অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्ध व्यवसायासाठी म्हशींच्या जाती

निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे, उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे.

म्हशींच्या जाती


मुऱ्हा


उत्तर भारतात, तसेच महाराष्ट्रात ही जात आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण 1800 ते 2000 लिटर असते. त्यात गाईच्या दुधापेक्षा स्निग्धांश जास्त असतो.

मेहसाणा


ही जात सुरती व मुऱ्हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 3000 लिटरपर्यंत दूध देतात.

पंढरपुरी


सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम; पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य. म्हशीचे वजन साधारण 400 किलो व रेड्याचे वजन 500 किलो असते. पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात आणि 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताचे वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातींत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देतात.

सुरत


शरीर बांधा मध्यम, डोळे लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात. भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम आणि विळ्यांच्या आकारांची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन 1800 लिटर असते.

पैदासीचे नियोजन

म्हशीचे प्रजोत्पादन करण्यासाठी शुद्ध जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा. लवकर गाभण राहणाऱ्या व जास्त दूध देणाऱ्या म्हशीपासून पैदा झालेला वळू निवडून त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातीची शुद्धता व वैशिष्ट्ये जतन करावीत. निवड पद्धतीनेच म्हशींमध्ये सुधारणा करणे शक्‍य आहे. त्यापासून मिळणाऱ्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते.

आहार व निगा

क्षमतेइतके दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणतः 400 किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज 25 किलो हिरवा चारा व आठ किलो कोरडा चारा तिची भूक भागविण्यासाठी शरीर पोषणासाठी द्यावा. दूध निर्मितीसाठी, दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या 50टक्के खुराक द्यावा म्हणजे दूध उत्पादनाचे सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी 60 ते 75 लिटर पाणी रोज लागते.

श्रीकांत यादव, फलटण, जि. सातारा

संपर्क - 0231-2692416
सर्वसमावेशक पंढरपुरी म्हैस सुधार प्रकल्प, शेंडापार्क, कोल्हापूर

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate