অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

SRI पद्धतीने भात लागवड

प्रस्‍तावना

मौजे पळसुंदे, तालुका अकोले जिल्हा  अहमदनगर गांवात 2010 पासून 'वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्‍ट' संस्‍थेचे वातावरण बदलाशी अनुकूलन कार्यक्रम या प्रकल्‍पावर काम चालू आहे. या कार्यक्रमात  गांवात विविध 14 घटकांवर काम केले जाते. त्‍यात शेती हा एक मुख्‍य घटक असल्‍यामुळे शेती घटकावरही केले जात आहे. शेती विकासासाठी खरीप व रब्‍बी हंगामामध्‍ये निवडक व इच्‍छुक शेतक-यासोबत प्रायोगिक तत्‍वावर पिक प्रात्‍याक्षिके घेण्‍यात येतात. या वर्षी म्‍हणजे 2012 मध्‍ये खरिप हंगामात गांवात संस्‍थेच्‍या हस्‍तक्षेपाने शेतीशाळा घेण्‍यात आली. यात एकूण 17 शेती शाळा घेण्‍यात आल्‍या. या शेतीशाळेचा मुख्‍य उद्येश म्‍हणजे कमी खर्चात भाताचे उत्‍पादन वाढवणे व त्‍यातुन शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात भर टाकणे होय. यासाठी गांवातुन एकूण 22 शेतक-यांचा या शेतीशाळेसाठी सहभाग घेण्‍यात आला. या उपक्रमांतर्गत एस.आर.आय. पध्‍दतीने भात लागवडीचे शेतीशाळेत सहभागी शेतक-यांना प्रशिक्षण देऊन प्रत्‍यक्ष प्रत्‍येक शेतक-याच्‍या प्‍लॉटवर जाऊन  भात लागवडीसाठी क्षेत्र मोजणी, बी पेरणी, चिखलणी, भात रोप लागवड, खताची मात्रा व खत देण्‍याची पध्‍दत, तसेच प्रत्‍येक स्‍टेजला कृषी सल्‍ल्‍याचा वापर करून हवामानानुससार भातावर कोणते रोग पडण्‍याची शक्‍यता आहे आणि त्‍यासाठी कोणत्‍या औषधांची फवारणी करावी व सर्वात शेवटी कापणी कधी करावी या सर्वावर राहूरी कृषी विद्यापीठ शाखा इगतपुरी, शासकीय कृषी अधिकारी व वॉटरचे कृषी तज्ञ डॉ. वाणी सर यांच्‍या मार्गदर्शनाखाली पळसुंदे येथे पार पाडण्‍यात आल्‍या.

या उपक्रमाचा जो उद्येश होता तो ख-या अर्थानपे पुर्ण झाला असे म्‍हणता येईल. कारण शेतीशाळेच्‍या उपक्रमात ज्‍या ज्‍या शेतक-यांनी सहभाग घेतला त्‍या सर्वच शेतक-यांना भाताचे भरघोस उत्‍पादन निघाले. यात सरासरी एकरी 38 पोते भाताचे उत्‍पादन मिळाले असून याउलट पारंपारिक पध्‍दतीने एकरी सरासरी 17 पोतेच भात होत असल्‍याचे दिसून आले.

यासंदर्भात आणखी माहितीसाठी अशाच एका शेतक-यांचा व्‍यक्‍तीगत अभ्‍यास पुढीलप्रमाणे . . . .

शेतक-याचे नांव – श्री. सुधीर धर्मा संगारे
पत्‍ता - मु. पो. पळसुंदे ता. अकोले जिल्‍हा अहमदनगर
वय – 31
शिक्षण – 10 वी

कौटुंबिक व सामाजिक स्थिती - या शेतक-याच्‍या कुटूंबात एकूण 5 व्‍यक्‍ती आहेत. त्‍यात आई-वडिल, पत्‍नी आणि 2 अपत्‍ये यांचा समावेश आहे. या व्‍यक्‍तीचे सामाजिक स्‍थान चांगले असून नेतृत्‍व गुण अंगी असल्‍यामुळे सामाजिक कार्यातही नेहमीच सहभाग असतो. या व्‍यक्‍तीची आर्थिक सिथती मात्रा जेमतेमच आहे.

शेतक-याची समस्‍या

या शेतक-याची मुख्‍य समस्‍या म्‍हणजे कमी उत्‍पन्‍न होय. शेतक-याला क्षेत्र कमी असणे आणि भांडवल कमी असणे या 2 काराांमुळेच उत्‍पन्‍न कमी निघते .

समस्‍येचे निराकरण

या शेतक-याच्‍या वरील समस्‍येचे निराकरण केलेंडर तरी एस आय आय ने ही भाताचे भरगोस उत्‍पादन देणारी भात लागवडीची पध्‍दत आहे. गांवात वॉटर संस्‍थेने जी शेतीशाळा घेतली त्‍यातील 22 शेतक-यांमध्‍ये श्री. सुधीर धर्मा संगारे या शेतक-सयाचाही सहभाग होता. याने देखिल एस आर आय  पध्‍दतीने भात लागवड केली होती.

या शेतक-याने पुढिल प्रमाणे भात लागवड केली होती.

  • भात लागवडीचा गट नं. 2
  • भात लागवड क्षेत्र - 8 गुंठे
  • भाताचा वाण दफतरी 9
  • बियाणे 1.5 कि. ग्रॅ.
  • एस आर आय पध्‍दतीने लागवड करताना वापरलेल्‍या रोपांची संख्‍या 2 काडी
  • मागील वर्षी पारंपारिक पध्‍दतीने लागवड करताना वापरलेल्‍या रोपांची संख्‍या 5 ते 6 काडया
  • भातासाठी वापरलेले खत युरिया ब्रिकेट – 20 कि. ग्रॅ.

भातावर पडलेला रोग – करपा

  • भातावरील रोग जाण्‍यासाठी केलेली फवारणी – एम 45
  • भाताचे एकूण उत्‍पन्‍न – 7 पोते
  • चालू वर्षाचा एस आर आय पध्‍दतीमुळे मिळालेला पेंढा 40
  • मागील वर्षाचा पारंपारिक पध्‍दतीमुळे मिळालेला पेंढा 32
  • भाताची झालेली वाढ – 3 ते 3.5 फूट
  • मशागतीपासून ते भात पोत्‍यांमध्‍ये भरेपर्यंतचा एकूण खर्च 2550 रू.

वरील माहितीनुसार या शेतक-याचे या वर्षाचे याच क्षेत्रातील भाताचे उत्‍पन्‍न 7 पोते झाले आहे.या अगोदर या शेतक-याने एकदाही 4 पोत्‍यांपेक्षा अधिक पोते भाताचे उत्‍पन्‍न काढलेले नव्‍हते. भाताचे उत्‍पन्‍न अधिक तर मिळालेच शिवाय दरवर्षीपेक्षा खर्च देखिल कमी झाला. त्‍यामुळे हा शेतकरी खूपच आनंदी असून त्‍याने ठरवे आहे की, यापूढे आता केवळ 8 गुंठयातच नाही तर सर्व  क्षेत्रात एस आर आय पध्‍दतीनेच भात लागवड करणार आहे.  कारण त्‍याने 8 गूंठयात केलेला प्रयोग यशस्‍वी झालेला आहे. त्‍याच्‍या उत्‍पन्‍नात दुपटीने फरक दिसून आला आहे.

निष्‍कर्ष

एस. आर. आय पध्‍दतीने भात पिकाचे उत्‍पादन 99 टक्‍के वाढतेच.

माहितीदाता – श्री. कांतीलाल गिते

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate