तोंड व पायाचा रोग तोंड व पायाचा रोग (एफएमडी) हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्यासारख्या खुरे असलेल्या जनावरांमध्ये (दुभागलेला पाय) सर्वांत जास्त संसर्गजन्य असलेला रोग आहे. हा रोग भारतामध्ये स्थानिक विशेष आहे आणि रोगट जनावरांचे उत्पाद दुस-या देशांमध्ये निर्यात करण्यावर प्रतिबंध असल्यामुळे त्यामूळे उत्पादकतेमध्ये कमतरता आल्याने देशाला गंभीर आर्थिक हानि होते. लक्षणे काय असतात ? खूप ताप येणे दुग्ध-उत्पादनात कमतरता येणे पाय, तोंड आणि कांस यांवर फोड येणे पायांमध्ये फोड आल्याने लंगडणे तोंडात फोड आल्याने तोंडावाटे फेसाळलेली लाळ गळणे तोंडामध्ये रोगाची लक्षणे पायांत रोगाची लक्षणे हा रोग कसा पसरतो ? १. प्रभावित जनावरांच्या लाळेतून व मल-मूत्रांतून, दुधातून तसेच फोडांमधील द्रवपदार्थाच्या वाहण्यातून विषाणू बाहेर टाकला जातो. २. विषाणू एकीकडून दुसरीकडे हवेच्या माध्यमाने पसरतो आणि विशेषत: जेव्हां हवेत आर्द्रता जास्त असते तेव्हां विषाणू एका जागेतून दुसरीकडे सहज पसरतो. 3. रोग-प्रभावित जनावरांपासून निरोगी जनावरांना खाद्य, पाणी आणि कुत्रे, पक्षी यां सारख्या प्राण्यापासून तसेच शेतावरील कामगारांच्या इकडे-तिकडे येण्या-जाण्यामुळे देखील हा रोग पसरतो. ४. संसर्ग झालेल्या शेळ्या व डुकरे मल-मूत्रामार्गे व्हायरस बाहेर टाकतात आणि हा रोग तीव्रतेने पसरविण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. ५. देशी/स्थानिक जनावरांपेक्षा गुरा-ढोरांच्या संकरित प्रजाती संसर्ग होण्यासाठी जास्त संवेदनशील/ सुग्राह्य असतात. ६. संसर्ग झालेल्या जनावरांच्या एका जागेतून दुसरीकडे वाहतूक केल्याने देखील हा रोग पसरतो. उत्तर-परिणाम काय आहेत? रोगग्रस्त जनावरे चर्वण करणे, गर्भधारण करणे, उष्णता सहन करणे यांसाठी संवेदनक्षम होतात आणि दुग्ध उत्पादनात कमतरता येते. प्रसरण कसे नियंत्रित करावे? स्थानिक-विशेष क्षेत्रांमध्ये निरोगी जनावरांना पाठविले जाऊ नये. प्रभावित क्षेत्रांमधून जनावरांची खरेदी करण्यात येऊ नये. नव्याने विकत घेतलेल्या जनावरांस वैद्यकीय परीक्षण पूर्ण होईपर्यंत फार्ममध्ये/शेतात इतर जनावरांपासून २१ दिवस वेगळे ठेवण्यात यावे. उपचार तोंड व पायांचा रोग असलेल्या जनावरांना १% पोटॅशियम परमँगनेट असलेल्या पाण्याने धुवावे. पायांच्या फोडांना ऍन्टिसेप्टिक लोशन लावावे. बोरिक ऍसिड व ग्लिसरिनचा लेप तोंडातील फोडांवर लावावा. रोगग्रस्त जनावरांना उपशामक आहार द्यावा आणि त्यांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवण्यात यावे. लसीकरणाचा वेळापत्रक-तक्ता ६ महिन्यांतून एकदा एफएमडी संवेदनक्षम जनावरांचे लसीकरण करावे. लसीकरणा कार्यक्रमात गुरु-ढोरे, शेळ्या, मेंढ्या आणि डुकरे यांचा ही समावेश असावा. वासरांना प्रथम लसीकरण ४ महिने वयाची झाल्यावर आणि दुसरे लसीकरण ५व्या महिन्यांत द्यावे. त्या नंतर बूस्टर डोज् ४-६ महिन्यांनी एकदा द्यावा. स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम