विषय - महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली द्वारे हायड्रोपोनिक तंत्राद्वारे चारा् उत्पादक प्रकल्प अभ्यास अहवाल.
गाव - वसा. ता.जी.गडचिरोली
गटाचे नाव – तेजस्विनी वैनगगा दुध उत्पादक व संकलन गट
वसा द्वारे ( ३२ महिला )
दिनाकं - ३०-१०-२०१४ चारा उत्पादन प्रक्रिया प्रारंभ
दिनाकं – २४-११-२०१४ प्रशिक्षण कार्यक्रम व प्रात्यक्षिक (वडसा, चामोर्शी, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा येथील १२ गावातील १५२ महिला )
गडचिरोली जिल्यात वर्ष २००६-०७ पासून अएक हि दुध संकलन केंद्र वा दुध डेरी ,शाशकीय व खाजगी नाही.पशुपालन आहे परंतु परंपरागत,व्यवसाईक दुष्टीकोनचा अभाव आहे.च्राराव्यवस्थापन कडे दुर्लक्ष ,काही गैरसमजूती.तरी पण सदर व्यवसाय करिता येथे खूप वाव आहे.फक्त महिलांना याची जाणीव करून देणे व तांत्रिक, आर्थिक मदत मिळवून देणे.
गडचिरोली येथील वसा या गावातील तेजस्विनी वैनगंगा महिला दुग्ध संकलन व्यवसाय गट माहे ९ ऑगस्ट २०१४ पासून दुध संकलन करीत होते. पण दुधाची किंमत कमी मिळत होती व ग्राहकाचा सतत तक्रारी असायच्या करणाच्या अभ्यास केल्यानंतर कळले, की चारा व्यवस्थापन नसणे ,व दुधात भेसळ असणे त्यामुळे याच्या सहजरीतीने योग्य व पोषक चारा लागवडी बाबत माहिती घेन्यात आली.आत्मा प्रकल्प संचालक श्री.पोटे यांनी हाड्रोफोनिक व अझोला बाबत माहिती व त्याचा प्रयोग करिता निधी उपलब्ध करून दिले .
दुध उत्पादन व्यवसाय तील सर्वात जास्त खर्च ,दुधाची गुणवत्ता ,किमत,व प्रमाण याला प्रभावित करणारा घटक म्हणजे पशुआहार आहे. दर्जेदार पशु आहार ला खर्च व श्रम जास्त लागते .कमी श्रम ,खर्च,कमी वेळेत दर्जेदार चारा उत्पन्न करून ,दुध उत्पादक महिला व्यावसायीक ला जास्त नफा मिळवून देणे .व चारा व्यवस्थापन शिकविणे .दुग्धव्यवसाय करिता प्रोत्साहित करणे.
शेडमधील कोंब आलेली धान्य (बियाणे)
हायड्रोपोनिक्स हिरव्या चाऱ्याची पाहणी करताना
वरील प्रकारे दक्षता घेतल्यास आपण घरच्या घरी जनावरांना चांगल्या प्रतीचा जैविक पशुआहार / ऑरगॅनीक पशुआहार खायला देऊ शकतो तथा विक्री देखील करू शकतो. उन्हाळ्यात कितीही पाणी टंचाई असली तरी कमीत-कमी पाण्यात बिना माती द्वारा वाढविता येते. जरी इलेक्ट्रिकची सुविधा नसेल तरी सरीच्या सहाय्याने पाणी टाकून सदर चाऱ्याचा उत्पन्न घेता येईल........
जनावरांना खाण्यास योग्य वाढ झालेला हिरवा चारा
सदर प्रयोग पहिल्यांदा करताना अनुभवी तज्ञ कडून घेण्यात यावी. जेणे करून ज्या छोट्या-छोट्या दक्षता व निरीक्षने असतात ते प्रत्यक्षरित्या करतानाच सांगितले जाऊ शकतात.
विशेषता :- सदर प्रकल्पची विशेषता कमी पाणी,कमी जागा,कमी श्रम, कमी किमतीत घरच्या घरी दर्जेदार पौष्टिक चारा उत्पादन चे तंत्र आहे .
माविम घरातील प्रात्यक्षिक
सदर प्रशिक्षण घ्यावयाचे असेल तर हे प्रशिक्षण १ दिवसाचे असते. प्रशिक्षना दरम्यान शेड तयार असले पाहिजे. प्लास्टिक बांबू, किवा टीनाचे सच्छीद्र टेª ३/२ चे , बियाणे (गहू, मका, बाजरी) बिसलेरी किवा प्लास्टिकच्या खाली बाटल किवा फॉगर, पाईप, 1HP मोटर , प्लास्टिक शीट ३/२ च्या टेª च्या संख्येनुसार नमुना शेड सोबत दिलेला आहे वयक्तिक व सामुहीक्चे इ. वयक्तिक साठी ६ व सामुहीकसाठी शेडच्या क्षमतेनुसार टेª असायला पाहिजे. आवश्यक साहित्य तथा बियाणे प्रक्रिया करून ठेवावे. जेणे करून एका दिवसात सदर कार्याची उभारणी करता येते.
