1) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.
2) ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे.
3) एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी 50 किलो, तर शेळीचे वजन 32 किलोपर्यंत भरते.
4) ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.
संपर्क -
02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करडांची वाढ चांगल्या प्रकारे होते की नाही, ते पाहण...
शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर,...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...