অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अझोला - पशुखाद्यासाठी वापर

अझोलाबाबत

  • अझोला जलशैवालासारखे दिसणारे तरंगते फर्न आहे
  • सामान्यपणे अझोला तांदुळाच्या शेतात किंवा उथळ पाण्याच्या जागी उगविण्यात येते
  • ह्याची वाढ फार भराभर होते

azola.jpg

अझोला जवळून वेध

अझोलाचारा/खाद्य स्वरूपात

  • प्रथिने, आवश्यक एमिनो ऍसिडस्, जीवनसत्वे (व्हिटॅमिन ए, बी 12 आणि बीटाकेरोटिन) वाढ आणि खनिजांसाठी जसे कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम यांनी परिपूर्ण आहे
  • शुष्क वजन आधारित, याच्यामध्ये 25-35 टक्के प्रथिने, 10-15 टक्के मिनरल आणि 7-10 टक्के ऍमिनो ऍसिडस्, बायोऍक्टिव्ह पदार्थ आणि बायो-पॉलिमर्स
  • याच्यात उच्च प्रथिने आणि निम्न लीनिन कंटेंट असूनसुध्दा जनावरांना सुलभतेने पचणारे
  • अझोला घन आहारात मिसळून किंवा नुसतेच अझोला जनावरांना देऊ शकतो
  • अझोला हे पोल्ट्री, शेळ्या-मेंढ्या, डुकरे आणि ससे यांना ही दिला जाऊ शकतो

अझोला उत्पादन

  • जमीन सारखी व स्वच्छ करून घेण्यात येते
  • आयताकार स्वरूपात विटा आडव्या टाकल्या जातात
  • विटांनी तयार करण्यात आलेल्या आयताकाराच्या मार्जिनला झाकणारी 2mX2m मापाची एक पातळ यूव्ही स्टॅबिलाइझ्ड शीट टाकली जाते
  • 10-15 किलो चाळून बारीक केलेली माती सिल्प्यूलाइन पिट वर टाकण्यात येते
  • 2 किलो शेणाचे स्लरी तयार करण्यात येते आणि 30 ग्राम सुपर फॉस्फेट 10 लिटर पाण्यात मिसळून, शीटवर टाकण्यात येते. पाण्याची पातळी 10 सेमी वाढविण्यासाठी आणखी पाणी टाकण्यात येते.
  • सुमारे 0.5 ते 1 किलो शुध्द मदर अझोला कल्चर बी, माती व पाणी  एकसारखे करून अझोला बेड वर पसरतात. अझोलाच्या रोपांवर तात्काळ पाणी शिंपडावे.
  • एका आठवड्याच्या काळात, अझोला बेड वर सर्वत्र पसरतो आणि एखाद्या जाड्या चटईसारखा दिसतो.
  • 20 ग्राम सुपर फॉस्फेट आणि सुमारे 1 किलो गाईचे शेण 5 दिवसांत एकदा मिसळण्यात आले पाहिजे ज्यायोगे अझोलाची लवकर वाढ आणि रोजची 500 ग्रामची उपज कायम राहील.
  • मायक्रोन्यूट्रिंट मिक्स ज्यामध्ये मॅग्नेशियम, लोह, तांबे, गंधक इत्यादि देखील आठवड्यातून एकदा मिसळावे म्हणजे अझोलातील खनिज घटकांची वाढ होईल.
  • 30 दिवसांतून एकदा, सुमारे 5 किलो बेड माती ताज्या मातीने बदलून टाकावी, ज्यायोगे नायट्रोजनची वाढ आणि मायक्रोन्युट्रिंटची कमतरता यांच्यावर उपाय होईल.
  • 25 ते 30 टक्के पाणी देखील, दर 10 दिवसांनी बदलावे, म्हणजे बेडवर नायट्रोजनची वसढ होण्यापासून बचाव होईल
  • बेड स्वच्छ ठेवावा, पाणी व माती बदलावी आणि नवीन अझोला दर सहा महिन्यांनी लावावा.
  • अझोलाच्या शुध्द कल्चरने युक्त असा ताजा बेड लावावा जेव्हा कीटक किंवा रोग लागणे सुरू होईल.

