অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योग्य पद्धतीने करा जनावरांची वाहतूक

जनावरांची वाहतूक करताना योग्य काळजी घ्यावी. वाहतुकीमध्ये काळजी न घेतल्याने जनावरे आजारी पडण्याची आणि दगावण्याची शक्यता असते. जनावरांची वाहतूक शक्यतो पहाटे किंवा सायंकाळी करावी. दुपारच्या कडक उन्हात वाहतूक केल्यास जनावरांना उष्माघात होण्याची शक्यता असते. 
जनावरांना वाहतुकीच्या एका दिवसअगोदरपासून पूर्ण आराम तसेच मुबलक पाणी व चारा द्यावा. जनावरांना गोठ्यात किंवा झाडांच्या सावलीत ठेवावे. ऊन, वारा व पाऊस यापासून त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

१) पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून जनावरांची तपासणी करून घ्यावी. आजारी जनावरांना वेगळे करून त्यावर उपचार करावेत. आजारी जनावरांची वाहतूक टाळावी.
२) गाभण काळात ७ ते ९ महिन्यांच्या तिसऱ्या टप्प्यात गाई, म्हशींची वाहतूक टाळावी. हा काळ गाई, म्हशींसाठी अतिशय नाजूक असतो. अशा गाई, म्हशींना मुबलक चारा आणि पाणी द्यावे. शक्यतो जनावरांना आराम घ्यावा. 
३) जनावरांची वाहतूक शक्यतो पहाटे किंवा सायंकाळी करावी. दुपारच्या उन्हात वाहतूक केल्यास जनावर उष्माघाताला बळी पडण्याची दाट शक्यता असते. 
४) वाहतुकीसाठी वाहनांचा वापर करताना हौद्यामध्ये उपयोगात नसलेला चारा, लाकडाचा भूसा, गोणपाट अशा वस्तू पसरून नरम पृष्ठभाग तयार करावा. त्यामुळे जनावर घसररून त्याला इजा होणार नाही. 
५) अधीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. 
६) जनावर जिथे घेऊन जाणार आहात तिथे अधीच सुचित करून ठेवावे. हे जनावर पोचताच लगेच चारा, पाण्याची सोय करावी.

जनावरांसाठी वाहतुकीचा नियम

भारत सरकारच्या अध्यादेशानुसार जनावरांशी अमानुष वागणूक प्रतिबंध कायदा १९६० मधील घटक ३८ उपघटक १ मध्ये जनावरांच्या वाहतुकीचे नियम २००८ दुरुस्तीचा समावेश केलेला आहे. ही दुरुस्ती पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकारच्या जनावरांच्या वाहतुकीचे नियम १९७८ या अध्यादेशात करण्यात आली आहे. या अध्यादेशानुसार नियमांचे पालन केल्यास जनावरांना त्रास कमी होतो. जनावरांची शारीरिक स्थिती खालावत नाही. नियमांचे उल्लघन केल्यास, ज्यामुळे जनावरांना शारीरिक व मानसिक हानी होत असेल, तर तो पशुपालक शिक्षेस पात्र ठरू शकतो.
प्रति गाय/ म्हशीसाठी वजनानुसार लागणारी जागा. ट्रक किंवा इतर साधनांचा वापर करून वाहतूक करताना गाई/ म्हशींची संख्या.
वाहनाचा आकार (चौ.मी.) ---- वाहनातील उपलब्ध जागा (चौ.मी.) ---- गाई/म्हशींसाठी संख्या 
- ---- - ---- २०० किलो वजन (१ चौ.मी. प्रति गाय/ म्हशीसाठी) ---- २००-३०० किलो वजन (१.२० चौ.मी. प्रति गाय/ म्हशीसाठी) ---- ३००-४०० किलो वजन (१.४० चौ.मी. प्रति गाय/ म्हशीसाठी) ---- ४०० किलोपेक्षा जास्त (२ चौ.मी. प्रति गाय/ म्हशीसाठी) 
६.९x२.४ ---- १६.५६ ---- १६ ---- १४ ----१२ ---- ८ 
५.६x२.३ ---- १२.८८ ---- १२ ---- १० ---- ८ ---- ६ 
४.१६x१.९ ---- ७.९०४ ---- ८ ---- ६ ---- ६ ---- ४ 
२.९x१.८९ ---- ५.४८१ ---- ५ ---- ४ ---- ४ ---- २

शेळी/ मेंढी यांच्यासाठी ट्रक किंवा इतर साधनांचा वाहतुकीसाठी वापर

शेळी/ मेंढीचे वजन ---- लागणारी जागा (चौ.मी.) 
- ---- लोकरसहित ---- लोकर कापलेली 
२० किलो पेक्षा कमी ---- ०-१७ ---- ०-१६ 
२० किलो पेक्षा जास्त पण २५ किलो पेक्षा कमी ---- ०-१९ ---- ०-१८ 
२५ किलो पेक्षा जास्त पण ३० किलो पेक्षा कमी ---- ०-२३ ---- ०-२२ 
३० किलो पेक्षा जास्त पण ४० किलो पेक्षा कमी ---- ०-२७ ---- ०-२५ 
४० किलो पेक्षा जास्त ---- ०-३२ ---- ०-२९
वराहांच्या वाहतुकीसाठी लागणारी जागा 
प्रकार ---- गाडीचा आकार मी. आणि त्यानुसार वराहांची संख्या 
- ----------------- ५.६x२-३५ मी. ---- ५.१५x२-१८ मी. ---- ३.०३x२.१८ मी. ---- २.९x२.० मी. 
विनर १२-१५ किलो ---- ४३ ---- ३७ ---- २२ ---- १९ 
वाढीव ३-६ महिने किंवा १५.५० किलो ---- ३१ ---- २६ ---- १५ ---- १३ 
वयात आलेले ६ महिन्यांवरील किंवा ५० किलोपेक्षा जास्त ----२१ ---- १८ ---- १० ----९ 

डॉ. शरद दुर्गे - ०८४३९८९४००५ 
(भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्था, इज्जतनगर, बरेली, उत्तर प्रदेश येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate