जनावरांमध्ये उवा, माश्या, गोचीड या प्रकारांतील बाह्य परोपजीवींची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर खाजते, केस गळतात, जनावर अस्वस्थ होते, त्यांचे वजन कमी होते, दूध उत्पादनात घट येते. याशिवाय या परोपजीवींमुळे जखमेमध्ये आसडी पडते, जिवाणू, विषाणू, रक्तातील कृमींमुळे आजार वाढतात. या बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत; परंतु ही औषधे विषारी असल्यामुळे त्यापासून जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन स्वस्त व सुरक्षित असा औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत गुणकारी ठरतो.
1) या सर्व वनस्पती 150 ते 200 मि.लि. पाणी मिसळून उकळाव्यात. पाणी साधारणतः 40 ते 50 मि.लि.पर्यंत होईल तोपर्यंत उकळावे. नंतर हा अर्क गाळावा. चोथा वेगळा करावा.
2) या गाळलेल्या अर्कामध्ये कडुनिंब तेल 50 मि.लि., करंज तेल 50 मि.लि., सिट्रोनेला तेल 5 मि.लि., जिरॅनियम तेल 5 मि.लि., निलगिरी तेल 5 मि.लि. या प्रमाणात मिसळावे. या मिश्रणातून 30 मि.लि. मिश्रण वेगळे घेऊन ते एक लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात 50 ग्रॅम साबणाचा चुरा मिसळावा.
3) हे मिश्रण जनावरांच्या अंगावर फवारावे. यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.
4) जनावरांमध्ये माईटमुळे खरुज हा त्वचाविकार होतो. या माईटच्या नियंत्रणासाठी हे मिश्रण उपयोगी आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...