संपूर्ण वाढ झालेले अझोला -

azola 1.jpg

अझोला ऊत्पादन खड्डे

azola 2.jpg

कापणी करणे

  • लवकर वाढून पिट 10-15 दिवसांत भरून टाकेल. त्या वेळेपासून, 500-600 ग्राम अझोलाची कापणी दर रोज होऊ शकते.
  • 15व्या दिवसापासून एखाद्या चाळणी किंवा ट्रेच्या मदतीने केले जाऊ शकते.
  • कापणी केलेला अझोला ताज्या पाण्याने धुवायला हवा म्हणजे गाईच्या शेणाचा वास जाईल.

पर्यायी इनपुटस्

  • ताज्या बायोगॅस स्लरीचा वापर केला जाऊ शकतो
  • न्हाणीघर आणि गोठ्यातील सांडपाणी पिट् भरण्यासाठी वापरले जाऊ शकते. ज्या क्षेत्रांत ताज्या पाण्याचा अभाव आहे, कपडे धुतल्या नंतर उरलेले पाणी (दुसऱ्यांदा खंगाळलेले) देखील वापरले जावू शकते.

वाढीसाठी पर्यावरण घटक

  • तपमान 200c - 280c
  • प्रकाश 50% पूर्ण सूर्यप्रकाश
  • संबंधित आर्द्रता 65 - 80%
  • पाणी (टाकीमध्ये असलेले) 5 - 12 cm
  • pH 4-7.5

अझोलाच्या शेतीसाठी आवश्यक असलेले घटक

  • एखाद्या जाळीत धुणे बरे म्हणजे लहान-सहान रोपटी पडून गेल्यरा त्यांना पुन्हां तळ्यात टाकता येईल
  • 250c पेक्षा कमी राहील ह्याची काळजी घेणे
  • सावलीची जाळी वापरून प्रकाशाची तीव्रता कमी करता येईल
  • ओव्हर क्राउडिंग टाळण्यासाठी अझोला बायोमास दर रोज काढून टाकावा.

जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत


१) ओला अझोला
साधारणपणे एक ते दीड किलो अझोला प्रति दिन प्रत्येक जनावरास खाऊ घालावा. एका दिवशी जास्तीत जास्त दोन किलो अझोला प्रत्येक जनावरास देता येतो. सुरवातीस पशुखाद्यात / आंबवणामध्ये मिसळून १ः१ या प्रमाणात अझोला खाऊ घालावा, त्यानंतर पशुखाद्याशिवाय अझोला खाऊ घालावा.

२) सुका अझोला (अझोला मिल)
अझोला सुकवल्यानंतर दहा टक्के प्रमाणात पशुखाद्यात मिसळून वापरावा.

वेगवेगळ्या जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत :
दुधाळ गाई व म्हशी : दुभत्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये, आंबवणामध्ये एक ते दीड किलो अझोला प्रति दिन मिसळून (१:१ प्रमाण) खाऊ घालावा. दूध उत्पादनात, तसेच फॅटमध्ये वाढ होते.
वासरे : अझोलाच्या वापरामुळे वासरांच्या वजनात (३०० ते ५०० ग्रॅम) वाढ झाल्याचे दिसून येते.
शेळ्या व मेंढ्या : अझोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजन (३००-५०० ग्रॅम) वाढ होते.
पक्षी (कुक्कुट, बदक, इमू, लाव्ही) : कोंबड्यांच्या खाद्यात मिश्रण स्वरूपात अझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन वाढते व अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात वाढ होते, तसेच अंड्यांचा पृष्ठभाग चकचकीत होतो.

अझोला खाद्याचे फायदे :
१) दूध उत्पादन, फॅट, वजन व अंड्यांचे उत्पादन यांमध्ये वाढ. २) १५-२० टक्के आंबवणावरचा खर्च कमी होऊन खाद्यावरच्या खर्चात बचत होते. ३) एकूणच जनावरांत गुणवत्तावृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारते व आयुष्यात वाढ होते.

अझोलापासूनचे इतर फायदे
अझोला वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी झाडांसाठी वापरता येते, तसेच वाफ्यातून काढण्यात येणाऱ्या एक किलो मातीचे गुणधर्म हे सुमारे ०.५ किलो रासायनिक खताइतके आहे. अझोला लागवड हे सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर तंत्रज्ञान असून, ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे, त्याचा जनावरांच्या आहारात वापर करणे ही काळाची गरज आहे.

 

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate