संतुलित आहारामध्ये आंबोणाला अतिशय महत्त्व आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा याचं प्रमाण अधिक असते. खुराक म्हणजेच आंबोण 100 किलो मिश्रण तत्त्वावर नमुना बनवावे. ज्यामध्ये विविध खाद्य घटक वापरण्यात येतात. जनावरांना ऊर्जा पुरविण्याकरिता आंबोणामध्ये मका, ज्वारी, बाजरी यासारखी तृणधान्य वापरतात. तर प्रथिनांचं स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल यापासून मिळणारी पेंड वापरावी.
तृणधान्य किंवा कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ उदा. भाताचा किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, कडधान्यापासून डाळी बनविताना मिळणारी तूर, उडीद, मूग चुणी यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे खुराकात एक ते दोन टक्के खनिज मिश्रण, एक टक्के शिंपला पूड किंवा डायकॅल्शिअम फॉस्फेट आणि एक टक्का मीठ यांचादेखील अवलंब केला जातो. खुराकात विविध खाद्य घटक वापरण्याचे कारण म्हणजे एका पदार्थातील अन्नघटकांची उणीव दुसऱ्या पदार्थातील अन्नघटकातून भरून निघते. आंबोणामध्ये साधारणतः 25 ते 35 टक्के पेंड, 25 ते 35 टक्के तृणधान्य, 25 ते 45 टक्के तृणधान्यापासून आणि 20 ते 30 टक्के कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, एक ते दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टक्का मीठ यांचा समावेश होतो.
- गिरिधर शेवाळे, श्रीपूर, जि. सोलापूर
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गाई-म्हशींसाठी गोठ्याची रचना कशी असावी याबाबतची मा...
दुधाळ जनावरांमध्ये कासदाह हा आजार दिसून येतो. कासद...
पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते, तसेच तापमानह...
गाई, म्हशीतील कासदाह आजाराचे नियंत्रण करण्यासाठी त...