या रोगास न्यु कॅसल डिसीज (new castle disease)/ राणीखेत किंबा मानमोडी या नावाने संबोधला जाते. हा रोग सौम्य आणि तीव्र स्वरूपात आढळतो. हा रोग ४ आठवडे वया वरील
पक्ष्यांमध्ये होतो. या रोगाची लक्षणे ही विषाणुच्या पॅथाजेनिसीटी आणि पक्ष्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. हा रोग पॅरामिक्सो समुहातील विषाणूमुळे होतो. या विषाणूचे व्हेलाजेनिक, मेसोजेनिक व लेन्टोजेनिक असे तीन प्रकार आहेत.
विषाणूचे स्वरुप (तीव्र/सौम्य) आणि प्रतीकारशक्ती यावर आधारीत
असुन २ ते १८ 2 या क्रेशश कालावधी आहे.. रोगाची लक्षणे दाखविणेचा कालावधी २ ते ४ दिवस असतो
१. हा रोग दुषित हवा, खाद्य, ब पाणी याव्दारे
२. मुक्त संचार असलेले पक्षी (free birds)
३. लोक संपर्क ब दुषित उपकरणे
४. दुषित लस.
५. पक्षी व पक्षी उत्पादने वाहतूकीने.
६.प्रत्यक्ष बाधित पक्षी हाताळणी मुळे.
७. अप्रत्यक्ष उपकरणे, पक्षी खाद्य आणि लिटर हाताळणीव्दारे या रोगाचा प्रसार होऊ शकतो.
रोगाच्या प्रसारासाठी जंगली पक्षी हे विषाणूंचे माहेरघर असतात. उदा.पाणकोंबडी हे व्हेलोजेनिक विषाणूचे (रिजरवायर) भांडार असते. जेव्हा हे विषाणू ससेप्टेबल पक्ष्यांच्या शरीरात प्रवेश
करतात तेंव्हा तीव्र स्वरुपात रोग प्रादुर्भाव निर्माण करतात.
विषाणूचे स्वरुप (तीव्र/सौम्य) आणि प्रतीकारकशक्ती यावर मरतुकीचे /आजारी पक्ष्यांचे प्रमाण आधारीत असून ते ०-१०० टक्के प्रमाण असते.
बाधित पक्ष्यांच्या सर्व अवयव, स्त्राव आणि शरीरजलामध्ये विषाणू असतात सर्वसाधारण.बाताबरणातील तापमान से ११° से. (१२°फॅ) ते ३६°से. (९७° फॅ) मध्ये बिषाणूं जिवंत
राहू शकतो. २३-२९ से. (७३-८४ फॅ) ते ३६ से (९७°फॅ) तापमानात १०-१४ दिवस बाधित लिटर
मध्ये विषाणू राहू शकतो.तर जमिनीतील मातीत २०°C मध्ये तो टिकतो. माश्या विषाणू प्रसार करु शकतात.पक्षीग्ह आणि व्यवस्थापणावर विषाणू प्रसार अवलंबून असतो. अतिशित पेटीतील साठवलेला बोन मॅरो (अस्थी मेद) आणि कोंबडी मांसामध्ये मध्ये विषाणू ६ महिने टिकतात.
बाजारातील फ्रोजन चिकनमध्ये ६० दिवस हा विषाणू आढळतो.
प्रयोगशाळेडे पाठविण्याचे नमुने:-
१. मृत पक्षी
२. मृत पक्षी शवविच्छेदन करुन -अंतर्गत अवयवाचे उत्ती नमुने बर्फावर किंबा १० टक्के ग्लीसरीन द्रावणात पाठविणे.
३. सिरम/रक्तजल नमुने
मानमोडी /राणीखेत रोगाचे निदान हे क
शवविच्छेदनात आढळून येणारी विकृती या वरुन करता येते तसेच
चाचण्या करुन निष्कर्ष निशचत केले जातात खालील प्रमाणे
१. बायोलाजीकल इनॉक्युलेशन
२. व्हायरस आयसोलेशन.
३. एच.ए. - एच.आय. टेस्ट
४. इलायझा टेस्ट.
५. इलायझा पीसीआर टेस्ट
१) राणीखेत / न्यु कॅसल डीसिज/ एनडी या रोगाचा प्रादुर्भाव बाबत रोग निदान झाल्यास प्रक्षेत्रावरील सर्व पक्ष्यांना (आजारी व निरोगी ) तात्काळ लासोटाचा डबल डोस पाण्यातून देण्यात यावा. लसीकरणापुर्वी पक्ष्याचे खाद्य व पाणी २ तास बंद करावे. पाण्यात बर्फ टाकून पाण्यात दुध पावडर एक लिटरला ६ ग्रॅम या प्रमाणात मिसळावे आणि पाण्याचे तापमाण ८ ते १०° सें. पर्यंत खाली आणावे.
२) प्रक्षेत्रावरील जैवसुरक्षा अनुपालन काटेकोरपणे करणे.
३) पक्षी गृहाच्या आत बेनझाईल अल्कोनियम क्लोराईड आणि ग्लुटा अल्डीहाईड हे घटक असणारे विषाणू नाशक औषधांची फवारणी करावी.
४) प्रक्षेत्रावरील परिसरात पक्षीगृहाच्या बाहेर १० टक्के फॉरमॅलीन ची फवारणी करावी.
७) प्रक्षेत्रावरील बाधीत/आजारी व निरोगी पक्ष्यांना खाद्य/पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व त्यासाठी स्वतंत्र माणसांची नेमणूक करण्यात यावी.
६) मृत पक्ष्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी (जाळणे अथवा खोल खडयात चुना पावडर टाकूण पुरावे.)
७) पक्ष्यांना पाण्यातून जीवनसत्वे ए डी-३ इसी इलक्ट्रोलाईट द्यावे.
हा विषाणूंमुळे होणारा रोग असल्यामुळे या रोगावर उपचार नाहीत रोगाचा प्रसार संपर्काने होत असल्याने आजारी पक्षी निरोगी पक्ष्यांपासून वेगळे करावे, स्वच्छता ठेवावी.
१. रोग मानवात संक्रमीत होणारा असल्याने पक्षी हताळतांना ग्लोव्हज सुरक्षा साधने वापरावीत.
२. लसीकरण कार्यक्रमाचे सनियंत्रण वेळापत्रकानूसार करावे
८. लसीकरण थंड वातावरणाच्या वेळी सकाळी अथवा सांयकाळी करावे.
९. मोठया पक्ष्यांचे लसीकरण झाल्यानंतर २१ दिवसाच्या नंतर पक्ष्यांचे रक्तजल प्रयोगशाळेकडे पाठवून अँन्टीबॉडी टायटर तपासून घ्यावे.
७. उन्हाळयापुवी प्रक्षेत्रावरील सर्व पक्ष्यांना लासोटा बुस्टर पाण्यातून देण्यात यावा.
स्रोत- महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग
अंतिम सुधारित : 4/23/2020