অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकत्रित कृतीचे अगणित फायदे

मध्य प्रदेशातील शेतकरी पर्यावरणासाठी उपयुक्त शाश्वत शेतीच्या पद्धती वापरून आपल्या शेतीवरील पिके सुधारत आहेत, उत्पादन व उत्पन्न वाढवत आहेत. हे सामाजिक उद्योगाचे मॉडेल केवळ शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नच वाढवत नाही तर जैव विविधतेचे संस्थल व संवर्धन देख्रिल मोठ्या प्रमाणावर करते.

भारतात मध्य प्रदेशात सिहोर जिल्हयात बुधणी तालुक्यात खानपुरा नावाचे एक छोटेसे 100 घरांची वस्ती असलेले गाव वसले आहे. हे गाव दाट जंगलानी वेढलेले असून येथे शेती हे मुख्य उपजिविकेचे साधन आहे. मागील काही वर्षापर्यंत येथिल शेतक-यांनी पारंपारिक शेती पद्धती सोडून देऊन व केवळ भरपुर रसायनांचा व किटकनाशकांचा वापरावर आधारित शेती पद्धती करीत होते. उपजिविका संसाधन हया क्षेत्रात शाश्वत उपजिवीकेला प्रोत्साहन दिसून आले की छोटे शेतकरी शेती करतांना रासायनिक रासायनीक किटक नाशकांच्या वापरावरील खर्च जवळ जवळ 1000-3000 रु. एकर असा असायचा. एवढेच नाही तर किटकनाशकांच्या अविवेकी वापरामुळे कौडीमध्ये प्रतिकारशक्ती विकसीत झाली होती. तसेच पर्यावरण खाद्यान रक्षितेत धोका निर्माण झाला होता.

पर्यावरणाला अनुकुल अशा शेती पद्धतीचा अवलंब करून शेतीचा खर्च कमी करण्यासाठी वृत्ती संस्थेनी गोमुत्र, कडुनिंब व सिताफळ वनस्पतीच्या सुरुवातीला हया जैविक किटकनाशकांचा कार्यक्षमतेवर रसायने वापरणाच्या शेतक-यांकडून अविश्वास दर्शविला गेला. वृत्ती संस्थेने पद्धतशीर व योग्य रितीने जैविक किटकनाशकांचा वापर व त्याचे फायदे हया पर्यावरणाला अनुकुल पद्धतीचा प्रचार केला व प्रोत्साहित केले. वृत्ती संस्थेनी गावातील शेतक-यांना एकत्रित होण्यास व शेतक-यांचे क्लब व समुह स्थापन करण्यात मदत केली. शेतकरी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळया शेतावर भेट देण्यास नेण्यात आले. त्याचप्रमाणे शेतक-यांना कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे येथे नेण्यात आले. व तेथील शास्त्रज्ञांसोबत व इतरांमध्ये शेतकरी उत्पादक संस्थेबाबत चर्चा करण्यात आली. शेतकरी समूहातील उत्साही व जैविक पद्धतीनी लवकर प्रतिसाद देणारे व सकारात्मक दृष्टीकोन असणा-या शेतक-यांची कृषिसेवा दाता म्हणून माहीती देणे, त्यांच्या दारी जावून मदत करणे. तसेच सरकारी सेवा/ योजना बाजारपेठ, संशोधन व वैज्ञानिक संस्थामध्ये सोबत दुवा साधणे हे मुख्य कार्य BDS चे होते. त्यांना Master Trainer म्हणून प्रशिक्षित करण्यात आले. समुहातील पंजीकृत शेतक-यांना गोमुत्र जमा करणे व ते कृषीसेवादाताला पुरविणे, हयावर प्रशिक्षण देण्यात आले. जैविक किटकनाशके तयार करण्यास कडुनिंबाचे पाने व गोमुत्र त्याचा उपयोग व कार्यक्षमता हयावर प्रशिक्षण देण्यात आले.

