परसातील कोंबडीपालनासाठी गिरिराज कोंबडी ही मांस उत्पादनासाठी चांगली आहे. या कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन, तसेच सुरवातीपासून ते बाजारपेठेत पाठविण्यापर्यंतच्या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास वर्षभरात चांगली कमाई होऊ शकते.
1) या कोंबड्या गावठी कोंबड्यांप्रमाणे विविध रंगांत आढळतात.
2) कोणत्याही वातावरणात एकरूप होतात.
3) कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली असते.
4) अंडी व मांस भरपूर प्रमाणात मिळते. मांस चविष्ट असते.
5) कोंबडीचा वयात येण्याचा कालावधी 166 दिवस आहे.
6) कोंबडीच्या अंड्यातून सशक्त पिल्ले जन्माला येतात.
गिरिराजची एक दिवसाची पिल्ले वाहतूक करून आणल्यानंतर त्यांचा ताण कमी करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉल पावडरचे द्रावण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावे. दुसऱ्या ते चौथ्या दिवसांपर्यंत पाण्यातून एखादे प्रतिजैविक द्यावे, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पाचव्या-सहाव्या दिवशी पिल्लांना बी-कॉम्प्लेक्स द्यावे. सातव्या दिवशी लासोटा लस द्यावी. सुरवातीला एक-दोन दिवस भरडलेला मका खाद्यात द्यावा. त्यानंतर चार आठवडे त्यांना स्टार्टर खाद्य द्यावे. नंतरचे चार आठवडे फिनिशर खाद्य द्यावे.
सरासरी एका पक्ष्याला मोठे होईपर्यंत (आठ आठवड्यांचे) 2.6 किलो ग्रॅम खाद्य द्यावे. साधारण 100 पक्ष्यांना 10 ु 10 चौरस फुटांची खोली बांधावी. कोंबड्यांचे घर पूर्व-पश्चिम बांधावे. जागा उंचवट्यावर असावी. पाण्याची निचरा होणारी जमीन निवडावी. घरात सतत खेळती हवा असावी. कोंबडीचे घर मुख्य रस्त्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असावे. यामुळे कोंबड्यांना ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणाचा त्रास होणार नाही. या कोंबड्यांची पिल्ले मिळण्यासंदर्भात पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
- 022-29272497
सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, गोरेगाव, मुंबई
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
मेहनत, पक्षी संगोपनातील धोके, बाजारपेठेतील अनियमित...
स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडीपालन चांगला रोजगार ...
कोंबड्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोग दिसून येतात. य...