सध्याच्या काळात उपलब्ध हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने मुरवून त्यापासून सुरघास तयार करावा. शेतीतील दुय्यम उत्पादनावर प्रक्रिया करावी, घरच्या घरी पशुखाद्य तयार करावे. अशा प्रकारे येत्या काळातील चारा टंचाईसदृश परिस्थितीमध्ये जनावरांच्या आहार व्यवस्थापनावर लक्ष ठेवावे.
गाई, म्हशींच्या व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त खर्च हा जनावरांच्या आहारावर होत असतो, त्यामुळे पशुआहारावर विशेष लक्ष द्यावे. आनुवंशिकदृष्ट्या गाय किंवा म्हैस कितीही उच्च वंशावळीची असली तरी तिचे आनुवंशिक गुण प्रत्यक्ष दूध उत्पादनामध्ये उतरविण्याकरिता त्यांना संतुलित आहार देणे आवश्यक आहे.
सर्वसाधारण 400 किलो वजन व 18 ते 20 लिटर दूध उत्पादन असणाऱ्या गाईसाठी खालीलप्रमाणे आहार द्यावा. त्यामुळे गाईचे आरोग्य चांगले राहून दुग्धोत्पादनामध्ये सातत्य मिळते.
1) हिरवा चारा - 20-25 किलो
2) वाळलेला चारा - 4-6 किलो
3) पशुखाद्य - 6-7 किलो
4) खनिज मिश्रणे - 40-50 ग्रॅम
5) स्वच्छ पाणी - 60-70 लिटर
1) जनावरांच्या संख्येनुसार मुरघास तयार करावा. मोठ्या प्रमाणात मुरघास खड्ड्यामध्ये बनवला जातो. त्यासाठी जमिनीमध्ये योग्य आकाराचा खड्डा तयार करावा. खड्ड्यातील चाऱ्यामध्ये पाणी किंवा ओलावा जाऊ नये यासाठी खड्ड्याच्या भिंती सिमेंटने बांधून घ्याव्यात किंवा खड्ड्यामध्ये प्लास्टिक कागद टाकावा. जनावरांची संख्या कमी असल्यास असा मुरघास प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येदेखील बनवता येतो.
1) चाराटंचाईच्या काळात गहू किंवा भाताचे काडाचा वापर जनावरांच्या आहारात करावा. हा चारा अधिक रुचकर व पौष्टिक करण्यासाठी त्यावर युरिया, मीठ व गूळ यांचे द्रावण शिंपडावे.
2) 100 किलो गव्हाच्या काडावर प्रक्रिया करण्यासाठी 20 लिटर पाण्यामध्ये तीन किलो युरिया, चार किलो गूळ, एक किलो मीठ व एक किलो खनिज मिश्रणे विरघळवून द्रावण तयार करावे.
3) गव्हाचे काड जमिनीवर पसरावे. युरिया, गूळ, मीठ यांचे मिश्रण शिंपडावे. चारा आणि द्रावण चांगले मिसळून वाळवावे. मिश्रण प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरून ठेवणे.
4) पंधरा ते वीस दिवसांनी जनावरांच्या आहारात थोड्या थोड्या प्रमाणात वापरावे.
1) संतुलित आहारामध्ये हिरवा आणि वाळलेला चारा याबरोबरच पशुखाद्य देणे आवश्यक आहे.
2) प्रत्येक जनावरांस एक ते दीड किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी द्यावे लागते. तसेच दुभत्या जनावरांस प्रत्येक 2.5 लिटर दुग्धोत्पादनासाठी एक किलो पशुखाद्य द्यावे लागते.
3) घरच्या घरी पशुखाद्य तयार करून शेतकरी हा खर्च कमी करू शकतात. घरगुती पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारे घटक व टक्केवारीनुसार त्यांचे प्रमाण खालीलप्रमाणे वापरावे.
1) भरडलेले धान्य - 25-30 टक्के
2) भरडलेल्या डाळी - 10-15 टक्के
3) धान्याचा कोंडा - 10-15 टक्के
4) कोरडी पेंड - 10-15 टक्के
5) तेलयुक्त पेंड - 15-20 टक्के
6) काकवी/गूळ - 1-2 टक्के
7) क्षार मिश्रणे - 1-2 टक्के
8) मीठ - 1 टक्के
प्रा. सागर सकटे, प्रा. मोहन शिर्के
संपर्क - प्रा. सागर सकटे- 9423044351
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) म्हणून कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट प्रस्तूत जीवामृत निर्मि...
वेलंग (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील प्रयोगशील शे...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करताना साधारणपणे 2.5...