অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दूध भेसळीचे दुष्परिणाम

दुधात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. भेसळ करणारे दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपड्यांची पावडर, युरिया इ. पदार्थ मिसळतात. या भेसळीमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात. भेसळ ओळखण्याबाबत माहिती करून घेऊ.
दूधाचे माप वाढविल्यामुळे त्यातील एस.एन.एफ. (घनपदार्थ विरहित स्निग्ध) कमी होते. हे टाळण्यासाठी त्यामध्ये लॅक्‍टोज, साखर, ग्लुकोज तसेच पीठ व मैदा अशा प्रकारचे स्टार्च; मीठ, युरिया, स्कीम मिल्क (दुधाची) पावडरची भेसळ करण्यात येते. ग्रामीण भागात शक्‍यतो प्रत्येक दिवशी एकाच वेळेला दूध संकलन केंद्रावर दूध संकलित केले जाते. अशा ठिकाणी दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपड्यांची पावडर, युरिया इत्यादींसारखे पदार्थ मिसळतात.

भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम


भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास अपायकारक असते, त्यापासून असाध्य आजार उद्‌भवण्याची शक्‍यता असते जसे की - आय.सी.एम.आर.च्या अहवालानुसार भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यांसारखे अवयव निकामी होण्याची भीती असते, तसेच कॉस्टिक सोड्याच्या भेसळीमुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्‍यक असणारे लायसिन हे अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही. परिणामी लहान मुलांच्या शरीरवाढीवर परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते. यामधील सोडिअमसारख्या घटकाचा मानवी शरीरावर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदय विकारासारखे आजार जडतात.

दूध भेसळ कशी ओळखाल?

दूध स्वीकृती केंद्रावर अत्यंत प्राथमिक स्वरूपात दुधाचा वास, चव, आम्लता, रंग, काडीकचरा तपासतात. या व्यतिरिक्त घटकांची किंवा अखाद्य घटकांची झालेली भेसळ ओळखण्यासाठी सोबतच्या चौकटीत दिल्याप्रमाणे शास्त्रीय चाचण्या घेणे आवश्‍यक आहे.


अरुण देशमुख, 9422737089
सुनील अंडागळे, 9890730563
पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

----------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate