Accessibility options
Accessibility options
Government of India
Loading content...
Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था03/08/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
राखी तूरी. एक गृहिणी. बोलपूरमध्ये राहणारी. ती भोलापूकूर बचत गटाचीही सभासद. तिचा नवरा बिकाश तूरी हा रिक्षा चालवतो. त्याचे मासिक उत्पन सोळाशे पन्नास-1650, जे त्यांच्या पाच जणांच्या कुटुंबासाठी खूपच तुटपूंजे होते. अनुसूचित जातीचे हे कुटुंब दारिद्रय रेषेखालीही येते. राखी कामाच्या शोधात होती, पण तिला काम असे मिळालेच नाही.
या प्रकल्पात पाच गटांना, ज्यामध्ये प्रत्येकी पाच महिला असतील अशांना सामावून घेण्यात आले. या गटांना बोलपूर आणि आजुबाजूच्या परिसरातील भाजीपाल्याचे टाकाऊ भाग गोळा करून, त्यापासून गांडूळ खत बनवण्याचे व्यावसायीक काम दिले जाणार होते. या भोलापुकूरच्या महिला गटापैकी एकाने गांडूळ खतासाठीचे पिटस बांधण्यासाठी जाम्बुंनी येथील सपोर्ट या संघटनेची जमीन घेतली. महिला सदस्यांना गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. या महिलांच्या कुटुंबातील पुरूषांनीही मग बाजारातील भाजीपाल्याच्या कचऱ्याचे टाकाऊ भाग गोळा करण्याच्या कामात मदत करण्यासाठीही पुढाकार घेतला. महिलांनी पालोपाचाळा आणि गायीचे शेण आदी गोळा करणे सुरु केले. या गांडूळ खतासाठी उच्चप्रतीच्या गांडूळांपासून खत तयार करणे सुरु झाले. यासाठी त्याने त्यांच्या या गांडूळ खतासाठी वसुंधरा व्हर्मी कंपोस्ट असे नावही दिले. पहिल्याच महिन्यात दोन व्हॅटस पासून त्यांना चारशे किलोग्रॅम खत मिळाले. खतासाठी किलोला दहा रुपये दर ठरवण्यात आला. विक्रीनंतर एक हजार रुपयांचा राखीव निधी बँकेत ठेवण्यात येऊ लागला. ज्यामधून पिट म्हणजे गांडूळ खतांचे खड्डे घेणे, देखभाल करणे सोपे जाणार होते. बाकीची सगळी रक्कम सर्व महिला सदस्यांमध्ये समान पद्धतीने वाटण्यात आली.
सुरवातीला राखी तूरी नेहमीच्या कामातून वेळ काढून यात दिवसाला एक ते दोन तास वेळ देत असे. पहिल्याच महिन्यात तिला यामधून दोनशे रुपये मिळाले. तिच्या नवऱ्यालाही कचरा आणि इतर गोष्टींच्या वाहतूकी पोटी, खतांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठीही अधिकची अशी कमाई झाली. राखी आता खूप समाधानी आहे. तिला आता आणखी कमाई करण्याचा विश्वास मिळाला आहे. अधिक वेळ दिल्यास आणखी काही रुपये मिळवता येईल, अशी तिला खात्री झाली आहे. त्यातूनच हा व्यवसाय आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्याची उर्मीही आता या सगळ्या महिलामध्ये निर्माण झाली आहे.
स्त्रोत: डिआरसीएससी, वृत्तपत्रिका, खंड-6
काजू बी वर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.
काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.
उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.
इमू हा पक्षी शहामृगासारखा दिसणारा ३० ते ४० किलो वजनाचा असून, साडेपाच ते सहा फुट उंचीचा असतो.
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत केली जाते. आडसाली उसाचा कालावधी 16 ते 18 महिन्यांचा असतो.
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्यक असते.
राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था
12/12/2014, 4:42:42 AM

@ चव्हाण / राजेश जी
गांडूळखत कसे तयार करावे याविषयी पुढील पेज ओपन करावे. त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
१. गांडूळखत शेतीस वरदान - http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_invest/fertiliser_Pestisides/91793e902921942933916924-936947924940938-93593092693e928
२. गांडूळखत : http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_invest/fertiliser_Pestisides/vermi_compost

धनयवाद

राजेश जी.
12/11/2014, 5:21:11 AM
श्री. चव्हाण यांनी सुचवल्या प्रमाणे गांडूळ खत तयार करण्याची पध्दतीची माहीती मिळाली तर खूपच शेतकरयांना त्याचा फायदा होईल ghanekarrajesh ११२@ग्मैल.काम
dinesh Chavan
7/20/2014, 12:43:49 PM

बचत गटातून असे व्यवसाय करून कुटुंबाचा विकास व समाजाचा विकास फार चांगला आहे . गांडूळ खात तयार करण्याची पद्दत इमेल वर द्यावे. vishakhafinance@gmail .com वर पाट्वणे

Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था03/08/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
73