অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करडांना द्या सकस आहार

शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन वाढीसाठी प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. या खाद्यामुळे जुळे व तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते. या खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के इतके असावे.
करडांना सकस आहार देताना प्रथिनयुक्त खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 18 टक्के आणि एकूण पचनीय पदार्थांचे प्रमाण 75 टक्के इतके असावे. शेळीपासून वेगळे केलेल्या पिलास उत्तम वाढीसाठी अधिक पोषणतत्त्वांची गरज असते. अशी पोषणतत्त्वांचा पुरवठा करण्यासाठी करडांना दूध पाजणे बंद करण्याआधीपासूनच प्रथिनयुक्त खुराक द्यावा.

प्रथिनयुक्त खुराक देण्याचे फायदे

1) शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन वाढीसाठी प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. विशेषतः जुळे व तिळे असणाऱ्या पिलांमध्ये उत्तम वाढ होते. या खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के इतके असते. 
2) प्रथिनयुक्त खाद्य देण्यामुळे पिलांचे प्रतिदिन वजन झपाट्याने वाढण्यास मदत होते. 
3) कमी वयात विक्री करण्याइतपत करडांचे वजन वाढते. 
4) वसंत ऋतूमध्ये जन्मलेल्या (21 मार्च ते 22 जून) करडांमध्ये उन्हाळ्यात उष्णतेमुळे येणारा ताण कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यातही करडांचे वजन वाढते. नफ्यामध्ये वाढ होण्यास मदत होते. 
5) शेळीपासून करडास वेगळे केल्यास करडांवर एक प्रकारचा ताण येतो. प्रथिनयुक्त खाद्य करडांना शेळीपासून वेगळे करण्यापूर्वीपासून दिल्यामुळे ताण येण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे वजनात झपाट्याने वाढ होऊन करडे लवकर पैदासक्षम बनतात.

प्रथिनयुक्त खाद्य देताना

1) शेळ्या, करडांना नेहमी प्रथिनयुक्त खाद्याची सवय लागते. 
2) प्रथिनयुक्त खाद्य देताना उत्पादन खर्च व वजनवाढ या बाबींचा विचार करून प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. जेणेकरून नफा वाढेल. खाद्य व वजनवाढ यांचे प्रमाण 5ः1 असे असावे. 
3) बाजारपेठेत करडाच्या किती किमान वजनाला मागणी आहे, याचा विचार करून करडांचे व्यवस्थापन करावे. 
4) करडे खाद्य घटक चाटण्याचे लवकर शिकतात. करडांमध्ये कोठीपोटीचे कार्य लवकर सुरू होण्यास मदत होते, त्यामुळे झपाट्याने व अधिक वजनवाढीसाठी प्रथिनयुक्त खाद्य 3 ते 5 आठवडे वयापासून देणे अत्यंत गरजेचे आहे.

नवजात करडांतील मृत्यूचे प्रमाण

1) मोठ्या शेळ्यांपेक्षा नवजात करडांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आढळते, त्यामुळे करडाची अधिक काळजी घ्यावी. 
2) नवजात पिलांचा मृत्यू 50 टक्के पहिल्या महिन्यात तर 25 टक्के मृत्यू पहिल्या आठवड्यामध्ये होतो. नंतर करडांना दूध पाजणे बंद केल्यामुळे वयाच्या 3 ते 5 महिने या वयात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. 
3) संकरित शेळ्या व भारतीय शेळ्यांमध्ये करडाच्या मृत्यूचे प्रमाण 10 ते 74 टक्के इतके असते. फेब्रुवारी ते एप्रिल व ऑक्‍टोबर ते डिसेंबर महिन्यात करडांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. 
4) शेळीपालनामध्ये करडांची 10 टक्के मरतूक ही नैसर्गिक मानली जाते. यापुढील मृत्यूचे प्रमाण शेळीपालनातील तोटा वाढवण्यास कारणीभूत ठरते.

करडांमधील मरतुकीची कारणे

1) शेळीचे गाभण काळातील कुपोषण झाल्यामुळे अशक्त करडे जन्मास येतात. 
2) शेळीला गाभण काळात रोगप्रतिबंधक लसीकरण केलेले नसणे. 
3) करडांना जन्मतः चीक कमी मिळणे. 
4) शेळीला दूध कमी असणे. 
5) अस्वच्छ परिसरामुळे होणारा जंतांचा आणि रोगांचा प्रादर्भाव. 
6) पिण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर. 
7) गोठ्यातील दमट वातावरण, अति थंड हवामान. 
8) करडांसाठी गोठ्यातील अपुरी जागा. 
9) दूध पाजण्यासाठी, पाण्यासाठी अस्वच्छ भांड्याचा वापर. 
10) करडांमध्ये न्यूमोनिया, हगवण इ. कोलाय प्रादुर्भाव, मावा, देवी, आंत्रविषार, सांधेदुखी, कॉक्‍सिडीओसीस या आजारांचा प्रादुर्भाव. 
11) करडांमध्ये क्षार व जीवनसत्त्वे यांच्या अभावामुळे रोगप्रतिकार शक्तीचा अभाव.

करडांचे व्यवस्थापन

1) करंडाचे खूर वेळोवेळी कापून घ्यावेत. जेणेकरून करडामध्ये पायाच्या समस्या, लंगडणे, फुटरॉट असा समस्या उद्‌भवणार नाहीत. 
2) शिंगाचा त्रास होऊ नये म्हणून वयाच्या दोन आठवड्यांत शिंगकळ्या जाळून घ्याव्यात. 
3) कळपामध्ये जास्तीचे नर असतील तर ते समस्या निर्माण करतात म्हणून जास्तीच्या नरांचे खच्चीकरण करून घ्यावे. वयाच्या चौथ्या आठवड्यात नराचे खच्चीकरण करावे.
संपर्क ः डॉ. पाटील ः 9423870863
(लेखक शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र संकुल, पशू वैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate