विवेकानंदन कोईम्बतूर आपल्या दळणयंत्रासह दिसत आहेत
श्री.के.विवेकानंदन, कोईम्बतूर, (तामिळनाडु) यांनी रू.8 लाखांची गुंतवणूक केली आहे आणि मिरची व धणे दळण्यासाठी 3 अश्वशक्ति पिन पल्वेरिझर तयार केला आहे. श्री. विवेकानंदन म्हणतात "हे दळण यंत्र ग्रामीण स्त्रियांसाठी त्यांची घरगुती मिळकत वाढविण्यासाठी एक आदर्श महसुल उत्पादक आहे."
मिरची आणि धणे दळण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रांना उच्च अधिष्ठापन मूल्याची गरज असते आणि वीजदेखील खूप लागते, ग्रामीण क्षेत्रांत हे यंत्र अनुपयुक्त ठरते, कारण तेथे विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून राहता येत नाही.
श्री. विवेकानंदन यांनी यंत्र तयार केल्यावर विचार केला की त्यांनी 90 टक्के दळण संकटाचा उपाय केला आहे, आणि सुमारे अशी 100 यंत्रे निर्मिली. पण त्यांच्या दुर्देवाने त्यांना फक्त 20 ग्राहक मिळाले. काही ग्राहकांनी यंत्र परत दिले, कारण मिरची आणि धणे दोन्ही ही त्याच्या चाळणीतून निसरत नव्हते, आणि दळतांना फार धुराळा ही होत असे.
काम बंद होऊ लागल्याचे भासत होते, आणि सुमारे एक वर्षभर पुन्हा जोर धरला नाही. श्री.विवेकानंदांना व्हिलग्रो नांवाच्या एका संस्थेची माहिती मिळाली (ही संस्था ग्रामीण उद्यमींना सहाय्य करते) आणि त्यांनी मार्गदर्शनासाठी संस्थेशी संपर्क केला. व्हिलग्रोच्या कर्मचारीगणाने ह्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले.
तंत्रज्ञांनी सर्वप्रथम श्री.विवेकानंदांना एक 1 एचपी, सिंगल फेज यंत्र तयार करण्यास सांगितले, कारण यंत्र सुरूवातीलाच 3 एचपीसह चालू होऊ शकत नव्हते (ग्रामीण क्षेत्रांत एका 1 एचपी, सिंल फेज यंत्राचा वापर केला जाऊ शकतो कारण तेथे व्होल्टेज अनियमित असते). पुष्कळशा चाचण्यांनंतर त्यांना आढळले की मिरची आणि धणे यंत्राच्या स्क्रीनला चिकटून बसण्याचे कारण त्यांच्यातील फायबर घटक नव्हते तर रोटरचा वेग होता. त्याप्रमाणे, यंत्राचे वजन कमी करण्यात आले, त्याच्या भित्तिका, आकार, आणि स्टेटरचा व्यास व रोटर यांमध्ये बदल करण्यात आले ज्यायोगे ग्रामीण क्षेत्रांतील वापरास ते यंत्र उपयुक्त ठरावे.
श्री.विवेकानंदांनी वापर करण्यात आलेल्या सामग्रीचा विचार करून ग्रामीण गरजा भागविण्यासाठी यंत्राचे मूल्य/किंमत कमी केली. आता प्रत्येक यंत्राची किंमत रू.11,500 (मोटरसह) आहे.
श्री. के.विवेकानंदन,
मे. विवेगा/विवेका इंजिनियरिंग वर्क्स,
न्यू नं.:116-118,
कोईम्बतूर – 641006
मोबाइल नं.94437-21341.
स्त्रोत : द हिंदू
अंतिम सुधारित : 10/7/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...