অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आशा-वन - एक उपक्रम

पश्चिम बंगालमधल्या बीरभूम मधला राजनगर विभाग, तिथले नारायणपूर हे खेडे. उन्हाळ्याच्या दिवसांत तिथे कोणाचीही बाहेर पडण्याची हिंमत होत नाही कारण त्या भागात सावलीसाठी मैलोनमैल अंतरामध्ये एकही झाड नाही. तिथे जानेवरी २००८ मध्ये नारायणपूर शिशु समिती म्हणजे एनएसएस स्थापन झाली. लॅटराइट प्रकारची लाल माती असलेली आणि शंभर टक्के नापीक मानली गेलेली ४० एकर जागा - तिथे फक्त गुरे चरायला येत - एनएसएसने ताब्यात घेतली. नंतर एनएसएसने १२ भूमीहीन आणि ४ अल्पभूधारक आदिवासी व्यक्तींना हाताशी धरले.

प्रस्‍तावना

ह्या पडीक जमिनीचे पुनरुज्जीवन करण्याच्या ध्यासाने येथे फळझाडं, चराऊ गवत, सरपणासाठीचे वृक्ष लावण्यात आले तसेच कमी दिवसांत तयार होणारी धान्येही आंतरपीक म्हणून घेण्यात आली. जमीनमालकांशी केलेला करार असा होता-तयार झाडापासून मिळालेल्या उत्पन्नांचा ५० टक्के हिस्सा मालकाला मिळेल आणि उरलेला व्यवस्थापन करणार्‍या गटाला. अंतरपिकाचं उत्पन्न ह्या गटाच्या सदस्यांमध्ये समप्रमाणात वाटले जाईल. अशा रीतीने एप्रिल २००८ मध्ये रोपवाटिका बनवून काम सुरू झाले. सामाजिक विश्लेषण प्रणाली (एसएएस म्हणजे सोशल अ‍ॅनालिसिस सिस्टिम) च्य सहयोगी साधनाने (पार्टिसिपेटरी टूल) ३६ रोपांच्या जातींची निवड करण्यात आली. २६००० रोपांपैकी १९१५० लावण्यात आली, ४००० विकण्यात आली आणि उरलेली गावकर्‍यांना वाटण्यात आली.

भूजल बचत अभियान

पुढच्या पावसाळ्यापर्यंत भूजल बचत अभियानामुळे जमिनीचे पोत सुधारेल आणि तिथे गवत उगवेल. ह्या जमिनीभोवती खंदक खणला होता - त्यामध्ये ४ सुळके, ५० अर्धगोलाकार बंधारे आणि ५ दगडी बांध होते. ह्यामुळे लोकांना एकूण १३४२ दिवसांचे काम मिळले. मका, दुधीभोपळा, घेवडा अशी अंतरिम पिकं प्रथम घेतली गेली. त्यानंतर आणखी काही धान्ये आणि सबाई जातीचे गवत, रोझेल् इ. लावले. खत म्हणून तळ्यातला गाळ, कंपोस्ट आणि कडुनिंबाची पेंड वापरली.

सुरुवातीची गुंतवणूक सुमारे २.५ लाख रुपये झाली, त्यापैकी ३० टक्के वाटा स्थानिक लोकांनी मजुरीच्या रूपाने उचलला होता. १६ कुटुंबांना प्रत्येकी सरासरी १५५ दिवस काम मिळाले. भाज्या लावल्याने दररोजची जेवणाची गरज भागण्यास मदत झाली शिवाय चार्‍याचाही प्रश्न सुटला. जवळजवळ नामशेष झालेले वृक्ष पुन्हा लावले गेल्याने जैवविविधता वाढण्यास मदत झली.

झाडू बनवणे, रोझेलच्या फळांचा जॅम बनवणे अशा कामांतून थोडेफार उत्पन्नही मिळाले. मुख्य म्हणजे ह्यातून आसपासच्या ३-४ खेड्यांच्या रहिवाशांना अशा कार्यात रस वाटू लागला आणि त्यांनी त्यांच्या भागातही हे अभियान चालवले.

ख्रिस्चन एड ह्या संस्थेनं ह्या कार्यक्रमास सहाय्य दिले.

स्रोत: डीआरसीएससी न्यूज, अंक तिसरा

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate