Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/13 18:05:39.455686 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / आनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल
शेअर करा

T3 2020/08/13 18:05:39.460215 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/08/13 18:05:39.485607 GMT+0530

आनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल

आनंद ऍग्रो ग्रुप, यशस्वी वाटचाल,

आनंद ऍग्रो ग्रुपची २० वर्षांची यशस्वी वाटचाल

कृषी व पूरक व्यवसायात उत्तर महाराष्ट्रात  उद्योजकता  रुजावी यासाठी  कुक्कुटपालन  व्यवसाय  करताना  विधायक  दृष्टीकोन, समूहाची  प्रगती साध्य करण्याच्या दिशेने आनंद अॅग्रो ग्रुपच्या कामकाजास सुरुवात झाली. आज  याच  प्रयत्नांना  दोन दशकं पूर्ण झालीत. समूहाने आपल्या  वाटचालीत  जपलेली  महत्वकांक्षा, त्याची  उद्दिष्टपूर्ती, कामाचे स्वरूप विस्तारताना  प्रत्येकाशी  जपलेली  बांधिलकी  व  प्रशिक्षित  मनुष्यबळाच्या  माध्यमातून  समूहाचे व्यवस्थापन हि आनंद अॅग्रो ग्रुपची खास वैशिष्ठे आहेत. नवनवीन कल्पना आणि धोरणांची अंबलबजावणी,  व्यवस्थापनाच्या अत्याधुनिक सुविधांसह कॉर्पोरेट जगताकरिता अनुकरणीय अशा प्रबळ इच्छाशक्तीसह आनंद ऍग्रो ग्रुपचे हे मॉडेल महाराष्ट्रासह इतर राज्यातही  आदर्श ठरत आहे.

आनंद अॅग्रो समूहाने नुकतेच 20 व्या वर्षांत पदार्पण केलेय. पुनद-गिरणा खोऱ्यात 1997 मध्ये रुजलेल्या या रोपट्याचा आज महावृक्ष झालाय...गेल्या वीस वर्षांतील लखलखत्या प्रवासानंतर आज आनंद अॅग्रो समूहच जणू काही एक प्रकाशाचं बेट झालय.समूहाचे संस्थापक उद्धव आनंदा आहिरे यांचा 'शेतकरीपुत्र ते प्रतिभाशाली उद्योजक' असा अचंबित करणारा प्रवास आहे.

इच्छाशक्ती, ध्येयनिश्‍चिती, अपार  कष्ट  करण्याची  तयारी  आणि  विचारांची दूरदृष्टी असं सक्षम नेतृत्व त्यांच्या रुपात समूहाला  लाभल. व्यवसायवृद्धीच्या अनुशंगाने ग्रामीण क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक समूहाने  केली. सबंध उत्तर महाराष्ट्रात या माध्यमातूनच शक्तिशाली आर्थिक आणि सामाजिक  परिवर्तनाच्या  क्रांतीला सुरुवात झाली आणि ग्रामीण महाराष्ट्रात कृषी पूरक व्यवसायात उद्योजकता  रुजू लागली. ग्रामीण भागाला विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले .

संपूर्ण भारतात हरितक्रांतीनंतर कुक्कुटक्रांती नावारुपास आली. खाजगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन किफायतशीर व्यवसाय ठरत गेला. जागतिक धोरणांची अंबलबजावणी  करताना आनंद  अॅग्रो  समूहाने कालानुरूप बदल करून  करार पद्धतीने सहयोगी शेतकऱ्यांशी कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात केली. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील हजारो शेतकरी समूहाबरोबर जोडले गेले आणि त्यांचे जीवनमानही बदलले.

कुक्कुटखाद्यामध्ये स्वयंपूर्णता आणण्यासाठी १९९८ पासून थेट शेतकऱ्यांकडून मका खरेदीच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला सुरूवात केली. कोणतीही घट, कटती नाही. पारदर्शक पद्धतीने वजन करून केवळ दोन तासात शेतकऱ्यांच्या हाती रोख रक्कम दिली जाते. प्रति दिन ३०० टनापेक्षाही अधिक माल खरेदी करण्याची क्षमता आणि प्रति वर्ष सुमारे ६५ हजार टन मका खरेदी करत असल्यानेच आनंद ॲग्रोचा उत्तम दर हा परिसरात बेंचमार्क ठरत आहे. 20 हजार मका उत्पादक शेतकरी थेटपणे आनंद अॅग्रोशी जोडले गेले आहेत.या माध्यमातून मका उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीचा शाश्वत पर्याय उपलब्ध आहे.  अध्ययावत कार्यपद्धती, संशोधन  आणि नवनवीन तंत्रज्ञान याची कामकाजात  जोड दिली गेली. समूहाने सर्वोत्तम मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान यंत्रणा  आणि प्रगत प्रक्रियांचे  व्यावसायिक व्यवस्थापन पद्धती स्वीकारली व यातूनच कामाला गती मिळत गेली. महाराष्ट्र  राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायातील  अव्वल  कंपन्यांमध्ये आनंद अॅग्रो ग्रुप समूहाचा  आज  वरचा क्रमांक लागतो.

आनंद अॅग्रो ग्रुपने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुक्कुटपालन व्यवसायात भरारी घेतली आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, ठाणे व नंदुरबार या जिल्ह्यात समूहाचे कार्य विस्तारलेले आहे. समूहाची आठ ठिकाणी संगणकीकृत प्रशस्त शाखा कार्यालये असून ३५० कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. करार  पद्धतीने १२५० सहयोगी शेतकऱ्यांसोबत वाटचाल सुरु आहे. समूहाने ५००० लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

आनंद अॅग्रो ग्रुपचे १,००,००० क्विंटल क्षमतेचे स्वतःचे वेअरहाऊस असून यासाठी स्पेन (यूरोप) येथून सायलोज आयात केलेले आहेत. दररोज ४०० टन प्रतिदिन पॅलेट फीड उत्पादनक्षमता असलेला स्वयंचलित कारखाना उभारला आहे. १८ ते २० लाख ब्रॉयलर पक्षी दर महिन्याला पाठविण्यात येतात. पक्षांच्या निर्मितीकरिता आनंद अॅग्रो ग्रुपच्या  स्वमालकीच्या जागेत १,२५,००० पक्षी क्षमता असलेला ब्रीडर्स फार्म उभारलेले आहेत. हे  युनिट्स कंपनीने  दह्याणे, खेडगाव, हिंगळवाडी, एकलहरे, ढेकाळे या ठिकाणी  आहेत. ओपन हाऊन पद्धतीचे फार्म असूनही जैविक सुरक्षितता आणि गुणवत्तेमध्ये अव्वल पातळी गाठली आहे. मल्टी एज ग्रुप कॅटेगिरीत सर्वोच्च कामगिरीची नोंद कंपनीच्या नावावर आहे.

हिंगळवाडी येथे तीस कोटी रु. खर्चून वातावरण नियंत्रित अत्याधुनिक हॅचरिजची उभारणी केली आहे. यात मोजणीसह लसीकरणासाठी स्वयंचलित सुविधा तसेच पिल्लांची निर्मितीतील संसर्गावर तंत्रज्ञानाच्या मदतीने मात केली आहे.यामुळे  हॅचरीजचे उत्पादन प्रति माह ५ लाखावरून २२ लाखापर्यंत पोचले आहे.  मोठ्या प्रमाणावर असलेली हि एकमेव हॅचरी महाराष्ट्रात कार्यरत आहे. अर्थातच  एकाच छताखाली या समूहाने कुक्कुटपालन व्यवसायातील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.यापूर्वीच्या छोट्या उद्योगाच्या एकत्रीकरणातील नवीन संकल्पना जसे की करार पद्धतीने सहयोगी शेतकऱ्यांशी केलेला कुक्कुटपालन व्यवसाय यामुळे  शेतकरी  आनंद अॅग्रो  समूहाचा  कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

तंत्रज्ञान, संशोधन आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे समृद्धीसह शेतक-यांना सक्षम बनविण्यासाठी विविध योजनाची अंबलबजावणी सुरु आहे. आनंद अॅग्रो  समूहाचे यश म्हणजे नुसता विकास व  विस्तार नसून  शेतकर्यांसोबत असलेले  एकनिष्ठ नातेसंबंध आहेत. कंपनीशी जोडला गेलेला प्रत्येक घटक अगदी शेतकऱ्यांपासून विक्रेत्यांपर्यंत कंपनीच्या कार्यपद्धतीवर, पारदर्शकतेवर समाधानी आहे. त्यांचा आनंद अॅग्रोवर विश्‍वास बसला आहे. कोणत्याही प्रसंगी एकमेकांला सांभाळले जाईल, हा विश्‍वास बाजारपेठेत निर्माण केल्यानेच सर्वजण आनंद ॲग्रोशी एकनिष्ठ आहेत. त्या भरवश्यातूनच शुन्यातून सुरू झालेल्या या कंपनीची २०१७ मधील उलाढाल ३०० कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. हे सारं एका बाजूला सुरू असतानाच समाजिक कामांचा धडाकाही सुरू आहे. कंपनी कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये दप्तर, संगणक वाटपासह विद्यार्थी गुणगौरवाच्या कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करते. समाजाच्या सर्वांगीण प्रगती आणि समृद्धतेसाठी कार्यरत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे कौतुक करण्यासाठी गिरणा गौरव पुरस्काराचे आयोजनही केले जाते.

ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक विकासाच्या मूल्याची बांधिलकी म्हणून वचनबद्ध असलेल्या   आनंद अॅग्रो ग्रुपने शेतकऱ्यांना स्वतःचे अस्तित्व दिले आहे. पोल्ट्री इंटिग्रेशनच्या माध्यमातून हजारो शेतक-यांना उपजीविका आणि अप्रत्यक्ष रोजगाराची हमी प्रदान केली आहे.बदलत्या प्रवाहात आनंद अॅग्रो  समूह आधुनिकीकरणासह राष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे. रोजगाराची निर्मितीची मालिका साकारु पाहत आहे. शाश्वत विकासाचा पर्याय म्हणून  ग्रामीण महाराष्ट्राचं  उज्ज्वल भविष्य घडवित आहे.समुहाच्या ब्रीदाप्रमाने “सारे मिळून समृद्धीकडे” या विचारधारेला संपन्न बनविण्याचा हा अल्पावधीतला प्रयत्न वाखाणण्यासारखाच आहे. सक्षम कृषी पूरक व्यवसाय व आर्थिक क्रांतीची हि नांदी आपल्या सर्वाच्या सहकार्याच्या व अखंड मेहनतीचीच पावती आहे.

शब्दांकन व रचना :-

मुकुंद पिंगळे ९८६००६५३५५

2.92156862745
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/08/13 18:05:39.594588 GMT+0530

T24 2020/08/13 18:05:39.600793 GMT+0530
Back to top

T12020/08/13 18:05:39.404830 GMT+0530

T612020/08/13 18:05:39.425530 GMT+0530

T622020/08/13 18:05:39.445754 GMT+0530

T632020/08/13 18:05:39.446535 GMT+0530