tata trust fello रिचा सावंत यांनी साताराला जाऊन प्रशिक्षण घेऊन आले. त्यानंतर सदर प्रात्यक्षिक पहिल्यांदा माविमघारातच घेण्यात आले होते. त्यांतर ते प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात घेण्यात आले. हे प्रात्यक्षिक घेताना व नंतर कार्यक्षेत्रात दोन दिवस जाऊन महिलांना याविषयी माहिती व प्रशिक्षण दिले. व शेड उभारून चारा लागवड केली. या प्रात्यक्षिकामुळे २ हिन्यात दुधाच्या गुणवत्तेत वाढ झाली. पहिले दुधाची किमत हि फक्त 16 रु. ते 17 रु. मिळत होती. ती आता हिरव्या चाऱ्यामुळे त्याच्यातील फॅट व डिग्री मधे वाढ झाली. म्हणून दुधाच्या किमतीत वाढ होऊन २३ रु झाली .सादर परिणाम पाहून प्रचार व प्रसार करिता दुध cluster च्या महिलांकरिता प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षनाकरिता DCF श्री. आदर्श रेड्डी, सभापती कृषी पशुसंवर्धन व वित्त अतुलभाऊ गण्यारपवार, श्री अनंत पोटे प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली, ग्रामीण बँक व्यवस्थापक ग्रामीण बँक गडचिरोली, KVK श्रीमती. सानप व ४ CMRC तील पशुपालक १४७ महिला उपस्थित होत्या.
१) दुधाची गुणवत्ता व मूल्य वृद्धी वसा ,या गावात ज्या १३ महिला नियमितपणे उपयोग करत आहे, त्याचं पशु च्या दुधात २०० ते ४०० mg.वाढ, दुधच्या फँट १.१० होते –आता ३.५० आहे. डिग्री २२ ते २४ होती-आता २८-२९ आहे. दिनशा डेरी वाले दुधाची किमत १६/-रु. देत होते-आता २४/-रु.ते २५/-रु आहे .पहले ४५ लिटर दुध डेरी ला जात होता – आता ६० लिटर दुध जात असते.
२) दुग्धप्रक्रिया करिता तुलनात्मक अभ्यास ऑक्टो-१४ ला अभ्यास करिता = ५ लि.दुधाचा खवा केला तर २००gm.झाला-व एप्रिल -१५ ला तीच प्रक्रिया पुनश्च केली तर खवा १०५० gm. झाला.
= उपरोक्त प्रमाणे पनीर २५० – ३०० gm. वरून
=तूप च्या प्रमाणात २०० gm ची वृद्धी झाली आहे .
याचा अर्थ असा की दुध ची गुणवत्ता वाढली.तर किमत वाढली , दुध ची गुणवत्ताच्या आधारे प्रक्रिया उद्योग सुरुवात केले तर ५लि. दुध मागे ५०/- ते १००/-रु चा.लाभ गटाला मिळु शकते.
चाराच्या खर्चात ५५% घट येते.चारा आणण्यासाठी श्रम कमी आहे .
३) प्रकल्प परिणामकारकता
अ] वसा,गड. चा उपक्रम पाहून ,कोंढाला ,वडसा येथे पण,याच धरतीवर दुध संकलन केंद्र शुरू झाले आहे.व अहेरी व चामोर्शी ला जुलै १५ ला प्रारंभ होणार .
ब] सदर उपक्रम मुळे जिल्हा परिषद पशु विभाग मार्फत २८ ,वन विभाग मार्फत१० ,व पशु आयुक्त विभाग मार्फत ६ , एकूण ४४ दुधाळ जनावर वर्ष १४-१५ ला मंजूर झाली.हाईड्रोपोनिक व अजोला चारा लागवड ला जि.प.द्वारा नरेगाअंतर्गत ४० लाख च बजट देण्यात आला .
क] सदर उपक्रमची यशस्विता पाहून यवतमाळ,भंडारा व गोंदिया जिल्यात उपक्रम राबविण्यात आले.
५)नियोजन – ३ दुध संकलन केंद्र चामोर्शी,अहेरी,सिरोंचा .,५०० महिलांना सादर प्रवाहात आणणे. ५ प्रक्रिया केंद्र उभारणे .सामुदायिक चरागाह ५ उभारणे .दुधाचा उत्पादन २००० लि. आणणे.४ cmrc मध्ये डेरी व्यवसाय वर आधारित mlp वर्ष १५-१६ करिता तयार करणे.
जनावरांना हिरवा चारा खायला देताना महिला
दुग्ध संकलन केंद्र व डेरी प्रकल्प - डेरी ला दुध वितरण करतांना
एक नाविन्य पूर्ण प्रकल्प अंतर्गत झालेला अभ्यास व नियोजन आपल्या ला सादर
संकलन / लेखक : वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, माविम, गडचिरोली
अंतिम सुधारित : 10/7/2020
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...