जनावरांमध्ये संसर्गजन्य रोगाचा प्रसार हवा, पाणी, पक्षी यांच्यामार्फत झपाट्याने होतो. संसर्गजन्य रोगाने जनावरांचा मृत्यू झाल्यास योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. अन्यथा संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊन इतर जनावरे रोगाने प्रादुर्भावित होण्याची शक्यता असते.
मृत जनावराचे नाक, कान, घसा, तोंड, गुदद्वार, जननेंद्रियांचा बाह्य भाग इत्यादी शारीरिक भागांतून स्राव किंवा दुर्गंधी येण्याची शक्यता असते. त्यासाठी जंतुनाशकाच्या द्रावणात बुडवलेले कापसाचे बोळे घालून ती छिद्रे बंद करावीत म्हणजे स्रावाबरोबर मृतदेहातील जंतू बाहेर पडणार नाही. निलगिरी तेल किंवा सुगंधी तेल जनावरांच्या शरीरावर शिंपडावे.
ही पारंपरिक व सोयीस्कर पद्धत आहे. मृतदेह पुरण्यासाठी ८ ते १० फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये मृतदेह पुरल्यानंतर ५ ते ६ फूट माती जनावराच्या शरीरावर राहील अशा प्रकारे जागेची निवड केली जाते. मृत जनावर पुरण्यासाठी जागेची निवड करताना योग्य ती काळजी घ्यावी. पुरण्यासाठी जागा ही पाण्याचा ओढा, नदी, विहीर व तळे यापासून दूर असावी. पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. एक बैल पुरण्यास साधारणतः १.५ ते २.५ स्क्वेअर यार्ड एवढी जागा आवश्यक असते. ८ ते १० फूट खोलीचा खड्डा खोदून त्यामध्ये मृत जनावराचा पाठीचा कणा जमिनीवर राहील व चारही पाय वर असतील अशा पद्धतीने पुरावे. पाय वाकवावेत. मृत जनावराच्या देहावर कळीचा चुना किंवा जंतुनाशक टाकून मृतदेहावर माती टाकून खड्डा दाबून पुरावे. मृतदेह पुरलेल्या जागेची सहा महिन्यांपर्यंत नांगरणी करू नये.
एकमेकांस संलग्न खंदक पद्धती - या पद्धतीमध्ये सात फूट लांबीचे दोन खंदक एकमेकांस छेदतील अशा तऱ्हेने खणतात. प्रत्येक खंदक १५ इंच रुंदीच्या मध्यात १८ इंच खोलीचा खंदक दोन्ही बाजूंस उथळ केलेला असतो. उंचवट्यावर लोखंडी साखळी किंवा लाकडाचे खांब ठोकून खंदकात पालापाचोळा, लाकडे भरतात. त्यावर मधोमध मृतदेह ठेवतात. त्यावर ज्वलनशील तेज ओतताच आग लावली जाते. अशा तऱ्हेने मृतदेहाचे दहन केले जाते.
(लेखक मराठा विद्या प्रसारक समाजकर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन:
अंतिम सुधारित : 7/26/2020
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...