प्रक्रिया

जैविक किटकनाशके तयार करण्याच्या पद्धती मध्ये मुख्य 3 पातळया आहेत. सर्वप्रथम बचत गट किंवा शेतकरी क्लबच्या पातळीवर गोमुत्र जमा केल्या गेले. त्यामध्ये जवळजवळ गावातील 400 पेक्षा कुटुंब जास्त घरे सहभागी होते. कृषी सेवादाता सदस्य शेतकरी समुहांकडून गोमुत्र गोळा करायचे. रोज सुमारे 500 लीटर गोमुत्र प्रत्येक घरातून गोळा केले जातात त्यासाठी प्रत्येक शेतक-याला प्रत्येक लीटर गोमुत्रासाठी रू. 5/- दिले जायचे. त्यानंतरची प्रक्रिया खंडावार, खानपुरा, व उन्डीया हया गावात केली गेली. गोळा केलेले गोमुत्र 200 लीटरच्या डूममध्ये टाकून त्यात 20 किलो कडूलिंबाची पाणे, सिताफळीचे पाने टाकून 21 दिवस डूम बंद करून ठेवतात. 21 दिवसानंतर हे मिश्रण गाळून घेवून जैविक किटकनाशक म्हणून वापर केला जातो. हया जैविक किटकनाशक उत्पादन इकाईची क्षमता जवळजवळ 3000 लीटर अशी होती. सध्या गावातील काही बचत समुह हे जैविक किटकनाशके तयार करून गावातच त्यांची विक्री करण्यासाठी पुढे येत आहेत. हया जैविक किटकनाशकांचे विपणन मुख्यतः नर्मदांचल शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे केल्या गेले. (गावातील 1000 शेतक-यांनी मिळून तयार केलेली कंपनी). नर्मदांचल कंपनी ही उत्पादक कंपनी असून कंपनी कायद्यातील पंजीकृत केलेली आहे.हि  जैविक किटकनाशके इंजेता नावाखाली विक्री केल्या जाते. साधारणतः 25 टक्के शेतक-यांनी रासायनिक किटक नाशकाचा वापर पुर्ण बंद केला. तर 50 टक्के शेतक-यांनी वापर अर्ध्यावर खाली आणला . यामुळे उत्पादन खर्च बऱ्यापैकी खाली आला.

अगदी सुरुवातीला या पद्धतीचा अवलंब करणा-याची यशोगाथा

कानपुरा येथील कृषी सेवादाता म्हणून नेमलेले श्री राम कैलाश यादव, वय 35 वर्षे, हे एक शिक्षित शेतकरी असून, एकूण 5 एकर सर्वप्रथम वापर करण्यास सुरुवात केली. श्री. राम कैलाश यादव मुळातच जिज्ञासू वृत्तीचे व मेहनती असून त्यांच्या कडे 4 गायी आहेत. वृत्तीच्या साहाय्याने त्यांनी नीम, सिताफळीचे पाणे व गोमुत्र हयापासून किटकनाशके तयार करण्याचे ठरविले व त्यासाठी नाबार्डच्या सहाय्याने 200 लीटरचे 18  डूम्स घेतले . सर्वप्रथम 15 लीटर गोमुत्र घेवून त्यात 5 किलो कडुनिंबाची पाणे व 0.5 किलो सिताफळीचे पाणे, 0.5 किलो रूईचे पाने टाकून, संपुर्ण मिश्रण 21 दिवस ड्रम मध्ये ठेवले. 21 दिवसानंतर हे मिश्रण गाळून घेतले व त्यापैकी  0.5 किलो जैविक कीटकनाशक १५ लिटर पाण्यात मिश्रण करून सोयाबीन पिकांवर वापरले होते. पुन्हा 15 दिवसांनी हीच फवारणी केली होती. श्री राम कैलाश यादवांनी फवारणी केलेल्या पिकांमध्ये बराच फरक जाणवला पिकांची वाढ भरपूर झाली. झाडे निरोगी झाली, मुळांची वाढ चांगली झाली. किडींचा प्रादुर्भाव देखिल कमी झाल्याचे आढळले.

