1) बोअर ही शेळ्यांमध्ये सर्वांत जास्त वाढीचा वेग असणारी जात आहे. आपल्याकडील वातावरणामध्ये ही जात चांगल्या प्रकारे वाढते. विल्यानंतरचे लहान नर करडाचे वजन 3 किलो, तर मादी करडाचे वजन 2.5 किलो असते. सात महिन्यांच्या नराचे वजन 40 ते 50 किलो आणि मादीचे वजन 45 ते 50 किलो होते.
2) चांगले खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन असेल, तर पहिल्या 12 महिन्यांत दररोज वाढीचा वेग 200 ग्रॅम असतो. त्यानंतर 270 दिवसांच्या दरम्यान 250 ग्रॅम प्रति दिन असा वाढीचा वेग असतो.
3) या शेळीचा गाभण काळ 148 ते 150 दिवसांचा असतो. 50 टक्के शेळ्या दोन करडे देतात. या शेळ्यांची वाढ जास्त असल्याने त्यांच्या वजन वाढीच्या प्रमाणात खाद्य द्यावे लागते. खाद्यामध्ये एक भाग सुका चारा, दोन भाग ओला चारा आणि खुराकही द्यावा लागतो.
4) शेळ्यांना पावसाळ्यापूर्वी घटसर्प, ब्रुसेला, लाळ्या खुरकूत, पीपीआर या रोगांच्या नियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असते. लसीकरण पावसाच्या अगोदर करावे.
5) व्यवस्थापन चांगले असेल, तर बोअर जातीच्या शेळ्यांचे जिवंत वजनाच्या 50 टक्क्यांपर्यंत खाण्यायोग्य मटण मिळते.
संपर्क - डॉ. तेजस शेंडे - ९९७०८३२१०५
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
करडांची वाढ चांगल्या प्रकारे होते की नाही, ते पाहण...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर,...