3 ग्रॅम
5) माका - 5 ग्रॅम
6) हिरडा - 5 ग्रॅम
मात्रा
1) वरील प्रमाणात सर्व वनस्पती एकत्र करून बारीक कराव्यात.
2) ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये 10 ते 15 ग्रॅम प्रतिदिन प्रति 100 पक्षांना खाद्यातून द्यावी.
1) या वनस्पती खाद्यातून देण्याऐवजी पाण्यातूनदेखील देता येतात. यासाठी वरील मात्रेतच या वनस्पती घेऊन त्यात 200 मि.लि. पाणी मिसळून उकळाव्यात. पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे.
2) त्यानंतर हे मिश्रण थंड करून गाळून घ्यावे. उपचारासाठी वनस्पतींचा चोथा न वापरता केवळ गाळलेला भाग (अर्क) वापरावा.
3) ब्रॉयलर कोंबड्यांसाठी मात्रा ः 25 मि.लि. अर्क प्रति 100 पक्षी प्रतिदिन या मात्रेत पिण्याच्या पाण्यातून अर्क द्यावा.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उं...
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...