गुणवत्ता देखिल वाढली होती. जमीनीचा पोत देखिल सुधारल्याचे दिसून आले. उत्पज्ञात पण वाढ दिसून आली. उत्पन्न झालेले बियाणे देखिल चांगल्या गुणवतेचे होते. जैवीक किटकनाशके वापरून आढळून आलेल्या परिणामांना बघून श्री . राम कैलाश यादव ह्यांनी पहिल्या वर्षी जवळपास 2200 लीटर जैविक कीटकनाशक तयार केले व त्यापासून 17,600 रु. नफा घेतला. रामकैलासने मिळवलेला दोन वर्षातील नफा खार्लीलप्रमाणे

वर्ष

लागतखर्च

(प्रतिलिटर)

एकूण उत्पादन

(लिटरमध्ये)

प्रती लिटरचा दर (रुपयात)

एकूण रक्कम (रुपये)

निव्वळ नफा (रुपयात)

२०१३

५७००

१२

६८४००

४५६००

 

२०१२

२२००

१२

२६४००

१७६००

ही जैविक कीटकनाशके तयार करण्यास मजुरांची गरज नसते. व सहजपणे तयार करता येतात . ह्यासाठी लागणारे कडूनिंबाची पाने , सिताफळीची पाने ,रुईची पाने जंगलातून गोळा केले होते . गोमुत्रासाठी त्यांच्या स्वतःच्या गाई होत्या. त्यामुळे जैविक किटकनाशके तयार करण्याचा खर्च नगण्य होता व केवळ रू.200 नी त्यांनी आपला धंदा सुरू केला.

फायदे

सध्या जैविक कीटकनाशकाचा वापर जवळजवळ ५०० शेतकरी वेगवेगळ्या पिकांवर  .उदा. तांदूळ , सोयाबीन , गहू  यावर करतात. त्यांना त्यापासून चांगले फायदे पण मिळत आहेत उदा. पिकांचे उत्पन्न 20-25 % नी वाढले आहे. पिकांना फुटवे जास्त येत आहेत. पिकांवर कोणताही बुरशीजन्य रोग आढळत नाही. झाडे पिके निरोगी होतात. दाणा भरदार होतो व रंग देख्रिल चांगला असतो. शेतक-यांनी रासायनीक किटकनाशके वापरणे कमी केले आहे. आकडेवारीनुसार जवळ जवळ 25 टक्के शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर ५० टक्क्यांनी कमी केला आहे.आणि २५ टक्के  आणि 25 टक्के शेतक-यांनी त्या जैविक किटकनाशकाचा पीक कालावधीत एकदा तरी वापर केला आहे. हयामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च कमी झाला आहे. रासायनिक कीटकनाशके वापरून   एकरी 1800/- रू खर्च यायचा. तर जैविक किटकनाशके वापरून 1000/- रुपये खर्च येतो. म्हणजेच एकरी रू. 800/- ची बचत होते. हया जैविक पद्धतीने शेतक-यांना खर्च कर्मी होवून उत्पादन वाढले आहे. अशा प्रकारे एकरी 5000 रुपये नफा शेतकरा कमवित आहेत. जेंविक किटकनाशकांच्या नियमित वापराने शेतात जैविक वातावरण तयार होत आहे. जमिनीत गांडूळाची संख्या  वाढत आहे. रासायनीक शेतीच्या तुलनेत पाण्याची बचत होत आहे.

उपक्रमाचा विस्तार

सध्याच्या परिस्थितीत 500 शेतकरी गोमुत्रावर आधारित जैविक किटकनाशकांचा वापर शेतात वेगवेगळया पिकांवर करीत आहेत. सकारात्मक परिणांमामुळे वृत्तीचा उत्साह वाढला आहे. वृत्तीने नाबार्ड च्या साहाय्याने जैविक किटकनाशकांचा उत्पादनाचे व विक्रोचे एंटरप्राईस EPAP कार्यक्रमातंर्गत वृत्ती ला बुदाणी ब्लॉक मध्ये, सिटोर जिल्ह्यात कुंडावार व यार्दनगर गावात हया जैविक किटकनाशकांचे उत्पादन ईकाई सुरू करण्यास आर्थिक मदत केली आहे. ही ईकाई शेतकरी व वृत्तीद्वारे आवक तर वाढलीच शिवाय मातीची सुपिकता पण वाढली आणि पर्यावरण संरक्षणही झाले.

 

स्त्रोत - लिजा इंडिया

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate