केरळमधील कुट्टनाड, मानव-निर्मित अद्वितीय वेटलँड पर्यावरण पध्दतीने परिपूर्ण असून भातशेतीसाठी हा अतिशय उत्तम प्रदेश आहे. मात्र हे चित्र आता बदलत चालले आहे. मोठ्या प्रमाणावर करावी लागणारी गुंतवणूक, मजुरांची कमतरता आणि पिकाला मिळणारा कमी भाव ही या प्रदेशातील शेतकर्यांसमोरील मोठी आव्हाने आहेत.इतर शेतकरी या शेतीला पर्याय शोधत असतानाच श्री. जोसेफ कोरा, एक पारंपारिक भातशेती घेणारे शेतकरी, यांनी त्यांच्या चार हेक्टर जमिनीत जैविकरीत्या कोळंबीपालनाचा प्रकल्प सुरु केला.
सामुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) व इतर विकास संस्थांनी कोरा यांच्यासमोर जैविक जलशेतीची कल्पना मांडली व त्यांनी त्यावर अंमल करण्याचे ठरविले. त्यांच्या चार हेक्टर शेतात सुमारे 11 लाख कोंळंबीच्या बिया पेरण्यात आल्या. या बिया मिळविण्यासाठी, खाद्य पुरविण्यासाठी, सल्ला मिळविण्यासाठी त्यांना या अधिकार्यांची खूप मदत झाली. सुमारे 7 महिन्यांनंतर प्रत्येकी 30 ग्रॅम वजनाच्या व एकूण 1800 किलो वजनाच्या कोळंब्यांचे उत्पादन त्यांच्या शेतातून घेतले गेले.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
श्री. जोसेफ कोरा,
कारीवेलिथारा, रामनकारी (P.O.) 689-595
कुट्टनाड, अल्लेपी.
फोन: 0477-2707375 मोबाईल: 9495240886
श्री. आर. हळी,
फोन: 04070-2622453, मोबाईल: 9947460075
स्त्रोत: द हिंदू, दिनांक 8जानेवारी, 2009.
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...